पालघरच्या प्रचारसभेत असताना आईची प्रकृती खालावल्याचा फोन, बैठका आटोपल्यानंतर ती आपल्यात नसल्याचं कळलं: एकनाथ शिंदे

ठाण्याच्या (Thane) गडकरी रंगायतन याठिकाणी एकनाथ शिंदे कुटुंबियांची मुलाखत कलाकार विजू माने (Viju Mane) यांनी घेतली. या वेळी समस्त शिवसैनिक उपस्थित होते. या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला.

पालघरच्या प्रचारसभेत असताना आईची प्रकृती खालावल्याचा फोन, बैठका आटोपल्यानंतर ती आपल्यात नसल्याचं कळलं: एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे
Follow us
| Updated on: Feb 10, 2022 | 7:48 AM

ठाणे : ठाण्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्याच्या (Thane) गडकरी रंगायतन याठिकाणी शिंदे कुटुंबियांची मुलाखत कलाकार विजू माने (Viju Mane) यांनी घेतली. या वेळी समस्त शिवसैनिक उपस्थित होते. या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. माझी आईची परिस्थिती बिकट होती. त्यावेळी आम्ही पालघर मध्ये प्रचार सभेत होते. तेव्हा मला फोन आला की आईची परिस्थिती खालावली आहे. मात्र, मी कोणालाच सांगितले नाही. मात्र मी ज्या वेळी निघालो त्यावेळी त्या ठिकाणचे खासदार राजेंद्र गावित उमेदवार होते. त्या ठिकाणच्या बैठका आटोपल्या मात्र त्यावेळी डॉक्टरांशी संपर्क केला आणि आपली आई आपल्यात नाही हे कळाले, असं एकनाथ शिंदे म्हणाले. टाकीचे घाव सोसल्या शिवाय देवपण येत नाही, एकनाथ शिंदे यांच्या सारखे कोणी नाही, असे कलाकार विजू माने म्हणाले.

घरात वेळ दिला नाही पण आमच्यावर लक्ष

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी त्यांच्या भावना व्यक्त करण्यात आल्या. घरात कधी वेळ दिला नाही पण त्यांचे लक्ष आमच्याकडे होते. मात्र, या कार्यक्रमादरम्यान सेना खासदार श्रीकांत शिंदे भावुक झाले. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिम्मित काल ठाणे गडकरी रंगायतन ठाणे येथे महापौर नरेश मस्के यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे कुटुंबासमवेत उपस्थित होते. तेव्हा दिग्दर्शक विजू माने यांच्यातर्फे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवनावर कुटुंबियांची मुलाखतीचा कार्यक्रम घेण्यात आला.

कोविड रुग्णांना एकनाथ शिंदे भेटायला जायचे

कोविड काळातील आठवणींना उजाळा देत एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कार्यावर एकनाथ शिंदे यांच्या पत्नीला विचारले असता त्यांनी हे कार्य साहेबांनी लोकांसाठी केले आहे. त्यामुळे मी व कुटुंब देवावर विश्वास ठेवत होतो, असे लता शिंदे म्हणाल्या. कोविड काळात अनेक नगरसेवक आणि लोकप्रतिनिधींची स्थिती गंभीर असताना कोविड रुग्णांना ते भेटायला जाणारे ते पहिले मंत्री होते,असं कुटुंबीयांनी सांगितलं. यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व इतर सर्व सगळेच भावुक झाले. एकनाथ शिंदे यांनी विविध ठिकाणी केलेली मदत, मग ती पूर असो वा भूकंप याचं कौतुक करण्यात आलं. एकनाथ शिंदे कुटुंबीयांसाठी घालवण्यात आलेल्या वेळा पेक्षा अधिक वेळ समाजकारणासाठी अधिक वेळ घालावत असल्याचे यावेळी श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

विजू माने यांनी केलेल्या मागणी वरून एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पत्नी साठी गाणे देखील गायले व नातवावरचे प्रेम देखील बोलून दाखवले. तुम देना मेरा साथ मेरा ओ हम नवाब हे गाणे म्हणूत गुलाबाचे फूल एकनाथ शिंदे यांनी पत्नी लता शिंदे यांना देत आपले प्रेम व्यक्त केले.

इतर बातम्या:

राजेश पायलट: ‘दूधवाला’ ते ‘केंद्रीय मंत्री’; इंदिराजींनाही म्हणाले होते, पाकवर बॉम्ब टाकलेत, लाठ्याकाठ्या झेलू शकत नाही?

अमरावती मनपा आयुक्तांवर शाईफेक प्रकरण, आमदार रवी राणांसह दहा कार्यकर्त्यांवर गुन्हा

Eknath Shinde remember his mother during interview by Viju Mane on the occasion of Birthday

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.