Big Breaking : तारीख आणि वेळ लिहून घ्या, शिंदे-फडणवीस सरकारचं काऊंटडाऊन सुरू झालंय; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार जास्त दिवस राहणार नसल्याचा दावा केला आहे. तुम्ही तारीख आणि वेळ लिहून ठेवा, या सरकारचं काऊंटडाऊन सुरू झालं आहे, असा दावा मिटकरी यांनी केला आहे.

Big Breaking : तारीख आणि वेळ लिहून घ्या, शिंदे-फडणवीस सरकारचं काऊंटडाऊन सुरू झालंय; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
Shinde-Fadnavis GovernmentImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 16, 2023 | 7:27 AM

बदलापूर : राष्ट्रवादीचे नेते, आमदार अमोल मिटकरी यांनी मोठा आणि खळबळजनक दावा केला आहे. जाणीवपूर्वक दबाव टाकून राष्ट्रवादी काँग्रेसला फोडण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला जात असल्याचा धक्कादायक आरोप अमोल मिटकरी यांनी केला आहे. मिटकरी यांच्या या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. इतकेच नव्हे तर या सरकारचं काऊंटडाऊन सुरू झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. हे सरकार फार दिवस टिकणार नाही. तारीख आणि वेळ लिहून घ्या, या सरकारचा काउंटडाऊन सुरू झाला आहे, असा दावा आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे सरकार बदलाच्या चर्चेला आणखी जोर आला आहे.

अमोल मिटकरी बदलापुरात आले होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला. राष्ट्रवादीवर जाणीवपूर्वक दबाव टाकून राष्ट्रवादी फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. याबाबत अमोल मिटकरी यांना विचारलं असता त्यांनी राऊतांच्या म्हणण्याशी सहमती दर्शवली. राऊत साहेबांच्या मताशी मी सहमत असून सत्ताधाऱ्यांकडून जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेसवर दबाव टाकून पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण त्यांचा हा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही, असं अमोल मिटकरी यांनी स्पष्ट केलं.

हे सुद्धा वाचा

दादांना बदनाम करण्याचा प्रयत्न

अजित पवार यांच्याबद्दल सुरू असलेल्या चर्चांबाबत मिटकरी यांना विचारण्यात आलं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ज्या अंजली दमानिया यांचा राजकारणाशी काहीही संबंध नाही, त्या याबाबत ट्विट करतात आणि त्याच्या बातम्या बनतात, हे आश्चर्यकारक आहे. अजितदादा हे राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत आणि त्यांची जबाबदारी त्यांना पूर्णपणे माहिती आहे. आता ज्या काही घडामोडी टीव्हीवर दाखवल्या जात आहेत, त्यात अजिबात तथ्य नाही. हा दादांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे, असं मिटकरी म्हणाले.

म्हणून सरकार राहणार नाही

राज्यातलं सध्याचं सरकार हे जास्त दिवस टिकणार नसल्याचाही दावाही त्यांनी केला. आजची तारीख आणि वेळ लिहून घ्या, हे सरकार जास्त दिवस टिकणार नाही आणि राज्यात लवकरच एक नवीन महाविकास आघाडीचं सरकार येईल, असं त्यांनी सांगितलं. राज्यात शेतकरी अडचणीत असून अकोला जिल्ह्यात तिसऱ्यांदा गारपीट झाली आहे. मात्र कृषी विभागाकडून अद्याप कोणतेही पंचनामे करण्यात आलेले नसून शेतकऱ्यांना कोणतीही भरपाई सुद्धा मिळालेली नाही. त्यामुळे हे सरकार जर राम राज्याची वल्गना करत असेल, तर या राम राज्यात शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसंच या सरकारला शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नसून फक्त स्वतःची पब्लिसिटी आणि हवाई दौरे करायचे यातच सरकार गुंतलेलं आहे, म्हणून हे सरकार जास्त दिवस राहिल असं मला वाटत नाही, असं त्यांनी म्हटलंय.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.