AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : मुख्यमंत्र्यांच्याच ठाण्यात महिलेवर शाईफेक, धक्कादायक घटनेनंतर अयोध्या पौळ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, हा तर एका…

ठाकरे गटाच्या सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पौळ यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. तसेच त्यांना मारहाणही करण्यात आली आहे. ठाण्यातील कळवा येथे ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.

Video : मुख्यमंत्र्यांच्याच ठाण्यात महिलेवर शाईफेक, धक्कादायक घटनेनंतर अयोध्या पौळ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, हा तर एका...
Ayodhya Paul Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 17, 2023 | 8:12 AM
Share

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं होम टाऊन असलेल्या ठाण्यातच महिला सुरक्षित नसल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. ठाकरे गटाच्या महाराष्ट्र सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पौळ यांच्यावर ठाण्यात शाई फेक करण्यात आली. तसेच पौळ यांना मारहाणही करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास कळवा येथे घडली आहे. या प्रकरणी अयोध्या पौळ यांनी कळवा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्याच ठाण्यात एका महिलेवर जाहीर कार्यक्रमात शाईफेक करण्यात आल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

या घटनेनंतर ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पौळ यांनी संताप व्यक्त करतानाच गंभीर आरोपही केले आहेत. ठाण्यातील कळवा येथे ठाकरे गटाच्या कार्यक्रमाचा बनाव करून मला या कार्यक्रमाला बोलावण्यात आलं होतं. मला जाणूनबुजून या कार्यक्रमाला बोलावण्यात आलं होतं. इथे आल्यावर हा कार्यक्रम आपल्या गटाचा नसल्याची मला शंका आली. पण कार्यक्रमातून निघणं योग्य नसल्याने मी थांबले.

मला महापुरुषांच्या प्रतिमांना हार घालण्यास सांगण्यात आले. मी महापुरुषांना हार घातले. त्यावेळी एक महिला आली आणि तिने मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केल्याचा माझ्यावर आरोप केला. मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण ते ऐकायला तयारच नव्हते. तेवढ्यात माझ्या अंगावर शाईफेक करण्यात आली. मला मारहाण करण्यात आली, असं अयोध्या पौळ म्हणाल्या.

तो षडयंत्राचा भाग

मला कार्यक्रमाला बोलावून माझ्यावर शाईफेक करण्यात आली. मारहाण करण्यात आली. हे सर्व षडयंत्र होतं. हा षडयंत्राचा भाग होता. षडयंत्र करूनच मला इथे बोलावण्यात आलं होतं. मी सातत्याने सोशल मीडियावर ठाकरे गटाची बाजू मांडत असल्याने मला टार्गेट करण्यात आलं. पण आम्ही अशा हल्ल्यांना भीक घालत नाही. आम्ही आमचं काम करतच राहणार, असं अयोध्या पौळ यांनी स्पष्ट केलं.

तर काय करायचं ते बघू

अयोध्या पौळ यांच्यावर झालेल्या हल्ल्यावर ठाकरे गटाने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या घटनेचा ठाकरे गटाने तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. ठाकरे गटाचे नेते केदार दिघे यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे. अयोध्या पौळ यांच्यावर झालेली शाईफेक आणि मारहाणाची घटना दुर्दैवी आहे..त्यांना षडयंत्र करून बोलावलं गेलं. अयोध्या पौळ यांनी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. रितसर पद्धतीने पोलीस चौकशी करतील याची आम्हाला खात्री आहे. पोलिसांनी त्वरीत कारवाई केली नाही तर आम्हाला काय करायचं ते बघू, असा सूचक इशारा केदार दिघे यांनी दिला आहे.

आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा.
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.