बाळासाहेबांचा पुतळा उभारलात, आता आनंद दिघेंचाही उभारा; मनसेची मोठी मागणी

बाळासाहेबांचा पुतळा उभारलात, आता आनंद दिघेंचाही उभारा; मनसेची मोठी मागणी
ठाणे-पालघर मनसे जिल्हा अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांकडून ही मागणी करण्यात आली. त्यामुळे आता यावर ठाणे महानगरपालिका काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

त्याकाळी ठाण्यात आनंद दिघे यांना मानणारा खूप मोठा वर्ग होता. त्यामुळे ठाणे म्हणजे आनंद दिघे हे समीकरण रुढ झाले होते. | Anand Dighe

Rohit Dhamnaskar

|

Jan 27, 2021 | 7:19 PM

ठाणे: दक्षिण मुंबईत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आल्यानंतर आता राज ठाकरे यांच्या मनसेने एक मोठी मागणी केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे ठाण्यात शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे (Anand Dighe) यांचा पुर्णाकृती पुतळा उभारला जावा, असे मनसेने म्हटले आहे. (MNS demands to build Anand Dighe statue in Thane like Balasaheb Thackeray)

या मागणीसाठी बुधवारी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणे महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांची भेट घेत त्यांच्याकडे निवेदन सादर केले. ठाणे शहराचा केंद्रबिंदू असलेल्या चिंतामणी चौकात आनंद दिघे यांचा हा पुतळा उभारण्यात यावा, असे या निवेदनात म्हटले आहे. ठाणे-पालघर मनसे जिल्हा अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांकडून ही मागणी करण्यात आली. त्यामुळे आता यावर ठाणे महानगरपालिका काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ठाण्याच्या जडणघडणीत आनंद दिघेंचा मोठा वाटा

ठाण्याच्या जडणघडणीमध्ये आनंद दिघे यांचे बहुमूल्य योगदान आहे. ठाणे शहराच्या विकासासाठी केलेल्या अविश्रांत कामासाठी संपुर्ण ठाणे शहर दिघे साहेबांच्या स्मृती विसरु शकत नाही. त्यामुळेच या शहराच्यावतीने आज त्यांच्या जयंतीनिमित्त आम्ही ही मागणी केल्याचे मनसे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी सांगितले.

आनंद दिघे कोण होते?

आनंद दिघे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील शिवसेनेचे फायरब्रँड नेते होते. ठाणे शहरात शिवसेना रुजवण्यात आणि वाढवण्यात आनंद दिघे यांचे मोठे योगदान आहे. त्याकाळी ठाण्यात आनंद दिघे यांना मानणारा खूप मोठा वर्ग होता. त्यामुळे ठाणे म्हणजे आनंद दिघे हे समीकरण रुढ झाले होते. बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणेच आपल्या वैयक्तिक करिष्म्याच्या जोरावर आनंद दिघे यांनी ठाणेकरांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले होते. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात आनंद दिघे यांचा प्रचंड दबदबा होता. आजही ठाण्यातील जुनीजाणती मंडळी आनंद दिघे यांचे नाव आदराने घेतात.

संबंधित बातम्या:

फुलांची सजावट, आकर्षक रोषणाई, दिग्गजांची मांदियाळी, बाळासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे थाटात लोकार्पण

Balasaheb Thackeray Statue unveiled | बाळासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण, दिग्गजांच्या उपस्थितीत सोहळा

बाळासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण, राज-उद्धव एकत्र

(MNS demands to build Anand Dighe statue in Thane like Balasaheb Thackeray)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें