आदिवासी पाड्यावर घरकूल योजना राबवा, अनुसूचित जाती, जमाती आयोगाच्या म्हाडा, केडीएमसीला सूचना

आदिवासी पाड्यावर घरकूल योजना राबवा, अनुसूचित जाती, जमाती आयोगाच्या म्हाडा, केडीएमसीला सूचना
आदिवासी पाड्यावर घरकूल योजना राबवा, अनुसूचित जाती, जमाती आयोगाच्या म्हाडा, केडीएमसीला सूचना

कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेज परिसरात असलेल्या आदिवासी पाड्याला केंद्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य अनंता नायक यांनी आज भेट दिली. या पाड्यावर घरकूल योजना राबविण्यात यावी. तसेच अन्य नागरी सोयी सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशी सूचना अनंता नायक यांनी म्हाडा आणि केडीएमसी प्रशासनाला केली आहे.

अमजद खान

| Edited By: भीमराव गवळी

Feb 14, 2022 | 4:47 PM

कल्याण: कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेज परिसरात असलेल्या आदिवासी पाड्याला (adivasi pada) केंद्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे (sc st commission) सदस्य अनंता नायक (ananta nayak) यांनी आज भेट दिली. या पाड्यावर घरकूल योजना राबविण्यात यावी. तसेच अन्य नागरी सोयी सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशी सूचना अनंता नायक यांनी म्हाडा आणि केडीएमसी प्रशासनाला केली आहे. यावेळी म्हाडा आणि केडीएमसीचे पदाधिकारीही उपस्थित होते. या परिसरातील आदिवासींच्या समस्यांबाबत आयोगाकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. या संदर्भात दिल्लीतही बैठका झाल्या होत्या. त्यानंतर आज अनंता नायक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अचानक आदिवासी पाड्यात येऊन पाहणी केली. या टीमने प्रत्येक गल्लीत जाऊन पाहणी केली. तसेच आदिवासींना मिळणाऱ्या नागरी सुविधांचीही पाहणी केली. येथील रहिवाश्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच भंबेरी उडाली होती.

कल्याण पश्चिमेला बिर्ला कॉलेजनजीक असलेल्या आदिवासी पाड्यावर कोणत्याही प्रकारच्या नागरी सोयी सुविधा पुरविल्या जात नसल्याची तक्रार भाजप अनूसूचित जाती जमाती मोर्चाचे प्रभारी राहूल देठे यांनी अनुसूचित जाती, जमाती आयोगाकडे केली होती. त्यांच्या तक्राराची आयोगाने गंभीर दखल घेतली. आयोगाचे सदस्य अनंता नायक यांनी आज बिर्ला कॉलेज परिसरातील आदिवासी पाड्यास अचानक भेट दिली. यावेळी म्हाडा आणि केडीएमसी प्रशासनाचे अधिकारी उपस्थीत होते. या पाड्यावर 25 आदिवासी कुटुंबे राहतात. शहराच्या मध्यभागी असलेल्या पाड्यावर नागरी सोयी सुविधा नाहीत. या पाड्यावर स्वच्छता गृह नाही. महापालिकेने त्याठिकाणी फिरते शौचालय दिले होते. त्याचीही दुरावस्था झालेली आहे. या ठिकाणी शौचालयाच्या कामाला मंजूरी दिली आहे. हे काम लवकरच सुरु केले जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी यावेळी नायक यांना दिली.

दिल्लीत बैठक झाली होती

या पाड्यावरील नागरिकांचे पुनर्वसन करण्याची मागणी करण्यात आली आहे. ही जागा म्हाडाची आहे. म्हाडाकडे महापालिकेडून घरकूल योजनेचा प्रस्ताव आल्यास त्याचा निर्णय घेतला जाईल, असे नायक यांनी यावेळी सांगितले. याठिकाणी घरकूल योजना लवकर राबवा, असे निर्देशही नायक यांनी प्रशासनाला दिल्या. केंद्रीय आयोगाला ज्या ठिकाणाहून तक्रारी प्राप्त होतात, त्याठिकाणी आयोगाकडून प्रत्यक्ष पाहणी केली जाते. या भागाची तक्रार प्राप्त झाल्याने आपण प्रत्यक्ष पाहणी केली असल्याचे नायक यांनी स्पष्ट केलं.. या पाड्यांवरील तक्रारीसंदर्भात दिल्ली येथे बैठकही घेतली होती असेही त्यांनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या:

केडीएमसीच्या प्रभाग रचनेत घोळात घोळ, उल्हासनगरचा काही भाग दाखवला केडीएमसीत; आमदार गायकवाड म्हणतात…

मुलीचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस आईच्या जीवावर, पालघरमध्ये शेजारी कुटुंबांत हाणामारी, 46 वर्षीय महिलेचा मृत्यू

यूपी, बिहारचा मुख्यमंत्री ओबीसी ठरवू शकतो, तर महाराष्ट्रातील मुख्यमंत्री का ठरवू शकत नाही?; जितेंद्र आव्हाडांचा सवाल

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें