जितेंद्र आव्हाड यांचं थेट पोलिसांना तीन पानी पत्र; माझ्या कुटुंबीयांना ठार मारण्याचा कट…

यासाठी लागणारी आर्थिक निकड ही त्याने स्वःता म्हटल्याप्रमाणे भ्रष्टाचाराच्या रकमेतून केलेली आहे. महेश बाबुराव आहेर हा सर्व सामान्यांसाठी ठाणे महानगरपालिकेतील कर्मचारी असल्याचे भासवतो.

जितेंद्र आव्हाड यांचं थेट पोलिसांना तीन पानी पत्र; माझ्या कुटुंबीयांना ठार मारण्याचा कट...
jitendra awhadImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 16, 2023 | 10:45 AM

ठाणे: ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांची राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना धमकावणारी कथित क्लिप व्हायरल झाली आहे. त्यामुळे ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांना कारवाई करण्याची मागणी केली आहे. आव्हाड यांची पत्नी ऋता आव्हाड यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रारही नोंदवली आहे. तर जितेंद्र आव्हाड यांनी थेट ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकरांना यांना पत्र लिहिलं आहे. मला आणि माझ्या कुटुंबीयांना ठार मारण्याचा कट आहे. आहेर हा संघटीत गुन्हेगारीचा महोरक्या आहे, असा खळबळजनक दावा या पत्रातून करण्यात आला आहे. दरम्यान, आहेर यांच्या मारहाणीप्रकरणानंतर जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जितेंद्र आव्हाड यांचं पत्र जसच्या तसं

प्रति,

हे सुद्धा वाचा

मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक,

वर्तकनगर पोलीस स्टेशन, वर्तकनगर, ठाणे.

विषय : आरोपी नामे महेश बाबुराव आहेर व इतर अनोळखी इसम यांचे विरुद्ध भा. द. वि. कलम 108, 108 (अ), 120 (ब), 302 महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा कलम 3 भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा 7, 11, 12, 13 प्रमाणे तक्रार.

महोदय,

मी तक्रारदार डॉ. जितेंद्र सतिव आव्हाड (आमदार) यांची वरील आरोपी विरुद्धची तक्रार येणे प्रमाणे…

मी, डॉ. जितेंद्र सतिश आव्हाड, 149 मुंब्रा-कळवा विधानसभा मतगार संघातील आमदार असून मी कॅबिनेट मिनिस्टर, गृहनिर्माण, महाराष्ट्र राज्य या पदावर मार्च, 2022 या कार्यकाळात कार्यरत होतो. मी, ठाणे महानगरपालिका अधिकार क्षेत्रात होत असलेल्या बेकायदा बांधकाम व इतर महानगरपालिकेच्या चुकीच्या कार्यपद्धती बाबत मला निदर्शनास आणून दिले असता योग्य ती दाद मागतो.

वरील आरोपी महेश बाबुराव आहेर हे संदिग्ध व अयोग्य कागदपत्रांच्या आधारावर ठाणे महानगरपालिकेत कार्यरत असल्याबाबत मला माहिती मिळाल्याने मी संबंधित कार्यालयातून त्याच्या बाबत माहिती प्राप्त करीत आहे.

महेश आहेर याच्या विरुद्ध भ्रष्टाचाराच्या देखील अनेक तक्रारी वेळोवेळी प्राप्त होत असल्याने त्याबाबत योग्य ती कारवाई व्हावी यासाठी मी संबंधीत अधिकाऱ्यांना संपर्क करीत असल्यामुळे आरोपी याने माझे विरुद्ध व माझी नवविवाहीत मुलगी नताशा जितेंद्र आव्हाड म्हणजेच नताशा अॅलन पटेल व तिचे पती अॅलन पटेल यांच्या बाबत कटकारस्थान करुन घातपात करण्याची दाट शक्यता होती. तद्वंतर मला माझी मुलगी व जावई यांना जिवे ठार मारण्याचा कट केल्याबाबतचा ऑडीओ प्राप्त झाला.

त्या ऑडीओचे अवलोकन केले असता असे निदर्शनास आले कि, आरोपी महेश आहेर याने संघटित गुन्हेगार लोकांशी संपर्क केले आहेत. तसेच त्याचे अंडरवर्ल्डची निगडीत कुख्यात गुंडांशी सलोख्याचे व व्यवहारीक संबंध असून सदर संबंधाच्या माध्यमातून भारत व भारताबाहेर देखील त्याच्या सांगण्यावरून कुणालाही ठार मारणे त्यासाठी सहज शक्य आहे.

सदर ऑडीओ क्लिपचे अवलोकन पुढे असेही स्पष्ट करते की, माझी मुलगी नताशा ही सध्या स्पेन ला असून महेश आहेर याने त्याचे शूटर लावले असून संघटित टोळीच्या सहकार्याने नताशा हीचा स्पेन येथील पत्ता शोधून तिच्या नव-याचा घातपात करायचा किंवा माझे जावई यांच्या वडीलांवर किंवा नातेवाईकांवर अटॅक करुन कुठल्याही परिस्थितीत जावयांना एक दिवसासाठी भारतात येणे भाग पाडून एअरपोर्टपासून फिल्डींग लावून त्याला जीवे ठार मारून टाका.

महेश आहेरचे पुढे असेही म्हणणे आहे की, एअरपोर्टवर पण फिल्डींग लावून ठेवली आहे. प्रत्येक ह्याच्यावर त्याची गेम करणार याच्या पोरीला रडायला लावणार असे देखिल त्या ऑडीओ क्लीम मधून स्पष्ट निष्पन्न होत आहे.

त्याचप्रमाणे सदर क्लिपच्या अनुषंगाने असे स्पष्ट होते की महेश आहेर यांना कुठल्याही परिस्थितीत माझा व माझ्या परिवाराचा काटा काढायचा आहे. यासाठी त्याने भारत व भारताबाहेरही संघटित गुन्हेगारीच्या माध्यमातून व कमविलेल्या बेकायदेशीर संपत्तीतून मला व माझ्या परिवाराला जिवे ठार मारण्याची पूर्ण तयारी करुन एव्हाना त्याच्या अमलबजावणीचे आदेश दिले आहेत असे मला खात्रीपूर्वक समजले आहे.

महेश आहेर यांचे सदर क्लिपमध्ये असेही म्हणणे आहे की, तो डॉन असल्याबाबत सर्वांना गर्व आहे. व तो रोज 10-15 लाख इतकी रक्कम बेकायदा कामांसाठी त्याचा संघटित गुन्हेगारी घटकांना व त्याला मदत करीत असलेल्या अधिकाऱ्यांना वाटप करतो. त्याचे सदर क्लिपमध्ये असेही म्हणणे आहे की, 40-50 लाख रुपये रोज वनस्ट्रोक त्याला येतात व तो सध्यस्थितीत देखील संघटित गुन्हेगारी गैंग शी कनेक्टेड आहे.

माझे पुढे असे म्हणणे आहे की, सदर बाब माझ्या निदर्शनास आल्यास हे स्पष्ट होते की मला व माझ्या कुटुबीयांना महेश आहेर याने जिवे ठार मारण्यासाठी संघटित गुन्हेगारी घटकांचा वापर करुन त्यासाठी आवश्यक ती तयारी करुन आवश्यक कट कारस्थान केलेले आहे. व सदर संघटित गुन्हेगारीच्या माध्यमातून मला माझ्या कुटुंबीयांना ठार मारण्यासाठी पूर्ण तयारी केलेली आहे.

यासाठी लागणारी आर्थिक निकड ही त्याने स्वःता म्हटल्याप्रमाणे भ्रष्टाचाराच्या रकमेतून केलेली आहे. महेश बाबुराव आहेर हा सर्व सामान्यांसाठी ठाणे महानगरपालिकेतील कर्मचारी असल्याचे भासवतो. परंतु वस्तुतः तो एका संघटित गुन्हेगारीचा म्होरत्या असून स्व:ताचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी गुन्हेगारी संघटनेचा वापर करीत आहे.

तरी माझा व माझ्या परिवाराचा जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने केलेले कारस्थान व त्यासाठी आवश्यक असलेल्या संघटित गुन्हेगारीचा व भ्रष्टाचाराच्या पैशाचा दुरुपयोग या सगळ्या बाबी अत्यंत गंभीर व दखलपात्र असल्यामुळे त्याबाबत आपण गुन्हा नोंद करुन कायदेशीर प्रमाणे योग्य तो तपास करावा.

आपला,

जितेंद्र आव्हाड

सोबत जोडीत आहे.

1) आरोपी महेश आहेर याची ऑडीओ क्लिप पेनड्राईव्ह. 2) ऑडीओ क्लिपची ट्रान्सस्क्रीप्ट,

प्रत:

1) मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई,

2) मा. पोलीस आयुक्त, पोलीस आयुक्त कार्यालय, मुंबई.

3) मा. पोलीस आयुक्त, पोलीस आयुक्त कार्यालय, ठाणे,

4) मा. पोलीस अधिक चपत प्रतिबंधक शाखा, ठाणे. 5) मा. पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ-1), पोलीस आयुक्त कार्यालय वा

6) मा. महासंचालकाचार विरोधी विभाग, मुंबई

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.