नातवानं नाव काढलं, आजी आजोबांना हेलिकॉप्टर सफर, गावातून जंगी मिरवणूक

डॉ.नंदकुमार गोडगे यांनी आजोबा देवराम गोडगे आणि आजी चहाबाई यांना हेलिकॉप्टर सफर घडवली. Nandkumar Godage Helicopter Journey

नातवानं नाव काढलं, आजी आजोबांना हेलिकॉप्टर सफर, गावातून जंगी मिरवणूक
नातवानं आजी आजोबांना हवाई सफर घडवली
Follow us
| Updated on: Jan 12, 2021 | 6:43 PM

अहमदनगर: संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव गावातील नंदकुमार गोडगे (Nandkumar Godage ) यांनी त्यांच्या आजोबांचा 88 वा अभिष्टचिंतन सोहळा अनोख्या पद्धतीनं साजरा केला आहे. गोडगे यांनी त्याचे आजोबा देवराम गोडगे आणि आजी चहाबाई यांना हेलिकॉप्टर सफर (Helicopter)घडवली. नातवाने आजोबांच्या 88 व्या अभिष्टचिंतनाच्या दिवशी हवाई सफर घडवल्यानं आजी-आजोबा दोघेही भारावून गेले. अभिष्टचिंतन सोहळ्याचे औचित्य साधत नातवांनी आपल्या आजी आजोबाचा अभिष्टचिंतन सोहळा प्रेरणादायी बनवला.(Nandkumar Godage travel with Grand Parents via Helicopter from Pune to Chincholi Gurav)

संगमनेर तालुक्यातील चिंचोलीगुरव गावामध्ये गोडगे कुटुंबीय राहतात. या कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ असलेले देवराम आणि चहाबाई ह्या दाम्पत्याने मोठ्या कष्टाने कुटुंबाला सांभाळले. कष्टमय जीवन जगलेल्या या आजी आजोबांना आपण कधी हेलिकॉप्टरमध्ये बसू असे स्वप्नही पडले नसेल.मात्र, डॉक्टर असलेल्या त्यांच्या नातवाने त्यांना हेलिकॉप्टरची सफर घडवलीय. आजोबांचा 88 वा अभिष्टचिंतन सोहळा अविस्मरणीय व्हावा, यासाठी नातवाने ही शक्कल लढवली. आजोबांचा 88 वा अभिष्टचिंतन सोहळा अविस्मरणीय व्हावा यासाठी आजी आजोबांना पुण्याहून संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव या आपल्या गावापर्यंत हेलिकॉप्टरद्वारे हवाई सफर घडवली. नातवानं घडवलेल्या हेलिकॉप्टरसफरीमुळं भारावून गेल्याचं देवराम गोडगे यांनी सांगितलं.

आजी आजोबांची गावातून जंगी मिरवणूक

Devram Godage Helicopter travel

डॉ. नंदकुमार गोडगेंनी आजी आजोबांना हवाई सफर घडवली

हेलिकॉप्टरने (Helicotper) आजी आजोबांचे आगमन झाल्यानंतर त्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर महाराज यांचे किर्तनही आयोजित करण्यात आले होते. हा सर्व सोहळा बघण्यासाठी आणि त्याचा आनंद घेण्यासाठी गावातील नागरीक उपस्थित होते. आपण वाडवडीलांची जिवंतपणीच इच्छापूर्ती करायला हवी. ते गेल्यानंतर दहावा तेरावा मोठा घालण्यात काय अर्थ आहे ? असं डॉ. नंदकुमार गोडगेंनी (Nandkumar Godage) सांगितले.

सर्व ताज्या बातम्यांचे अपडेट्स, पाहा गुड मॉर्निंग महाराष्ट्र, दररोज सकाळी 7 वा. @TV9Marathi वर

माझ्या लग्नावेळी आजोबांनी हत्तीवरुन मिरवणूक काढली होती. आज आजोबांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीनं साजरा करण्याचा निर्णय घेतला. आजी आजोबांनी केलेल्या कष्टाला सलाम करण्यासाठी अभिष्टचिंतन सोहळा आणि हेलिकॉप्टर सफर घडवण्याचा निर्णय घेतल्याचं, डॉ. नंदकुमार गोडगेंनी सांगितले.

संबंधित बातम्या:

Special story | यंदाच्या निवडणुकीचा बाजच न्यारा; ग्रामपंचायतीमध्ये राडा-धुरळा, उमेदवारही टेक्नोफ्रेन्डली

Special Story | ‘वाड्यांचे शहर’ पुणे, फिरण्याचा प्लॅन करताय तर ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या!

शनिवार विशेष : नव्या वर्षात तरी शेतीला दिवसा वीज मिळणार का? शेतकऱ्यांना दिलासा मिळेल?

(Nandkumar Godage travel with Grand Parents via Helicopter from Pune to Chincholi Gurav)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.