AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुरक्षेपेक्षा तुम्ही फेकलेल्या दीड हजार रुपड्यांना…; बदलापूरच्या घटनेवर किरण मानेंची संतप्त प्रतिक्रिया

Kiran Mane on Badlapur School Case : अभिनेते किरण माने यांनी बदलापूरमधील शाळकरी मुलींवरील अत्याचार प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या घटनेवरून सरकारवर जोरदार टीका केली आहे. लाडकी बहिण योजनेचाही त्यांनी उल्लेख केला आहे. वाचा सविस्तर बातमी.....

सुरक्षेपेक्षा तुम्ही फेकलेल्या दीड हजार रुपड्यांना...; बदलापूरच्या घटनेवर किरण मानेंची संतप्त प्रतिक्रिया
किरण मानेंची प्रतिक्रियाImage Credit source: Facebook
| Updated on: Aug 21, 2024 | 1:35 PM
Share

बदलापूरमध्ये 3 ते 4 वर्षांच्या दोन शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घटली आहे. शाळेतील स्वच्छतागृहातील कर्मचाऱ्यानेच हे कृत्य केल्याने संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत. बदलापूरकरांनी काल रस्त्यवर उतरत या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन केलं. रेल्वे ट्रॅकवर उतरत बदलापूरकरांनी रेलरोको आंदोलन केलं. या घटनेचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. सोशल मीडियावरही याबाबतच्या पोस्ट पाहायला मिळत आहेत. सिनेसृष्टीतील कलाकारांनी याबाबत आपली मतं व्यक्त केली आहेत. अभिनेते किरण माने यांनी फेसबुक पोस्ट लिहित घटनेचा निषेध केला आहे.

किरण मानेंची प्रतिक्रिया

किरण माने यांनी फेसबुक पोस्ट लिहिली आहे. यात त्यांनी बदलापूर घटनेवरून सरकार आणि गृहखात्याला काही प्रश्न विचारले आहेत. लाडकी बहीण योजनेचा दाखला देत त्यांनी सरकारवर टीका केली आहे. ‘ती’ स्त्रित्वाच्या सुरक्षिततेपेक्षा तुम्ही फेकलेल्या दिड हजार रुपड्यांना भुलेल, असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही तुमच्या बहिणीला ओळखलेलं नाही, असं म्हणत किरण माने यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

किरण माने यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. जनतेचा काळीज पिळवटणारा आक्रोश ऐका! क्रूर आणि कोडग्या सत्ताधार्‍यांनो…जेव्हा एका लहान लेकरावर बलात्कार होतो ना, तेव्हा ती जखम आणि ती वेदना प्रत्येक स्त्रीला होते. महाराष्ट्रातल्या घराघरातली एकेक ‘लाडकी बहिण’ आज बदलापूरमधल्या लेकींच्या वेदनेनं कळवळतेय… या माताभगिनीच्या काळजात खदखदणार्‍या या वेदनेची आग तुमच्या भ्रष्ट सरकारची राखरांगोळी करून टाकणार… ‘ती’ स्त्रित्वाच्या सुरक्षिततेपेक्षा तुम्ही फेकलेल्या दिड हजार रुपड्यांना भुलेल, असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही तुमच्या बहिणीला ओळखलेलं नाही. मेंदूत कोरुन ठेवा, जनतेचा हा उद्रेक तुम्हाला नेस्तनाबूत करणार, असं किरण माने यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

खरंतर घटनेचं गांभीर्य एवढं आहे की घटना घडलेल्या दिवसापासून एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री आणि प्रशासन बदलापूरमध्ये तळ ठोकून बसायला हवं होतं. पण… इव्हेन्ट महत्त्वाचा होता ! कुणीही फिरकलं नाही. तब्बल चार दिवसांनी फाॅरमॅलिटी म्हणून मुख्याध्यापिकेला निलंबीत केलं, वर्गशिक्षीकेला नोकरीवरून काढलं आणि बलात्कार्‍याचे शाळेबरोबर असलेले काॅन्ट्रॅक्ट रद्द केलं… व्वा ! मुलींना न्याय मिळावा म्हणून आज रेल्वे ट्रॅकवर उतरून आंदोलन करणार्‍या भावांवर, माताभगिनींवर अमानुष लाठीचार्ज केला गेला. नोट माय वर्डस्…या कोडग्या आणि नालायक राज्यकर्त्यांना तमाम महाराष्ट्रातल्या लहान लेकीबाळींचा तळतळाट लागणार आहे!, असंही किरण माने यांनी म्हटलं आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.