AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मुख्यमंत्र्यांना देव चांगल्या सद्भावना देवो’, उद्धव ठाकरेंच्या वाढिदवसानिमित्त भाजप आमदाराचं खड्ड्यात बसून होमहवन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून कल्याण पूर्वेचे भाजप आमदार यांनी मुख्यमंत्र्यांच्या दिर्घायुष्यासाठी खड्ड्यात बसून होमहवन करुन उपहासात्मक आंदोलन केलं.

'मुख्यमंत्र्यांना देव चांगल्या सद्भावना देवो', उद्धव ठाकरेंच्या वाढिदवसानिमित्त भाजप आमदाराचं खड्ड्यात बसून होमहवन
उद्धव ठाकरेंच्या वाढिदवसानिमित्त भाजप आमदाराचं खड्ड्यात बसून होमहवन
| Edited By: | Updated on: Jul 27, 2021 | 9:07 PM
Share

कल्याण (ठाणे) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना राज्यासह देशभरातील दिग्गजांपासून ते हजारो कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या. राज्यात अतिवृष्टीमुळे महापूर आणि दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आज वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून कल्याण पूर्वेचे भाजप आमदार यांनी मुख्यमंत्र्यांच्या दिर्घायुष्यासाठी खड्ड्यात बसून होमहवन करुन उपहासात्मक आंदोलन केलं.

आशळे माणोरे रस्त्यावरील खड्ड्यात बसून आंदोलन

कल्याण पूर्व मतदारसंघातील आशळे माणोरे रस्त्यावर खड्डे पडून रस्त्यांची चाळण झालेली आहे. हा रस्ता आता अपघाताला आमंत्रण देणारा ठरत आहे. त्यामुळे या रस्त्यावरील खड्ड्यात बसून भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी होमहवन आंदोलन केले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. मुख्यमंत्र्यांचा वाढदिवसाचं औचित्य साधत भाजप आमदाराने केलेले हे आंदोलन लक्षवेधी आणि चर्चेला कारण ठरलं आहे.

गणपत गायकवाड यांचा गंभीर आरोप

कल्याण पूर्व मतदारसंघात आशेळे आणि माणोरे हा परिसर येतो. या भागातील रस्त्याच्या सिमेंट कॉंन्क्रीटीकरणाच्या कामासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी मंजुरी दिली होती. या रस्त्याच्या कामासाठी 11 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. एमएमआरडीएच्या माध्यमातून हा रस्ता विकसित केला जाणार होता. या रस्ते विकासाच्या कामाला विद्यमान सरकारने रखडवला आहे. त्यामुळे रस्ते विकासाचे काम रखडले आहे, असा आरोप आमदार गणपत गायकवाड यांनी केला आहे. त्यामुळे कल्याण पूर्व भागातील रस्त्यांच्या विकासाला ब्रेक लागला, असा दावा त्यांनी केला आहे.

गणपत गायकवाड नेमकं काय म्हणाले?

“महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! खरंतर भाजपची जेव्हा सत्ता होती त्यावेळी 11 कोटींचा निधी मंजूर झाला होता. या रस्त्याची अवस्था बघितली तर हा रस्ता एक फूटही चांगला नाही. या ठिकाणी जाणीवपूर्वक राजकारण करुन मंजूर केलेला निधी अटकवून ठेवला गेला. त्यामुळे रस्त्याची पूर्ण वाईट अवस्था आहे”, असा आरोप गणपत गायकवाडांनी केला.

‘मुख्यमंत्र्यांना देव चांगल्या सद्भावना देवो’

“कल्याणमध्ये आज महापौर, खासदार, पालकमंत्री शिवसेनेचा आहे. राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे आहेत. असं असताना सुद्धा मी आणलेला फंड जाणीवपूर्वक अडवला गेलाय. म्हणून मुख्यमंत्र्यांना देव चांगल्या सद्भावना देवो, या रस्त्याचं काम लगेच मुख्यमंत्र्यांनी सुरु करावं, अशी माझी विनंती आहे”, असंही गायकवाड यावेळी म्हणाले.

हेही वाचा :

‘उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेता व्हावं पण राष्ट्रवादीपेक्षा मोठं नाही, असं राऊतांना वाटतं’, फडणवीसांचा टोमणा

‘नागपुरातील कोरोना संसर्गाचं प्रमाण कमी, उद्धवजी, आता निर्बंध शिथील करा’; देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.