Hanuman Jayanti : अंबरनाथमध्ये मनसेच्या मुस्लिम पदाधिकाऱ्याने हनुमान मंदिरात घेतलं दर्शन

राज ठाकरे यांच्या भूमिकेवर नाराजी दर्शवत पक्षातल्या काही मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. तर दुसरीकडे अंबरनाथमध्ये मात्र मनसेचे मुस्लिम शहर उपाध्यक्ष एहसामोद्दीन खान यांनी आज हनुमान जयंती निमित्त थेट हनुमान मंदिरात जात हनुमानाचं दर्शन घेतलं. यावेळी मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष धनंजय गुरव हेदेखील त्यांच्यासोबत होते.

Hanuman Jayanti : अंबरनाथमध्ये मनसेच्या मुस्लिम पदाधिकाऱ्याने हनुमान मंदिरात घेतलं दर्शन
अंबरनाथमध्ये मनसेच्या मुस्लिम पदाधिकाऱ्याने हनुमान मंदिरात घेतलं दर्शनImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 16, 2022 | 11:28 PM

अंबरनाथ : सध्या मशिदीवरील भोंग्यांबाबतच्या राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भूमिकेवरून राज्यातलं वातावरण तापलेलं असतानाच अंबरनाथमध्ये मनसेचे मुस्लिम शहर उपाध्यक्ष एहसामोद्दीन खान यांनी आज हनुमान जयंती (Hanuman Jayanti) निमित्त हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेचं समर्थन करत मी पक्ष कधीच सोडणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत मशिदीवरील भोंगे उतरवा अन्यथा मशिदीसमोर हनुमान चालीसा लावू, असा इशारा दिला होता. त्यानंतर ठाण्यात झालेल्या उत्तर सभेत त्यांनी 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम भोंगे उतरवण्यासाठी दिला होता. या पार्श्वभूमीवर राज्यातलं वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. (Muslim mns activist of MNS visit Hanuman Temple in Ambernath)

खान यांच्याकडून राज ठाकरेंच्या भूमिकेचे समर्थन

राज ठाकरे यांच्या भूमिकेवर नाराजी दर्शवत पक्षातल्या काही मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. तर दुसरीकडे अंबरनाथमध्ये मात्र मनसेचे मुस्लिम शहर उपाध्यक्ष एहसामोद्दीन खान यांनी आज हनुमान जयंती निमित्त थेट हनुमान मंदिरात जात हनुमानाचं दर्शन घेतलं. यावेळी मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष धनंजय गुरव हेदेखील त्यांच्यासोबत होते. यानंतर बोलताना मुसलमानांनी मंदिरात जाणं किंवा हिंदूंनी मशिदीत जाणं, यात गैर काय आहे? असं त्यांनी म्हटलं. तसंच राज ठाकरे हे फक्त कायदा पाळायलाच सांगत असून त्यात काहीही चुकीचं नसल्याचंही खान म्हणाले.

पक्षाचा राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही : धनंजय गुरव

राज ठाकरे यांच्या भूमिकेनंतर राज्यात इतर पक्षांकडून जे राजकारण सुरू आहे, ती फक्त स्टंटबाजी असून कायद्याचं सर्वांनीच पालन केलं, तर कायदा-सुव्यवस्था बिघडणार नाही असंही खान म्हणाले. आपण राज साहेबांना कधीच सोडणार नसून पक्षाचा राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. तर एकीकडे पक्षातील काही पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे यांची भूमिका न समजल्यामुळे ते पक्ष सोडून जात आहेत, मात्र आमच्याकडे एहसामोद्दीन खान यांच्यासारखे एकनिष्ठ पदाधिकारी सुद्धा आहेत, असं यावेळी मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष धनंजय गुरव यांनी सांगितलं. (Muslim mns activist of MNS visit Hanuman Temple in Ambernath)

इतर बातम्या

TMC Commissioner : लोकमान्य-सावरकर नगर परिसरातील सुशोभिकरणाची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

CCTV : उल्हासनगरमध्ये भीषण अपघात सीसीटीव्हीत कैद, भरधाव टेम्पोनं दुचाकीवरच्या जोडीला बेधडक उडवलं, कमजोर दिलवाले ना देखे

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.