AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Badlapur Rain : बदलापुरात उल्हास नदी धोक्याच्या पातळीवर, बदलापूर-कर्जत राज्य महामार्ग गेला पाण्याखाली!

ठाणे आणि रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे बदलापूरहून कर्जतकडे जाणारा राज्य महामार्ग पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. बदलापूरजवळच्या चामटोली गावाजवळ या महामार्गावर उल्हास नदीचं पाणी आलं असून त्यामुळे हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

Badlapur Rain : बदलापुरात उल्हास नदी धोक्याच्या पातळीवर, बदलापूर-कर्जत राज्य महामार्ग गेला पाण्याखाली!
बदलापुरात उल्हास नदी धोक्याच्या पातळीवरImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jul 13, 2022 | 8:51 PM
Share

बदलापूर : बदलापुरात उल्हास नदी (Ulhas River) इशारा पातळी ओलांडून धोक्याच्या पातळीवर आली आहे. या पार्श्वभूमीवर बदलापूर पालिका प्रशासन पूर (Flood) परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज झाली आहे. ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे उल्हास नदीनं आज सकाळी 16.50 मीटर ही इशारा पातळी (Alert Level) ओलांडली होती. त्यानंतर आता उल्हास नदी 17 मीटरच्या वर आली असून 17.50 ही धोक्याची पातळी आहे. त्यामुळे पुराचं पाणी बदलापूर शहरातील चौपाटीच्या वर आलंय. हे पाणी कधीही शहरात घुसले अशी परिस्थिती असल्यानं बदलापूर पालिका प्रशासन पूरपरिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज झालंय.

उल्हास नदीकिनारी अग्निशमन दलानं बोटी तैनात केल्या असून पालिकेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे हे स्वतः नदीकिनारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. पुराचा धोका लक्षात घेत किनारी भागातल्या अनेक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी दिली आहे.

उल्हास नदीचं पाणी रस्त्यावर आल्यानं महामार्ग बंद

ठाणे आणि रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे बदलापूरहून कर्जतकडे जाणारा राज्य महामार्ग पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. बदलापूरजवळच्या चामटोली गावाजवळ या महामार्गावर उल्हास नदीचं पाणी आलं असून त्यामुळे हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. उल्हास नदीची पाणी पातळी वाढल्यानंतर दरवर्षी बदलापूरजवळच्या चामटोली गावाजवळ कल्याण-कर्जत राज्य महामार्ग पाण्याखाली जातो. याच ठिकाणी काही वर्षांपूर्वी महालक्ष्मी एक्सप्रेस देखील उल्हास नदीच्या पुराच्या पाण्यात अडकून पडली होती. यानंतर आज मुसळधार पावसामुळे उल्हास नदीचं पाणी पुन्हा एकदा या महामार्गावर आलं असून त्यामुळे हा महामार्ग बंद झाला आहे. या महामार्गावर बदलापूर ग्रामीण पोलिसांनी संपूर्ण वाहतूक बंद केली आहे. तर वांगणी दिशेला अडकलेल्या काही गाड्या या पुराच्या पाण्यातून धोकादायक पद्धतीने बाहेर काढण्यात आल्या.

कल्याणातील वालधुनी परिसर जलमय

बुधवारी सकाळपासून कल्याण डोंबिवली शहरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू होती. त्यात 11 ते 2 भरतीची वेळ असल्याने शहरातील खाडी पात्रात पाण्याची पातळी वाढली होती. रेतीबंदर बंदर परीसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानंतर वालधुनी परीसरातुन वाहणाऱ्या उल्हास नदीची देखील पाण्याची पातळी वाढली. या ठिकाणी अनेक घरांमध्ये नदीचं पाणी शिरलं होतं. तर अनेकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. या पार्श्वभूमीवर पालिकेकडून निवारा केंद्र आणि शाळांची सोय करण्यात आली आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यात आला असून निवारा केंद्रात नागरिकांना स्थलांतरीत व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. (At Badlapur, the Ulhas river was at danger level, the Badlapur-Karjat state highway went under water)

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.