AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘बरणी हलवणाऱ्यांपासून सावध राहिलं पाहिजे’; आगरी महोत्सवात कपिल पाटील यांची टोलेबाजी

माजी खासदार कपिल पाटील यांनी बदलापूरच्या आगरी महोत्सवात लाल आणि काळ्या मुंग्यांच्या दृष्टांताचा वापर करून महायुतीतील मतभेदांवर टोला लगावला. त्यांनी विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपातील स्थानिक नेत्यांमधील वादाकडे निर्देश केला. त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून, पाटील यांनी हे वक्तव्य कुणालाही उद्देशून नव्हते, असे स्पष्टीकरण दिले आहे.

'बरणी हलवणाऱ्यांपासून सावध राहिलं पाहिजे'; आगरी महोत्सवात कपिल पाटील यांची टोलेबाजी
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Dec 30, 2024 | 7:57 PM
Share

एका बरणीत लाल मुंग्या आणि काळा मुंग्या एकत्र ठेवा, त्या शांततेने राहतात. पण कुणीतरी येतो आणि ती बरणी हलवून निघून जातो. त्यानंतर मात्र या मुंग्या एकमेकांशी भांडायला लागतात, असं म्हणत ही बरणी हलवणाऱ्यांपासून आपण सावध राहिलं पाहिजे, असा टोला भाजपचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी बदलापूरच्या आगरी महोत्सवात लगावला. त्यांचा हा टोला नेमका कुणाला उद्देशून होता? यावरून आता चर्चा सुरू झाली आहे. कपिल पाटील यांनी मात्र हे वक्तव्य कुणालाही उद्देशून नव्हतं, असं स्पष्टीकरणही दिलं आहे.

कपिल पाटील यांच्या वक्तव्याचा अर्थ काढायचा झाल्यास, लाल मुंग्या आणि काळ्या मुंग्या म्हणजे महायुतीतील शिवसेना आणि भाजपा हे दोन पक्ष असून नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना बदलापूर शहरप्रमुख वामन म्हात्रे आणि भाजपाचे स्थानिक नेते यांच्यात झालेल्या समाज-गैरसमजांच्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी हे वक्तव्य केलं असावं, असा तर्क सध्या लावला जातोय. पण मग महायुतीची ही बरणी नेमकी कुणी हलवली? हे मात्र कपिल पाटलांनी सांगितलेलं नाही.

कपिल पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव

कपिल पाटील हे भाजपचे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आहेत. ते 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांच्या कामांवर खूश होत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 मध्ये त्यांना केंद्रीय पंचायत राज्यमंत्रीपदाची संधी दिली होती. पण असं असलं तरी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांनी कपिल पाटील यांचा पराभव केला होता.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान