Dombivali Banner : एकनाथ शिंदेच डोंबिवलीच्या विकासाचे मारेकरी, आमदार रविंद्र चव्हाण यांचा बॅनरबाजी करीत आरोप

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना एमएमआरडीएच्या माध्यमातून 30 रस्त्याचे क्रॉन्क्रीटीकरण करण्यास मंजुरी देण्यात आली होती. त्याचा डीपीआर तयार केला होता. त्याला निधी देण्यात आला होता. मात्र पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निधी रद्द केला असा आरोप चव्हाण यांनी केला आहे. तसेच विविध विषयावर शिवसेना आणि पालकमंत्र्यांवर हल्लाबोल केला.

Dombivali Banner : एकनाथ शिंदेच डोंबिवलीच्या विकासाचे मारेकरी, आमदार रविंद्र चव्हाण यांचा बॅनरबाजी करीत आरोप
एकनाथ शिंदेच डोंबिवलीच्या विकासाचे मारेकरी, आमदार रविंद्र चव्हाण यांचा बॅनरबाजी करीत आरोप
Follow us
| Updated on: Feb 23, 2022 | 9:38 PM

डोंबिवली : डोंबिवलीत ठिकठिकाणी भाजप आमदार रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्याकडून शिवसेना नेते आणि पालक मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आली आहे. डोंबिवलीच्या विकासाचे मारेकरी शिंदेच आहेत, असे त्यावर लिहिले आहे. हा वादग्रस्त बॅनर चर्चेचा विषय ठरला असून शिवसेना भाजपमधील वादात ठिणगी टाकणारा आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने हा वादग्रस्त बॅनर काढला आहे. आता बॅनर लावल्याप्रकरणी काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. डोंबिवलीचे भाजप आमदार यांच्याकडून आज सकाळी मुंबई येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत डोंबिवलीतील विकास कामासंदर्भात रविंद्र चव्हाण यांनी पुन्हा 472 कोटी रस्त्याच्या विषयावर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले. (Criticism of BJP MLA Ravindra Chavan under the banner of Guardian Minister Eknath Shinde)

डोंबिवलीत ठिकठिकाणी बॅनर लावले

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना एमएमआरडीएच्या माध्यमातून 30 रस्त्याचे क्रॉन्क्रीटीकरण करण्यास मंजुरी देण्यात आली होती. त्याचा डीपीआर तयार केला होता. त्याला निधी देण्यात आला होता. मात्र पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निधी रद्द केला असा आरोप चव्हाण यांनी केला आहे. तसेच विविध विषयावर शिवसेना आणि पालकमंत्र्यांवर हल्लाबोल केला. त्यांची पत्रकार परिषद संपताच डोंबिवली शहरात ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले. या बॅनरवर ‘परम आदरणीय पालकमंत्री एकनाथ शिंदेच डोंबिवलीच्या विकासाचे मारेकरी, भाजप सरकारने मंजूर केलेले प्रमुख 30 रस्ते पालकमंत्र्यांनी रद्द केले’, असे लिहिले होते. या बॅनरवर काही पत्रही लावण्यात आली आहेत. एका पत्रात काही रस्त्यांची यादी नमूद करण्यात आली आहे. दुसऱ्या ठिकाणी हा निधी नामंजूर केल्याचे पत्र आहे. खाली आपला डोंबिवलीकर रविंद्र चव्हाण असे लिहिले आहे.

भाजपचे 8 नगरसेवक शिवसेनेत गेल्यापासून चव्हाण आक्रमक

गेल्या काही दिवसापासून भाजप आमदार रविंद्र चव्हाण हे आक्रमक झाले आहेत. विशेष करुन भाजपचे आठ नगरसेवक शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी हा पावित्र घेतला असल्याची चर्चा आहे. या बॅनरबाजीचे उत्तर कसे देणार याकडे लक्ष लागले आहे. मात्र हा बॅनर महापालिकेने पोलिसांच्या मदतीने काढला आहे. या प्रकरणात बॅनर लावणाऱ्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. (Criticism of BJP MLA Ravindra Chavan under the banner of Guardian Minister Eknath Shinde)

इतर बातम्या

Nawab Malik Arrest : नवाब मलिकांना अटक, आघाडीचे नेते काय करणार? पवारांच्या भेटीनंतर भुजबळांनी कार्यक्रम सांगितला

मलिकांचा राजीनामा घेऊ नका, कंस आणि रावण सुद्धा मारले गेले, संजय राऊत गरजले

Non Stop LIVE Update
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.