भूमिपुत्रांची ताकद ! आधी आवेदन, मग आक्रमक, गावकरी भिडताच केडीएमसीला जाग, रस्त्याचं काम सुरु

कल्याणमध्ये 27 गावांचा प्रश्न प्रलंबित आहे, हे सर्वश्रूत आहे. या 27 गावांमधील रस्त्यांची प्रचंड दुरावस्था आहे (KDMC begins road repair work after villagers warn of agitation).

भूमिपुत्रांची ताकद ! आधी आवेदन, मग आक्रमक, गावकरी भिडताच केडीएमसीला जाग, रस्त्याचं काम सुरु

कल्याण : कल्याणमध्ये 27 गावांचा प्रश्न प्रलंबित आहे, हे सर्वश्रूत आहे. या 27 गावांमधील रस्त्यांची प्रचंड दुरावस्था आहे. कल्याण पूर्वेतील मलंगरोडवरील द्वारली गावाजवळ रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. या रस्त्याचे काम व्हावं, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात होती. त्यासाठी स्थानिक नगरसेवक आणि नागरिकांकडून गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा केला जात होता. मात्र, प्रशासनाने त्यांच्या मागणीती दखल न घेतल्याने त्यांनी आक्रमक होण्याचा इशारा दिला. त्यानंतर अखेर महापालिका प्रशासनाला जाग आली (KDMC begins road repair work after villagers warn of agitation).

नेमकं प्रकरण काय?

द्वारली गावातील रस्त्याचे काम सुरु झाले नाही तर आंदोलन करु, असा इशारा स्थानिक नगरसेवक कुणाल पाटील यांनी दिला होता. त्यानंतर महापालिकेला अखेर याबाबत निर्णय घ्यावा लागला. महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी रस्त्या दुरुस्तीच्या कामांचे आदेश दिले. त्यानंतर प्रशासनाने रस्ता दुरुस्तीचे काम सुरु केले (KDMC begins road repair work after villagers warn of agitation).

27 गावातील सगळ्या समस्या दूर करा, नगरसेवकाची मागणी

रस्त्याचे काम सुरु झाल्यामुळे गावकरी आणि नगरसेवक कुणाल पाटील यांनी आयुक्तांचे आभार मानले आहेत. फक्त हाच रस्ता नाही तर 27 गावातील सगळ्या समस्या देखील आयुक्तांनी दूर कारवी अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

दरम्यान, कल्याण मलंग रस्त्यावर खड्ड्यांमुळे अनेक अपघात झाल्याच्या घटना याआधी अनेकवेळा घडल्या आहेत. सध्या रस्ता दोन्ही बाजून बनल्यामुळे अपघाताची संख्या थोडी कमी झालीय. मात्र, द्वारलीच्या रस्त्यावरील खड्ड्यांचे काम रखडले होते. ते काम अखेर पालिकेने हाती घेतले आहे.

हेही वाचा : अनेक दिवसांपासून ग्राहकांची तुफान गर्दी, सहा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह, कल्याणचा डी मार्ट पाच दिवसांसाठी सील

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI