AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खारघरमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांकडून कोरोना नियमांचं उल्लंघन, न्यायाधीशांकडून कारवाईचा बडगा

खारघर टोल नाका येथे निवेदन देण्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता बेकायदेशीरपणे गर्दी केल्याप्रकरणी मनसे कार्यकर्त्यावर कारवाई झालीय.

खारघरमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांकडून कोरोना नियमांचं उल्लंघन, न्यायाधीशांकडून कारवाईचा बडगा
| Updated on: Mar 08, 2021 | 7:06 PM
Share

पनवेल : खारघर टोल नाका येथे निवेदन देण्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता बेकायदेशीरपणे गर्दी केल्याप्रकरणी मनसे कार्यकर्त्यावर कारवाई झालीय. खारघर पोलिसांनी या मनसे कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यांच्यावर साथरोग अधिनियम व आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. आज (8 मार्च) त्यांना पोलिसांनी अटक करत कोर्टात हजर केले. कोर्टाने 5 जणांना प्रत्येकी 200 रुपये दंड सुनावला. तसेच जनतेसाठी काम करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचा सज्जड दमही दिला (FIR against MNS activist in Kharghar for violation of Corona regulations).

खारघर टोल नाक्यावर खारघर परिसरात व्यवसाय करणारे टेम्पो चालकांकडून टोल आकारणी केली जात आहे. टेम्पो चालकांना टोल विना परवानगी देण्यात यावी यासाठी मनसेचे जिल्हा अध्यक्ष अतुल भगत, मनसे वाहतूक सेनेचे पनवेल तालुका चिटणीस सुजित सोनवणे, खारघर शहर अध्यक्ष प्रसाद परब यांच्या शाखा अध्यक्ष आदर्श कांबळे आणि जयेश भिसे हे टोल नाक्यावर निवेदन देण्यासाठी गेले होते.

बेकायदेशीर गर्दी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

दरम्यान निवेदन देताना पनवेल महापालिका आणि खारघर पोलिसांची कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नाही. कोरोना काळात बेकायदेशीरपणे साथरोग अधिनियम व आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी खारघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बेकायदेशीर गर्दी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. खारघर परिसरात बेकायदेशीरपणे आंदोलन अथवा मोर्चा काढल्यास गुन्हे दाखल केला जात आहे, अशी माहिती खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी दिली.

निवेदन देताना गुन्हे दाखल केल्याचा मनसेचा आरोप

या प्रकरणावर बोलताना मनसेचे खारघर शहराध्यक्ष प्रसाद परब म्हणाले, “खारघर परिसरात व्यवसाय करणारे टेम्पो चालकास तीनशे रुपये भाडे मिळतात. त्यात खारघर टोल नाक्यावर 130 रुपये टोल द्यावे लागते. त्यात कोरोनामुळे काम नाही, त्यात पेट्रोलचे वाढलेले भाव अशा अनेक अडचणींमुळे टेम्पो चालक त्रस्त आहेत. टेम्पो चालकाना टोलमधून सूट मिळावी यासाठी निवेदन देण्यासाठी गेले होते. निवेदन देताना गुन्हे दाखल करीत आहेत हे अयोग्य आहे.”

हेही वाचा :

महाराष्ट्राची स्थिती धोकादायक वळणावर, राज्य सरकार कडक निर्बंध लावण्याच्या तयारीत

राज्यात 5 महिन्यानंतर कोरोनाचा ब्लास्ट, राज्यातील 6 जिल्हे कोरोनाचे हॉटस्पॉट

पुण्यात कोरोना संसर्ग वाढला, निर्बंधाबाबत अजित पवार लवकरच निर्णय घेणार

व्हिडीओ पाहा :

FIR against MNS activist in Kharghar for violation of Corona regulations

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.