केडी’यम’सी रस्ते होणार!; पण कधी?, मीम्स, मिमिक्री नंतर आता डोंबिवलीत मनसेचं पोस्टर वॉर

ठाण्यातील खड्ड्यांचा मुद्दा गाजल्यानंतर आता मनसेने कल्याण-डोंबिवलीतील खड्ड्यांवरून शिवसेनेसह कल्याण-डोंबिवली महापालिकेला घेरलं आहे. (mns worker's poster war in dombivli over potholes in city)

केडी'यम'सी रस्ते होणार!; पण कधी?, मीम्स, मिमिक्री नंतर आता डोंबिवलीत मनसेचं पोस्टर वॉर
poster
Follow us
| Updated on: Sep 28, 2021 | 12:50 PM

डोंबिवली: ठाण्यातील खड्ड्यांचा मुद्दा गाजल्यानंतर आता मनसेने कल्याण-डोंबिवलीतील खड्ड्यांवरून शिवसेनेसह कल्याण-डोंबिवली महापालिकेला घेरलं आहे. आधी मीम्स, मिमिक्रीनंतर आता डोंबिवलीतल पोस्टरबाजी सुरू केली आहे. केडी’यम’सी रस्ते होणार!; पण कधी? असे उपरोधिक फलक लावून मनसेने महापालिकेवर टीका केली आहे. तर मनसेच्या या उपरोधिक पोस्टरने डोंबिवलीकरांचं लक्ष वेधून घेतले आहे. (mns worker’s poster war in dombivli over potholes in city)

यंदाच्या पावसाळ्यात कल्याण-डोंबिवली शहरातील सर्वच रस्त्यांची चाळण झाली असून रस्त्यावरील खड्ड्यातून मार्ग काढताना वाहन चालक मेटाकुटीला आले आहेत. डोंबिवली एमआयडीसीतील निवासी भागातील रस्त्यांवरील खड्ड्यांचे फोटो व्हायरल करत यापूर्वी चंद्रावरून सफर केल्याचा आनंद अनुभवत असल्याचे टोले मनसेने लगावले गेले होते. आता या खड्ड्यात बाबत वेगवेगळे बॅनर आणि होर्डिंग्ज लावत सत्ताधाऱ्यांना जाब विचारला आहे. डोंबिवली एमआयडीसीमध्ये मनसेकडून लावण्यात आलेल्या KD “यम” C ….रस्ते होणार! पण ….कधी? हा बॅनर चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. याच भागातील रस्ते काँक्रिटीकरणासाटी कोट्यवधींचा निधी मंजूर झाल्याचे बॅनर या परिसरात अनेकदा झळकले असून प्रत्यक्षात मात्र रस्त्यांची दुर्दशा कायम आहे. यामुळे बॅनरवरील निधी प्रत्यक्षात यावा आणि नागरिकांची खड्ड्यांतून सुटका व्हावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

खड्ड्यांवरुन राजकारण पेटलं

दरम्यान, कल्याण-डोंबिवली शहरातील खड्ड्यांवरुन भाजपचे दोन्ही स्थानिक आमदार आक्रमक झाले आहेत. “ठाण्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांची पालकमंत्री पाहणी करतात. त्यानंतर अधिकाऱ्यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई केली जाते. त्यामुळे कल्याण शीळ रस्त्याच्या निकृष्ट दर्जाचं काम आणि केडीएमसी हद्दीतील रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी देखील अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे”, अशी मागणी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केली आहे. तर भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी खड्ड्यांसाठी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यापेक्षा शासनाने रस्त्यांच्या कॉन्क्रीटीकरणासाठी करण्यासाठी निधी दिला पाहिजे, असं मत मांडलं आहे.

गणपत गायकवाड नेमकं काय म्हणाले?

“दोन वर्षापूर्वी कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरीकांचे बळी गेले होते. त्यानंतरही रस्त्यावरील खड्डे भरले जात नाही. रस्ते भरण्याच्या कामावर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. मग दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यावरील खड्डयाचा प्रश्न कायम निर्माण होतो. केवळ कल्याण-डोंबिवलीत नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यात खड्ड्यांचे साम्राज्य आहे. इतकेच नाही तर कल्याण शीळफाटा रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. रस्त्याचे काम सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचे आहे. मात्र जो रस्ता तयार केला आहे. त्यावर खड्डे दिसत नसले तरी गाडी आदळत जाते. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधातही कारवाई केली गेली पाहिजे”, अशी मागणी गणपत गायकवाड यांनी केली.

रविंद्र चव्हाण नेमकं काय म्हणाले?

दरम्यान, भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना निलंबीत करण्यापेक्षा रस्ते कॉन्क्रीटीकरणाचे काम केले तर त्याचा फायदा नागरीकांना होईल. रस्ते कॉन्क्रीटीकणाची जबाबदारी शासनाची आहे. त्यासाठी पैसे देण्याची जबाबदारी शासनाची आहे. शासनाने पैसे दिले पाहिजे, असे मत मांडले. (mns worker’s poster war in dombivli over potholes in city)

संबंधित बातम्या:

खड्ड्यांवरुन राजकारण पेटलं, भाजपचे दोन्ही आमदार आक्रमक, रविंद्र चव्हाणांचा पालकमंत्र्यांवर निशाणा

VIDEO : फरसाण खाताय तर सावधान! कचऱ्यातून फरसाण वेचणाऱ्या इसमाचा व्हिडिओ व्हायरल

रस्त्यांचं निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांविरुद्ध कारवाईची नोटीस, ठाणे महापालिका अ‍ॅक्शन मोडमध्ये

(mns worker’s poster war in dombivli over potholes in city)

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.