शरद पवारांना संपवण्यासाठी सर्व…; जितेंद्र आव्हाडांचा विरोधकांवर जोरदार निशाणा

Jitendra Awhad on Mahayuti And Sharad Pawar : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. लोकसभा निवडणुकीवर बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी महायुतीवर जोरदार निशाणा साधला आहे. शरद पवार यांचं नाव घेत आव्हाडांनी काय म्हटलं? वाचा सविस्तर..

शरद पवारांना संपवण्यासाठी सर्व...; जितेंद्र आव्हाडांचा विरोधकांवर जोरदार निशाणा
Follow us
| Updated on: Jun 11, 2024 | 4:43 PM

लोकसभा निवडणुकीनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटावर टीका केली होती. यावर प्रश्न विचारला असता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. अंजनी दमानिया जे बोलतात ते स्पष्ट बोलतात. राजकारणात कोणीही संपत नसतं. तुम्ही कितीही कोणाला संपवण्याचा प्रयत्न केला तरी तो संपत नसतो. शरद पवारांना संपवण्यासाठी सर्व बाजूने प्रयत्न झाले. तरी शरद पवार आज सुदर्शन चक्र धरून उभे असलेले श्री कृष्ण सारखे दिसतात. जे शिशुपाल होते त्यांचा नायनाट झालाय, असं जितेंद्र आव्हाड म्हणालेत.

मोदींच्या टीकेवर भाष्य

पहिली गोष्ट म्हणजे भटकती आत्मा म्हणणं चूक आहे. एखाद्या ज्येष्ठ 84 वर्षांच्या माणसाबद्दल… शरद पवार फार गांभीर्याने अशा टीका घेत नाहीत. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. पण मराठी माणूस कधीच कोणाच्या निधनावर चर्चा करत नाही. आता हे सर्व विषय बंद करायला हवेत विधानसभा येते त्यावर बोलूया… जनतेने मतपेटी द्वारे दाखवून दिलं. जन्माला घातलेली राष्ट्रवादी जिल्हा 25 वर्ष पूर्ण झाली. ती पवार साहेबांचीच आहे. यावर शिक्कामोर्तब कालच्या सभेतही झालं आणि जनतेने मतपेटीतून देखील दाखवून दिलं आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकांना आता राहिले तरी किती दिवस… 11 सप्टेंबरच्या आसपास आचारसंहिता लागेल. द्यायचं असतं तर आधीच द्यायचं असतं. वर्षाभरापूर्वीच प्लानिंग करायचं असतं. तुम्हाला पक्ष फोडण्यात टाईमच नव्हता. तुम्हाला तुमची पॉलिटिकल अरेरावी दाखवण्यात वेळच नव्हता. 14 जुलैला आम्ही न्यायालयात जाऊ तेव्हा बघू, असं म्हणत आव्हाडांनी निवडणुकीवर भाष्य केलं.

खातेवाटपावर भाष्य

तुम्ही युती धर्माला खरंच मानता का? तुम्ही युती धर्म पाळता का? युती धर्मातल्या आपल्या सहकाऱ्यांचा सन्मान ठेवता का? तुमच्याबरोबर कोणी युती करेल… एकनाथ शिंदे यांचे सात खासदार आहेत. त्यांना तुम्ही किती मंत्रिपद दिले. कुमार स्वामींना किती दिले, चिराग पासवान यांना किती दिले… चिराग पासवान आणि एकनाथ शिंदे एकच संख्येत आहेत. तर चिराग पासवान यांना दोन मंत्रिपदं देता आणि एकनाथ शिंदे यांना एकच राज्यमंत्रिपद देऊन जा घरी सांगता…, असं म्हणत एनडीए सरकारमधील खाते वाटपावर जितेंद्र आव्हाडांनी भाष्य केलं.

Non Stop LIVE Update
युवक काँग्रेस आक्रमक, पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांचा रास्ता रोको
युवक काँग्रेस आक्रमक, पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांचा रास्ता रोको.
ठाण्यात पावसाची जोरदार बॅटिंग, पाणी साचल्याने मोठी वाहतूक कोंडी
ठाण्यात पावसाची जोरदार बॅटिंग, पाणी साचल्याने मोठी वाहतूक कोंडी.
नाशिकचा पेच शिंदे सोडवणार? उमेदवार मागे की दादांना विनंती?
नाशिकचा पेच शिंदे सोडवणार? उमेदवार मागे की दादांना विनंती?.
रत्नागिरीमध्ये मुसळधार, जगबुडी नदी इशारा पातळीवर, पाहा व्हिडीओ
रत्नागिरीमध्ये मुसळधार, जगबुडी नदी इशारा पातळीवर, पाहा व्हिडीओ.
उद्ध्वस्त करणारा तू कोण? भुजबळांच्या टीकेवरून जरांगेंना हाकेंचा सवाल
उद्ध्वस्त करणारा तू कोण? भुजबळांच्या टीकेवरून जरांगेंना हाकेंचा सवाल.
याला शिक्षण द्या आधी, माझ्यासमोर लायकी..., हाकेंचा जरांगेंवर हल्लाबोल
याला शिक्षण द्या आधी, माझ्यासमोर लायकी..., हाकेंचा जरांगेंवर हल्लाबोल.
आता सरकार तुम्हालाही पाणी पाजेल, जरांगेंचा हाकेंना सावधगिरीचा सल्ला
आता सरकार तुम्हालाही पाणी पाजेल, जरांगेंचा हाकेंना सावधगिरीचा सल्ला.
अटल सेतूवर पडल्या भली मोठी भेग, पटोलेंनी केला शिंदे सरकारचा पर्दाफाश
अटल सेतूवर पडल्या भली मोठी भेग, पटोलेंनी केला शिंदे सरकारचा पर्दाफाश.
आम्हाला फसवलं तर...,डिस्चार्ज मिळताच जरांगेंनी गिरीश महाजनांना फटकारलं
आम्हाला फसवलं तर...,डिस्चार्ज मिळताच जरांगेंनी गिरीश महाजनांना फटकारलं.
मर्द-षंढशिवाय ज्यांच्याकडे शब्द नाही, त्यांनी योग करावा, शेलारांचा रोख
मर्द-षंढशिवाय ज्यांच्याकडे शब्द नाही, त्यांनी योग करावा, शेलारांचा रोख.