कल्याण : कल्याणनजीक असलेल्या मोहने परिसरातील जुने गावदेवी मंदिर जीर्ण झाल्याने त्या मंदिराचा जिर्णोद्धार करण्यासाठी स्थानिकांनी मंदिराचे नव्याने बांधकाम सुरु केले. महापालिकेचे सहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी या बांधकामाला बेकायदेशीर ठरवीत कारवाई केली. या कारवाई विरेाधात स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले. माजी नगरसेवक मुकुंद कोट यांनी प्रभाग कार्यालयात पोहचून सहाय्यक आयुक्त सावंत यांच्या कानशीलात लगावली. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी मुकंद कोट यांच्यासह 15 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर राजकारण तापले आहे.