Kalyan : कल्याणमध्ये घडले प्रामाणिकपणाचे दर्शन, झाडू सुपड्या विकणाऱ्या महिलेनं परत केलं 2 लाखांचे सोन्याचे ब्रेसलेट

कल्याणमध्ये नारळाच्या झावळ्यांपासून तयार केलेल्या केरसुण्या, टोपल्या सुपड्या विकून ही महिला आपला उदारनिर्वाह करते. या महिलेला दुकानासमोर ब्रेसलेट सापडलं. हे ब्रेसलेट सोन्याचं होतं त्याची किंमत दोन लाख रुपये होते. हे ब्रेसलेट स्वतः जवळ ठेवण्याचा मोह तिला झाला नाही कारण तिच्यातला प्रामाणिकपणा जागृत होता. हरवलेले ब्रेसलेट तिने संबंधित इसमाला परत केले.

Kalyan : कल्याणमध्ये घडले प्रामाणिकपणाचे दर्शन, झाडू सुपड्या विकणाऱ्या महिलेनं परत केलं 2 लाखांचे सोन्याचे ब्रेसलेट
झाडू सुपड्या विकणाऱ्या महिलेनं परत केलं 2 लाखांचे सोन्याचे ब्रेसलेटImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 15, 2022 | 8:31 PM

कल्याण : एकीकडे पैसा, दागदागिन्यांसाठी सख्खे पण वैरी होत असल्याचं चित्र असताना कल्याणमध्ये मात्र माणुसकी (Humanity)चं दर्शन घडवणारी घटना उघडकीस आली आहे. एका व्यक्तीचे दोन लाख रुपये किंमतीचे सोन्याचे ब्रेसलेट (Bracelet) एका वृद्ध महिलेने सदर व्यक्तीला परत करत या लोभी जगात आजही प्रामाणिकपणा शिल्लक असल्याचे दर्शन घडवले. जाहिदा शेख (60) असे या महिलेचे नाव आहे. कल्याणमध्ये नारळाच्या झावळ्यांपासून तयार केलेल्या केरसुण्या, टोपल्या सुपड्या विकून ही महिला आपला उदारनिर्वाह करते. या महिलेला दुकानासमोर ब्रेसलेट सापडलं. हे ब्रेसलेट सोन्याचं होतं त्याची किंमत दोन लाख रुपये होते. हे ब्रेसलेट स्वतः जवळ ठेवण्याचा मोह तिला झाला नाही कारण तिच्यातला प्रामाणिकपणा जागृत होता. हरवलेले ब्रेसलेट तिने संबंधित इसमाला परत केले. (In Kalyan a woman showed humanity by returning a bracelet worth Rs 2 lakh)

ब्रेसलेट सापडताच महिलेने त्वरीत वाहतूनक पोलिसांना याची माहिती दिली

कल्याण पश्चिमेकडील रामबाग परिसरात 60 वर्षीय जाहिदा शेख ही आपल्या कुटुंबासह राहते. कल्याण एसीपी कार्यलयाजवळ जाहिदा शेख ही महिला झाडू, सुपड्या, गाळण्यांसह प्लास्टिकचे सामान विकून आपला उदरनिर्वाह करते. तिच्या दोन मुलांचे देखील त्यांच्याच बाजूला स्टॉल्स आहेत. या महिलेला काल सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास रस्त्यात पडलेले सोन्याचे ब्रासलेट सापडले. जहिदा यांनी लालच न दाखवता या ब्रेसलेट बाबत शेजारी असलेल्या वाहतूक पोलिसांना माहिती दिली. तासभराने एक तरुण ब्रेसलेट शोधण्यासाठी या परिसरात आला. त्याने विचारपूस केली असता जाहिदा यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी शहानिशा करत हे ब्रेसलेट याच तरुणाचे खात्री करत ब्रेसलेट या तरुणाला परत केलं. हातावर पोट असतानाही सोन्याचा मोह न दाखवता जहिदा शेख यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल कल्याण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी तिचा सत्कार केला. (In Kalyan a woman showed humanity by returning a bracelet worth Rs 2 lakh)

इतर बातम्या

Thane Murder : धक्कादायक ! नाश्ता दिला नाही म्हणून सासऱ्याकडून सुनेची गोळी झाडून निर्घृण हत्या

Nandgaonkar on Raut: राज ठाकरे बाळासाहेबांच्याच तालमीत वाढलेत, अल्टिमेटमचा गुण त्यांच्यात आलाय; नांदगावकरांचा राऊतांना टोला

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....