डोंबिवलीतल्या पालिकेच्या शाळेची धोकादायक अवस्था, विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या २०० विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. कारण शाळेतील छताचे प्लास्टर निघाले आहेत. भिंतींला तडे गेले आहेत. प्रसाधनगृहाची अवस्था तर त्याहून वाईट आहे.

डोंबिवलीतल्या पालिकेच्या शाळेची धोकादायक अवस्था, विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर
Follow us
| Updated on: Mar 12, 2023 | 3:48 PM
डोंबिवली : आयरे गावात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची लालबहादूर शास्त्री शाळा आहे. या शाळेत 200 गरीब विद्यार्थी शिक्षण घेताय. मात्र या शाळेची दुरावस्था झाल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकीकडे शालेच्या स्लॅबचे प्लास्टर पडतेय ,भिंतीला तडे गेलेत तर दुसरीकडे प्रसाधनगृहाची दुरावस्था झाली आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांनी पालिका प्रशासनाकडे वारंवार दुरुस्तीची मागणी करत पाठपुरावा केला मात्र महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने पालक वर्गात भीतीचे वातावरण असून मोठी दुर्घटना घटनेची शक्यता वर्तवली जात आहे.
डोंबिवली पूर्वेकडील आयरे गावात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची लालबहादूर शास्त्री शाळा ही प्राथमिक शाळा आहे. या शाळेत पहिली ते आठवी पर्यंतचे वर्ग असून यापूर्वी परिसरातील सुमारे 200 गरीब विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत. या शाळेची इमारत वीस वर्षांपूर्वी बांधण्यात आली असून या इमारतीची देखभाल दुरुस्ती अभावी  दुरावस्था झाली असून वर्गातील छताचे प्लास्टर कोसळत आहे.
विद्यार्थी व शिक्षकांसाठी असणारे प्रसाधनगृहाची देखील दुरावस्था झाली असून विद्यार्थ्यांची सुरक्षतेचा प्रश्न  ऐरणीवर आला असून याबाबत शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा देशमुख यांनी महापालिका प्रशासनाकडे याबाबत वारंवार तक्रारी करत लक्ष वेधले. मात्र पालिका प्रशासनाने प्रसाधनगृहांची तात्पुरते डागडुजी केली व  इमारतीची देखभाल दुरुस्ती एप्रिल महिन्यात करण्यात येईल असे उत्तर दिल्याने विद्यार्थ्यांना व शिक्षकांना याच इमारतीत शिक्षण घ्यावे लागत आहे.
मोठी दुर्घटना घडण्याची भीती पालक वर्गात व शिक्षक वर्गाकडून व्यक्त केली जात असून जीवितहानी झाल्यानंतरच पालिका प्रशासन जागा होणार का असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.
Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.