उल्हासनगर : उल्हासनगर शहरात पाच हजार चौरस मीटरऐवजी दोन ते तीन हजार चौरस मीटर क्षेत्रात क्लस्टर योजना (Cluster Scheme) राबविण्याबाबत क्लस्टरबाबत नेमलेल्या समितीकडून आठवडाभरात अहवाल आल्यानंतर निर्णय घेण्यात येईल. त्याचबरोबर 1990-1995 मधील रेडीरेकनर दराऐवजी आकारण्यात येणाऱ्या सध्याच्या दरावरील दंड आणि त्यावरील व्याजासंदर्भात जनतेला परवडेल असा दर निश्चित करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे, अशी भूमिका राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सोमवारी मांडली. (Consideration to implement cluster scheme in low area in Ulhasnagar)