AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज साहेबांचा वाढदिवस, पेट्रोल फक्त 55 रुपयात; कुठे उडाली झुंबड?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज 55 वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने राज्यात ठिकठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याचा एक भाग म्हणून उल्हासनगरातही एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला आहे.

राज साहेबांचा वाढदिवस, पेट्रोल फक्त 55 रुपयात; कुठे उडाली झुंबड?
Distribution Of PetrolImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 14, 2023 | 12:49 PM
Share

उल्हासनगर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 55 व्या वाढदिवसानिमित्त उल्हासनगरमध्ये 55 रुपये लिटर दराने पेट्रोल वाटप करण्यात येत आहे. मनसे विद्यार्थी सेनेने हा उपक्रम आयोजित केला आहे. या अनोख्या उपक्रमाला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला असून पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. अवघ्या 55 रुपये लिटरने पेट्रोल मिळत असल्याने अनेकजण उल्हासनगरच नव्हे तर बदलापूर, अंबरनाथ, कल्याण आणि विठ्ठलवाडी परिसरातूनही आले आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज 55 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने उल्हासनगरमधील मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हा संघटक मनोज शेलार यांनी नागरिकांना अवघ्या 55 रुपये लिटर दराने पेट्रोल वाटप करण्याचा उपक्रम राबवला आहे. उल्हासनगरच्या कॅम्प 5 मधील हिललाईन परिसरातील पेट्रोल पंपावर हे पेट्रोल वाटप सुरू आहे. यासाठी नागरिकांना कूपन वाटप करण्यात येत असून प्रत्येक नागरिकाला 1 लिटर याप्रमाणे 55 रुपये लिटर दराने पेट्रोल वाटप करण्यात येत आहे.

वाहनांच्या रांगाच रांगा

या उपक्रमाला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला असेल पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपाच्या बाहेरपर्यंत वाहन चालकांच्या रांगा लागल्या आहेत. राज ठाकरे यांचा वाढदिवस आमच्यासाठी एखाद्या सणासारखा असून त्यामुळेच हा सण साजरा करण्यासाठी आणि वाढत्या महागाईवर उपाय म्हणून आम्ही 55 रुपयात पेट्रोल वाटप करत असल्याचं मनोज शेलार यांनी यावेळी सांगितलं आहे.

जनतेच्या मनातील मुख्यमंत्री

दरम्यान, राज ठाकरे हे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे बॅनर्स उल्हासनगरमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी लावले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 55 व्या वाढदिवसानिमित्त उल्हासनगरमध्ये लावण्यात आलेल्या या बॅनर्सची सध्या मोठी चर्चा सुरू आहे.

राज यांच्या वाढदिवसानिमित्त उल्हासनगरमध्ये मनविसे जिल्हा संघटक मनोज शेलार यांनी राज ठाकरे यांना शुभेच्छा देणारे बॅनर्स लावले आहेत. या बॅनर्सवर “जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आदरणीय राज साहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!” असा मजकूर छापण्यात आला आहे. तसंच खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमातील काटेरी सिंहासनावर बसलेला राज ठाकरे यांचा फोटो या बॅनरवर छापण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या जनतेचे कोणतेही प्रश्न असतील तरी ते प्रश्न शिवतीर्थ इथे गेल्यावरच सुटतात आणि नागरिकांना न्याय मिळतो. त्यामुळेच जनतेच्या मनातील खरे मुख्यमंत्री हे राज ठाकरे हेच आहेत, अशा भावना यावेळी जिल्हा संघटक मनोज शेलार यांनी व्यक्त केल्या.

Follow Us
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
Jayant Patil | आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा दत्ता मामांना टोला; महिला शेतकरी विधेयकावर खडाजंगी
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?