पैसे भरले तरच मृतदेह मिळेल, खासगी रुग्णालयाची मुजोरी, मनसेच्या दणक्यानंतर वठणीवर

ठाण्यातील कौशल्या मेडिकल फाउंडेशन ट्रस्ट खाजगी रुग्णालयात एका 32 वर्षीय व्यक्तीवर उपचार सुरु होते. या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूनंतर रुग्णालय प्रशासनाने संबंधित व्यक्तीचा मृतदेह नातेवाईंकडे सुपूर्द करण्यास मनाई केली (MNS leader protest in thane against private hospital).

पैसे भरले तरच मृतदेह मिळेल, खासगी रुग्णालयाची मुजोरी, मनसेच्या दणक्यानंतर वठणीवर
खासगी रुग्णालयाने नातेवाईकांना मृतदेह देण्यास नकार दिल्याने मनसे पदाधिकाऱ्याने थेट रुग्णालयाबाहेर झोपून आंदोलन केलं
Follow us
| Updated on: Jun 16, 2021 | 10:44 PM

ठाणे : कोरोना महामारीच्या काळात अनेक रुग्णालयांकडून अव्वाच्या सव्वा बिले आकारून रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना लुटण्याचे प्रकार सुरू होते. बिल कमी भरल्याने नातेवाईकांना मृतदेह देखील दिले जात नव्हते. त्यानंतर अनेक समाजसेवकांनी रुग्णांच्या नातेवाईकांनी त्याला विरोध केला होता. प्रशासनाने याची गंभीर दखल घेत त्यांच्यावर कारवाई करून बिल आकारणीसाठी नवीन नियमावली देखील जारी केली होती. मध्यंतरीच्या काळात अशाप्रकारे रुग्णांना लुटण्याचे प्रमाण कमी झाले होते. मात्र पुन्हा असेच प्रकार घडत असल्याचे समोर येत आहे (MNS leader protest in thane against private hospital).

ठाण्यातील कौशल्या रुग्णालय प्रशासनाची मुजोरी

ठाण्यातील कौशल्या रुग्णालयांमध्ये देखील अशाच प्रकारची एक घटना समोर आली आहे. ठाण्यातील कौशल्या मेडिकल फाउंडेशन ट्रस्ट खाजगी रुग्णालयात एका 32 वर्षीय व्यक्तीवर उपचार सुरु होते. या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूनंतर रुग्णालय प्रशासनाने संबंधित व्यक्तीचा मृतदेह नातेवाईंकडे सुपूर्द करण्यास मनाई केली. जोपर्यंत बिलचे पैसे भरले जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात दिला जाणार नाही, अशी भूमिका रुग्णालयाने घेतील. त्यानंतर मनसे नेते महेश कदम यांनी रुग्णालयाबाहेर झोपून निषेध केला. मनसेच्या या दणक्यामुळे अखेर रुग्णालयाने घाबरुन कोरोनाबाधित मृतदेह अत्यंविधीसाठी नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

नेमकं काय घडलं?

कौशल्या रुग्णालयांमध्ये संदीप तिखे हे 32 वर्षीय युवक कोरोनावर उपचार घेत होते. कोरोनाशी लढा देण्यास ते अपयशी ठरले आणि दुर्दैवाने मंगळवारी (15 जून) रात्री त्यांचा मृत्यू झाला. यानंतर रुग्णालयाने अगोदरच खचलेल्या त्यांच्या नातेवाईकांना बिल भरल्यानंतरच मृतदेह देऊ, अशी भूमिका घेतली. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने संदीपच्या मित्रांनी पैसे गोळा करून 1 लाख 25 हजार रुग्णालयामध्ये आधीच भरले होते. तरीदेखील उरलेले पैसे भरल्यानंतर मृतदेह ताब्यात देऊ, असा रुग्णालयाने पवित्रा घेतला (MNS leader protest in thane against private hospital).

मनसे नेते महेश कदम आक्रमक

ही गोष्ट ठाण्यातील मनसे नेते महेश कदम यांना कळताच त्यांनी रुग्णालयामध्ये धाव घेतली. रुग्णाच्या नातेवाईकांनी आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने  बिल भरू शकत नाही, असे कदम यांनी रुग्णालयाला सांगितले. त्यानंतर वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला. पण रुग्णालयाच्या प्रशासनाने त्याला थारा दिला नाही. त्यानंतर नामुष्कीने महेश कदम यांनी रुग्णालया बाहेरच आंदोलन सुरू केले. त्यांनी चक्क हॉस्पिटलच्या दारात झोपून पैसे माफ करण्याबाबत करण्याची मागणी केली. जोपर्यंत मृतदेह देत नाही तोपर्यंत मी असं झोपून आंदोलन करणार असल्याचे महेश कदम यांनी सांगितले.

अखेर रुग्णालय प्रशासन वठणीवर

काही वेळानंतर हॉस्पिटल प्रशासन खाली आले आणि त्यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, आम्ही त्यांचा मृतदेह देणार आहोत. काही तांत्रिक अडचणींमुळे थोडा वेळ लागलेला आहे. त्यानंतर कौशल्य रुग्णालयाने उरलेले पैसे न घेता मृतदेह परत केला. यासारख्या घटना ठाण्यात अनेक ठिकाणी घडत असतात अनेकांची आर्थिक स्थिती नसताना त्यांना अव्वाच्या सव्वा बिले भरावे लागतात. आता प्रशासन याकडे कसे  बघेल? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा : 

कोरोना कधी होऊन गेला कळलंही नाही; नागपुरात लहान मुलांमध्ये आढळल्या अँटिबॉडिज

Special Report| 2 डोसमधील अंतर वाढवल्यास संसर्गाचा धोका अधिक, अमेरिकेच्या वैद्यकीय सल्लागारांचा दावा

Non Stop LIVE Update
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर.
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट.
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली.
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका.
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे.
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा.