AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी महाराष्ट्र बंदची हाक

Badlapur School Case Update : बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. कल्याणमधील वकील संघटनेने या घटनेचा निषेध नोंदवला आहे. आरोपी अक्षय शिंदेच्या विरोधात लढण्याचा या संघटनेने निर्धार केलाय. नेमकं काय घडलंय? वाचा सविस्तर बातमी...

मोठी बातमी : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी महाराष्ट्र बंदची हाक
बदलापूर अत्याचार प्रकरणी मंगळवारी आंदोलन करण्यात आले होते.Image Credit source: tv9
| Updated on: Aug 21, 2024 | 2:06 PM
Share

बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराने महाराष्ट्र हादरला आहे. तीन ते चार वर्षांच्या दोन मुलींवर शाळेतील स्वच्छतागृहातील स्वच्छता कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केला. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. बदलापूरकरांनी रस्त्यावर उतरत या घटनेचा निषेध केला. बदलापूर रेल्वे स्टेशनवर आंदोलक रेल्वे रूळावर उतरले. रेलेरोको आंदोलन करत न्यायाची मागणी केली. 11 तास हे आंदोलन सुरु होतं. या घटनेचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. अशातच विरोधी पक्षांकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे.

महाराष्ट्र बंदची हाक

बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरणाचे महाराष्ट्रभर पडसाद उमटत आहेत. राज्यभरातून या घटनेचा निषेध केला जात आहे. विरोधी पक्षांनी देखील या घटेवरून सरकारवर टीका केली आहे. चिमुतल्यांना न्याय देण्याची मागणी केली आहे. बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरणी येत्या 24 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. आघाडीचे सगळे पक्ष या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. बदलापूर प्रकरणी महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे.

ठिकठिकाणी आंदोलनं

बदलापूर इथं दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. पुणे, जळगाव, सांगलीत या घटनेच्या निषेधार्थ आंदोलनं करण्यात आली. बदलापूर घटनेच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं आंदोलन झालं. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने हे आंदोलन केलं.पुण्यातील गुडलक चौकामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विरोधात आणि बदलापूर घटनेच्या निषेधार्थ पवार गटाचं आंदोलन झालं. सांगलीतही राष्ट्रवादी शरद पवार गटाने आंदोलन केलं आहे. ठाकरे गटाकडूनही आंदोलन करण्यात आलं.

वकील संघटनेचा निर्णय काय?

आरोपी अक्षय शिंदेचे वकीलपत्र कुणीही घेऊ नये, असे आवाहन कल्याण वकील संघटनेतर्फे करण्यात आलं आहे. न्यायालयामध्ये कल्याण जिल्हा न्यायालय वकील संस्थेची बैठक झाली. या बाठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. आम्ही वकील पत्र देणार नाही. सरकारने त्यांचं वकीलपत्र द्यावं. आम्ही आरोपीच्या विरुद्ध लढणार आहोत. तर जे आंदोलन केलं ते पोलिसांच्या चुकीमुळे झालं. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आंदोलन करताना सोडवण्यासाठी नि: शुल्क न्यायालयामध्ये आम्ही त्यांच्या बाजूने केस लढणार आहोत, अशी भूमिका कल्याण न्यायालयामधील वकील असोसिएशनने घेतली आहे.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.