AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Rains : पालघरला रेड, रत्नागिरीला ऑरेंज ॲलर्ट, तर अमरावतीत धरणाचे दरवाजे उघडले; गडचिरोली, नागपुरात पावसाची दाणादाण सुरूच

Maharashtra Rains : विदर्भातील सहा जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. बऱ्याच भागात अद्यापही पूरस्थिती कायम आहे. नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी सर्वाधिक 109 मिमी पावसाची नोंद झाली आहे. नागपूर शहरात 69 मिमी तर जिल्ह्यात 91 मीमी सरासरी पाऊस झाला आहे.

Maharashtra Rains : पालघरला रेड, रत्नागिरीला ऑरेंज ॲलर्ट, तर अमरावतीत धरणाचे दरवाजे उघडले; गडचिरोली, नागपुरात पावसाची दाणादाण सुरूच
पालघरला रेड, रत्नागिरीला ऑरेंज ॲलर्ट, तर अमरावतीत धरणाचे दरवाजे उघडलेImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 14, 2022 | 7:51 AM
Share

वसई: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला पाऊस (Maharashtra Rains) थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. राज्यात सर्वत्रच पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली आहे. आजही जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्याने राज्यातील अनेक भागात शाळा (school), महाविद्यालय आणि विद्यापीठांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी तर परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. हवामान खात्याने वसईला (vasai) रेड ॲलर्ट, रत्नागिरीला ऑरेंज ॲलर्ट दिला आहे. तर अमरावतीत अप्पर वर्धा धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. नागपूर आणि गडचिरोलीत अजूनही पूरस्थिती कायम आहे. त्यामुळे येथील नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. विदर्भ आणि कोकणात अनेकांचं स्थलांतर करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.

हवामान खात्याच्या अंदाजा नुसार पालघर जिल्ह्याला आज दिवसभर रेड अलर्ट जाहीर केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वसई विरारसह सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि कॉलेजला आज सुट्टी जाहीर केली आहे. पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिकराव गुरसल यांनी तसे पत्रक काढले आहे. जिल्ह्यात रेड अलर्ट असला तरी आज सकाळ च्या वेळेत मात्र जिल्ह्यासह वसई, विरार, नालासोपाऱ्यात रिमझिम पाऊस सुरू आहे. शहरात सध्या कुठेही पाणी साचलेले नाही. आभाळ पूर्ण भरून आलेले आहे. त्यामुळे दिवसभरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

जगबुडी, कोदावली इशारा पातळीवर

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाच्या कोसळधारा सुरूच आहे. दक्षिण आणि उत्तर रत्नागिरीत रात्रीपासून पावसाच्या दमदार सरी कोसळत आहे. खेडमधील जगबुडी आणि कोदावली नदी इशारा पातळीवर आली आहे. रत्नागिरी जिल्ह्याला आज आँरेज अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज दुपारी 1 वाजता पोर्णिमेनंतरची भरती आहे. त्यामुळे किनारपट्टी भागातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

बुलडाण्यात पाण्याची चिंता मिटली

गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे बुलडाणा शहर आणि 13 खेड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. येळगाव धरण 55% भरलं आहे. त्यामुळे बुलडाणेकर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. धरणं 55% भरल्याने आता पाण्याची आठ महिन्यांची चिंताही मिटली आहे. तर पाऊस अजूनही सुरूच असून येत्या काही दिवसात धरणाची आणखी पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे. मात्र, तरीही पाण्याचा अपव्यय टाळावा, नळाचे कॉक बंद करून ठेवावे, जेणेकरून दूषित पाण्याचा पुरवठा होणार नाही, असं आवाहन पालिकेकडून करण्यात आलं आहे.

गडचिरोलीत सूर्यारावपली येथील काही नागरिकांना पहाटे सुरक्षित सिरोंचा मुख्यालय येथे स्थलांतरीत करण्यात आलं आहे. जिल्ह्यातील सिरोंचा येथे ज्या अकरा गावांना अलर्ट करण्यात आला होता, त्या भागातील हे नागरिक आहेत. गडचिरोली जिल्ह्यात काल रात्रभर जोरदार पाऊस सुरू होता. सध्या पावसाच्या संततधारा कोसळत आहेत. प्राणहिता नदीला पूर आल्यामुळे नदीची पूरपरिस्थिती झाली आहे.

नागपुरात 24 तासात दहाजण वाहून गेले

विदर्भातील सहा जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. बऱ्याच भागात अद्यापही पूरस्थिती कायम आहे. नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी सर्वाधिक 109 मिमी पावसाची नोंद झाली आहे. नागपूर शहरात 69 मिमी तर जिल्ह्यात 91 मीमी सरासरी पाऊस झाला आहे. नागपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 10 जण वाहून गेले आहेत. आजही जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मोवाड शहरही पावसामुळे तुंबले आहे.

15 भाविकांची अखेर सुटका

भंडारा जिल्हातिल मोहाडी तालुक्यातिल माडगी येथील वैनगंगा नदीच्या पात्रातील नरसिह मंदिरात अडकलेल्या 15 भाविकांना अखेर 19 तासांचा अथक प्रयत्नानंतर सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. यात 7 स्त्रिया व 8 पुरुषांचा समावेश आहे. विशेष म्हणजे राज्य आपत्ती दलामार्फत रेस्क्यूदला मार्फत कालपासून रेस्क्यू करण्याचे काम सुरु होते. मात्र पाण्याचा प्रवाह अधिक जास्त असल्याने त्यांना बाहेर काढणे धोक्याचे झाले होते. त्यामुळे आज अखेर सकाळी त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आहे. हे सर्वजण गुरु पौर्णिमेनिमित्त मंदिरात गेले होते.

अमरावतीत धरणाचे दरवाजे उघडले

पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणाचे 13 पैकी 7 दरवाजे 45 सेमीने उघडले आहेत. धरणाच्या 7 दरवाज्यातून वर्धा नदीपात्रात 500 क्युसेकचा विसर्ग करण्यात आला आहे. अप्पर वर्धा धरण 75 टक्के भरले आहे. धरण क्षेत्रात रात्रीपासून पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे. अमरावती, वर्धा, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.