वानखेडे आणि माझा संबंध देशभक्तांचा; फ्लेचर पटेल यांचा खुलासा

| Updated on: Oct 28, 2021 | 5:14 PM

आर्यन खान प्रकरणात मी पंच नाही. त्यामुळे माझ्याशी अधिक सवाल जवाब करण्यात आला नाही, असं सांगतानाच फ्लेचर पटेल यांनी सांगितलं. (fletcher patel questioned by ncb)

वानखेडे आणि माझा संबंध देशभक्तांचा; फ्लेचर पटेल यांचा खुलासा
fletcher patel
Follow us on

ठाणे: आर्यन खान प्रकरणात मी पंच नाही. त्यामुळे माझ्याशी अधिक सवाल जवाब करण्यात आला नाही, असं सांगतानाच फ्लेचर पटेल यांनी सांगितलं. सीआरपीएफ कॅम्पमध्ये एनसीबीच्या कार्यालयात फ्लेचर पटेल यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला.

मला चौकशीसाठी बोलावण्यात आलं. मी त्यासाठी आलो. मी एनसीबीला सहकार्य करण्यासाठी आलो आहे. पण मी आर्यन खान प्रकरणात पंच नव्हतो. तसं मी दिल्लीच्या एनसीबीच्या टीमला सांगितलं आहे. या प्रकरणाशी माझा काही संबंध नसल्याचंही मी स्पष्ट केलं आहे. मी चौकशीला सहकार्य करत आहे पुन्हा बोलवले तर मी येईन, असं पटेल यांनी सांगितलं.

एनसीबीचं काम चांगलं

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हे सातत्याने माझं नाव पुढे आणत आहेत. त्यांनी पंचनामा व्हायरल केला आहे. समीर वानखेडे आणि माझा संबंध हा देशभक्ताचा आहे. त्यांची टीम चांगलं काम करत आहे. आमचे मनोबल वाढवण्यासाठी आम्ही त्यांना कार्यक्रमाला बोलावलं होतं, असं त्यांनी सांगितलं.

दिशाभूल करण्याचे काम

माजी सैनिक म्हणून आम्ही त्यांना मानणारे आहोत. आपल्या पिढीला खराब करण्याचे काम सुरू आहे हे सर्वांना दिसून येत आहे. मात्र या ठिकाणी राजकारण होत आहे. या केसला दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. हे लहान मुलांना देखील समजत आहे. मात्र, आपल्या महाराष्ट्राला अमली पदार्थाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी आपण पुढे येऊन लढाई लढू, असं त्यांनी सांगितलं.

मलिक वेगळे काय करत आहेत?

नवाब मलिक वेगळे काय करत आहेत? असा सवाल करतानाच जातीधर्माचे खेळ आणि करप्शनचा खेळ हे काय नवीन नाही. या प्रकरणात जातीधर्माला आणू नका. समीर वानखेडे ही लढाई सक्षमपणे लढत आहे. त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही त्यांच्या लढाईमध्ये आहोत. आम्ही माजी सैनिक म्हणून सहकार्य करणार आहोत. एनसीबीला ज्या ज्या वेळी मदत लागेल त्यावेळेस सहकार्य करू, असं त्यांनी सांगितलं.

 

संबंधित बातम्या:

Breaking : समीर वानखेडेंना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा! अटकेपूर्वी 3 दिवस आधी नोटीस देण्याचे सरकारला आदेश

आधी भावाचा हार्ट अटॅकने मृत्यू, आता पाळीव बैलाचा बापलेकावर हल्ला, आठवड्याभरात दोन आधार हरपले

MPSC चा धडाका सुरुच, महाराष्ट्र दुय्यम सेवा परीक्षेची घोषणा, PSI, कक्ष अधिकारी, कर निरीक्षकच्या 666 पदांसाठी जाहिरात

(fletcher patel questioned by ncb)