Devendra Fadanvis | पंचनामे करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना योग्य ती मदत दिली पाहिजे : देवेंद्र फडणवीस

फडणवीस यांनी सांगितले की, अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. फळबागा, पिकांच्या कापण्या झाल्या आहेत, अशा ठिकाणी नुकसान जास्त झाले असल्याची माहिती मिळत आहे. अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान हे एनडीआरच्या नॉम्समध्ये बसते.

Devendra Fadanvis | पंचनामे करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना योग्य ती मदत दिली पाहिजे : देवेंद्र फडणवीस
पंचनामे करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना योग्य ती मदत दिली पाहिजे
Follow us
| Updated on: Dec 02, 2021 | 10:12 PM

डोंबिवली : अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरात मदत द्यावी, असे वक्तव्य आज राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी डोंबिवलीत केले. डोंबिवली रहिवासी, लेखक, प्रवचनकार डॉ.सच्चिदानंद शेवडे यांच्या सत्कार आणि ‘डावी विषवल्ली’ या पुस्तकाच्या प्रकाशनसाठी फडणवीस डोंबिवलीत आले होते. तत्पूर्वी त्यांनी टिळक शाळेला आणि पै फ्रेंड्स वाचनालयाला भेट दिली. दरम्यान पत्रकाराशी बोलताना फडणवीस यांनी अवकाळी पावसामुळे झालेले नुकसानाबाबत विधान केले.

काय म्हणाले फडणवीस?

फडणवीस यांनी सांगितले की, अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. फळबागा, पिकांच्या कापण्या झाल्या आहेत, अशा ठिकाणी नुकसान जास्त झाले असल्याची माहिती मिळत आहे. अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान हे एनडीआरच्या नॉम्समध्ये बसते. त्यामुळे राज्य सरकारने नॉम्सनुसार पंचनामे करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना योग्य ती मदत दिली पाहिजे असे सांगितले आणि मागच्या काळात सरकारने घोषणा खूप केल्या पण मदत पोहोचली नाही असेही सांगितले. यावेळी खा.कपिल पाटील, आमदार रवींद्र चव्हाण आणि आमदार गणपत गायकवाड उपस्थित होते.

अंबरनाथ तालुक्यात टोमॅटो, गवार, चवळीच्या पिकांचं नुकसान

गेले दोन दिवस कोसळणाऱ्या अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. अंबरनाथ तालुक्याच्या ग्रामीण भागात या पावसानं टोमॅटो, चवळी, गवार या सारख्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. मंगळवारपासून राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाला सुरुवात झाली. या पावसानं शेतात सगळीकडे पाणीच पाणी साचलं. अंबरनाथ तालुक्यातील चिंचवली आणि आजूबाजूच्या भागातील शेकडो एकर फळ शेती अवकाळी पावसामुळे पाण्याखाली आलीय. अजूनही शेतात पाणी साचलेलंच आहे. टोमॅटोची रोपं तर पूर्ण दिवसभर पाण्याखाली होती. त्यामुळे हे संपूर्ण पीक आता वाया जाणार आहे. तर गवारचं पीक वरून चांगलं दिसत असलं, तरी त्याला बुरशी लागायला सुरुवात झाली आहे. चवळीच्या वेली खाली पडल्या आहेत. शेतात सगळीकडे चिखलाचं साम्राज्य आहे.

साताऱ्यात 80 पेक्षा जास्त जनावरांचा गारठून मृत्यू

बुधवारी रात्री सुरू झालेल्या पावसामुळे सातारा जिल्ह्यात सुमारे 80 हून अधिक मेंढ्यांचा गारठून मृत्यू झालेला आहे. त्यामुळे मेंढपाळ व शेतकरी वर्ग भयभीत झाला आहे. बुधवारी रात्री व गुरुवारी पहाटे भिरडाची वाडी, भुईंज, चंचळी, कुमठे, वाई,खटाव अशा वेगवेगळ्या ठिकाणी गारठल्यामुळे ‌मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. रात्री अचानक वाढलेला पाऊस व हवामानात वाढलेला गारटा यामुळे बकऱ्यांचा मृत्यू झाला. सुमारे 80 पेक्षा ज्यास्त मेंढ्या मयत झाल्या आहेत तर काही अत्यवस्थ अवस्थेत असल्याने या ठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अवकाळी झालेल्या या पावसाने शेती सोबतच मुक्या पाळीव जनावरांच्या मृत्यने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं आहे. (Bjp leader Devendra Fadanvis reaction on rain loss)

इतर बातम्या

diva dumping ground: नाकात दम आणणारा दिवा येथील डम्पिंग ग्राऊंड हटवला जाणार, 14 वर्षानंतर दिवेकरांची वनवासातून सुटका

सीसीटीव्हीच्या सहाय्याने तासाभरात शोधली रिक्षा, त्या महिलेचे दागिने मानपाडा पोलिसांनी परत केले

Non Stop LIVE Update
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.