मंत्री असलो तरी ठाणे महापालिकेला इशारा देतोय, जितेंद्र आव्हाड भडकले

कळवा- मुंब्रा भागातील पाण्याच्या गैरसोयीबद्दल जर ठाणे महापालिकेने दुर्लक्ष केले तर आम्हाला ठाणे महापालिकेकडे पहावे लागेल, असा इशारा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.

मंत्री असलो तरी ठाणे महापालिकेला इशारा देतोय, जितेंद्र आव्हाड भडकले
मंत्री जितेंद्र आव्हाड
Follow us
| Updated on: Oct 10, 2021 | 7:17 PM

ठाणे : कळवा- मुंब्रा भागातील पाण्याच्या गैरसोयीबद्दल जर ठाणे महापालिकेने दुर्लक्ष केले तर आम्हाला ठाणे महापालिकेकडे पहावे लागेल, असा इशारा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. कळवा- मुंब्रा-कौसा भागात गेले चार ते पाच दिवस पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. या संतापाला जितेंद्र आव्हाड यांनी मोकळी वाट करुन दिली. कळवा-मुंब्रावासियांच्या पाणी प्रश्नावर आक्रमक होण्याचा इशारा त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. यावेळी त्यांच्यासोबत शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि युवाध्यक्ष विक्रम खामकर हेदेखील उपस्थित होते.

जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?

पाच दिवसांपासून कळवा- मुंब्रा भागात पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे. ठाणे महापालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे की ठाणेकरांना पाणी देणे! त्यामध्ये ठाणे महापालिका कमी पडत असेल तर पालिकेला विचार करावा लागेल. पाच पाच दिवस कळवाॉ-मुंब्र्याला पाणी न देणे हे योग्य नाही. ते काही सावत्र भाऊ म्हणून तुमच्याकडे आलेले नाहीत. जेव्हा पालिका स्थापन झाली तेव्हापासून कळवा-मुंब्रा ठाण्यातच आहे. असे असताना कळवा- मुंब्र्याला पाणी न मिळणे आता सहन करणार नाही. मी जरी मंत्री असलो तरी ठाणे महापालिकेला इशारा देतोय की, आमच्या पाण्याच्या गैरसोयीकडे दुर्लक्ष केले तर आम्हाला तुमच्याकडे लक्ष द्यावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

ठाणे महापालिकेत शिवसेनेची सत्ता

ठाणे महापालिकेत सध्या शिवसेनेची सत्ता आहे. याशिवाय जितेंद्र आव्हाड यांचं स्थानिक शिवसेनेच्या नेत्यांशी फारसं चांगलं जमत नाही. कारण त्यांच्यातील मतभेद काही दिवसांपूर्वीच समोर आले होते. त्यामुळे शिवसेना विरुद्ध जितेंद्र आव्हाड असा संघर्ष बघायला मिळला होता. शिवसेना आमदारांनी जितेंद्र आव्हाडांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे तक्रार केली आहे. जितेंद्र आव्हाडांच्या कार्यशैलीवर शिवसेना नेते, आमदार आणि मंत्री नाराज होते. यामध्ये उद्योगमंत्री सुभाष देसाई, माजी आमदार विनोद घोसाळकर, राहुल शेवाळे, सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. याआधी आमदार अजय चौधरी यांनीदेखील तक्रार केली होती. त्यानंतर आता पाणी प्रश्नावरुन जितेंद्रा आव्हाडांनी ठाणे महापालिकेला घेरलं आहे.

जितेंद्र आव्हाडांच्या ड्रिम प्रोजेक्टला मुख्यमंत्र्यांची स्थगिती

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ड्रिम प्रोजेक्टला आणि पर्यायानं राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. कारण टाटा कॅन्सर रुग्णालयाला 100 सदनिका देण्याच्या जितेंद्र आव्हाड यांच्या निर्णयाला मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्थगिती देण्यात आली. शिवसेनेचे शिवडीचे आमदार अजय चौधरी यांनी याबाबत तक्रार केली होती. त्यावर तपासून अहवाल सादर करावा तोपर्यंत स्थगिती देण्यात यावी असा शेरा मारत या निर्णयाला स्थगिती दिली होती. महत्वाची बाब म्हणजे काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते टाटा कॅन्सर रुग्णालयाला या सदनिकांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या होत्या. मात्र आता या निर्णयाला स्थगिती दिली गेल्यामुळे आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का मिळाल्याचं पाहायला मिळालं होतं.

मुख्यमंत्र्यांकडून 24 तासांत डॅमेज कंट्रोल

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी टाटा रुग्णालयाला म्हाडाच्या सदनिका देण्याच्या निर्णयाला स्थगिती दिल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं. त्यानंतर 24 तासांत मुख्यमंत्र्यांकडून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्याबाबत खुद्द जितेंद्र आव्हाड यांनी माहिती दिली. टाटा रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांसाठी 100 सदनिका देण्यात येत आहेत. काही स्थानिकांनी विरोध केल्याचं आमदारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्याला स्थगिती दिली. पण मुख्यमंत्र्यांनी मला बोलावून घेतलं आणि सांगितलं की, त्याच परिसरात आजच्या आज जागा शोधून निर्णय घ्या. 15 मिनिटात निर्णय झाला. बॉम्बे डाईंगमध्ये 100 सदनिका देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती आव्हाड यांनी त्यावेळी दिली होती.

हेही वाचा :

तुला पप्पांनी घरी बोलवलंय, नाशकात अल्पवयीन मुलीला गाडीत बसवलं, लॉजवर नेत विनयभंग

ठाण्यातील फ्लेमिंगो अभयारण्याची नवी अधिसूचना लवकरच; मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील विकास कामांचा मार्ग होणार मोकळा!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.