AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हौसेला मोल नाही, भिवंडीच्या शेतकरी उद्योजकाकडून चक्क हेलिकॉप्टर खरेदी

जनार्दन भोईर यांनी चक्क कोणतीही महागडी कार खरेदी न करता थेट आकाशाला गवसणी घालणारे हेलिकॉप्टर खरेदी केले आहे .

हौसेला मोल नाही, भिवंडीच्या शेतकरी उद्योजकाकडून चक्क हेलिकॉप्टर खरेदी
जनार्दन भोईर यांनी हेलिकॉप्टर खरेदी केलेय
| Updated on: Feb 14, 2021 | 4:34 PM
Share

ठाणे: हौसेला मोल नाही हा प्रचलित शब्दप्रयोग बऱ्याच वेळा चेष्टेखातर वापरला जातो.परंतु, भिवंडी तालुक्यातील वडपे या गावातील शेतकरी असलेल्या उद्योजक जनार्दन भोईर यांनी चक्क कोणतीही महागडी कार खरेदी न करता थेट आकाशाला गवसणी घालणारे हेलिकॉप्टर खरेदी केले आहे .जो संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. ( Janardan Bhoir farmer businessman decided to buy helicopter )

भिवंडीत महागड्या गाड्यांची खरेदी

भिवंडी तालुक्यात गोदाम व्यवसाय मोठ्या प्रमाणावर फोफावल्याने या भागात आर्थिक सुबत्ता आल्याने ग्रामीण भागात मर्सिडीझ ,फॉर्च्युनर, बीएमडब्ल्यु,रेंजरोव्हर ,एमजी हेक्टर कंपन्यांच्या कार मोठ्या प्रमाणावर आढळतात .एवढेच नव्हे तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या ताफ्यात वापरली जाणारी कॅडिल्याक ही कार भारतात प्रथम खरेदी करण्याचा बहुमान भिवंडी तालुक्यातील दिवे अंजुर येथील अरुण आर. पाटील या आगरी समाजातील उद्योजकांकडे आहे. आता भिवंडी तालुक्यातील वडपे या गावात राहणारे मूळचे शेतकरी जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करणारे जनार्दन भोईर यांनी चक्क 30 कोटी रुपयांचे हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा निर्णय घेऊन सर्वाना अचंबित केले आहे .

बांधकाम व्यवसायत उडी

घरी गाडी बंगला असताना जनार्दन भोईर यांनी बांधकाम व्यवसायात उतरून आपल्या जमिनीत गोदाम बनविले तर काही विकासकांना जमीन विकसित करायला दिली.यातून आर्थिक सुबत्ता आलेल्या जनार्दन भोईर यांचे व्यवसायानिमित्त उद्योजक, व्यावसायिक, चित्रपटसृष्टीतील व्यक्तिंशी संपर्क आल्याने त्यांनी या नव्या व्यवसायाचे धाडस केले आहे. स्वतःला दुग्ध व्यवसायासाठी पंजाब हरियाणा गुजरात राजस्थान या भागात नेहमी जावे लागते तर व्यावसायिक संबंधातील व्यक्तींना या भागात येण्यासाठी याचा उपयोग होईल. घरी आर्थिक सुबत्ता असल्याने हेलिकॉप्टर घेण्याचा निर्णय घेतल्याचे जनार्दन भोईर यांनी सांगितले.

15 मार्चला मिळणार हेलिकॉप्टर

जनार्दन भोईर यांना हेलिकॉप्टर 15 मार्च रोजी मिळणार असल्याने आज त्यांच्या जागेवर नक्की काय व्यवस्था आहे, याची चाचपणी करण्यासाठी मुंबई येथून काही तंत्रज्ञ हेलिकॉप्टर घेऊन वडपे गावात आले होते .त्याठिकाणी अडीच एकर जागेवर संरक्षक भिंतीसह हेलिपॅड ,हेलिकॉप्टर ठेवण्यासाठी गॅरेज, पायलट, इंजिनिअर,सुरक्षा रक्षक यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे. गावात उतरलेल्या हेलिकॉप्टरमध्ये जनार्दन भोईर यांनी स्वतः न बसता नुकतेट गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या सदस्य मंडळींना फेरफटका मारून आणलं याचं कौतुक होत आहे.

संबंधित बातम्या:

नातवानं नाव काढलं, आजी आजोबांना हेलिकॉप्टर सफर, गावातून जंगी मिरवणूक

Farmers protest: नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट उद्या बंद; माथाडी कामगारही संपावर

( Janardan Bhoir farmer businessman decided to buy helicopter )

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.