ठाण्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये बाचाबाची, आव्हाड-शिंदे यांच्या समोर असं का झालं?

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे राज्यात जरी एकत्र असले तरी स्थानिक पातळीवरची खदखद पुन्हा बाहेर आली आहे, या सगळ्या वादाला सुरूवात बॅनरबाजीवरून झाली.

ठाण्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये बाचाबाची, आव्हाड-शिंदे यांच्या समोर असं का झालं?
jitendra-awhad
Follow us
| Updated on: Jan 15, 2022 | 4:45 PM

  ठाणे : आज ठाण्यात कळवा येथील खारीगावमध्ये उड्डाणपुलाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) दोन पक्षातील कार्यकर्ते पुन्हा एकदा आमनेसामने आल्याचे दिसून आले. जितेंद्र आव्हाड आणि एकनाथ शिंदेंच्या उपस्थित हा कार्यक्रम सुरू होण्याआधी राष्ट्रवादी (Ncp) आणि शिवसेनेचे (Shivsena) कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसून आले, हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे राज्यात जरी एकत्र असले तरी स्थानिक पातळीवरची खदखद पुन्हा बाहेर आली आहे, या सगळ्या वादाला सुरूवात बॅनरबाजीवरून झाली. कळव्यातील खारीगाव उड्डाणपुलाच्या लोकार्पणावरून श्रेयवाद उफाळून आला. कार्यक्रमाच्या सुरूवातीला शिवसेनेचे बॅनर दिसून आले, त्यामुळे राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक झाले, काही वेळातच नंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बॅनर लावले. महाविकास आघाडीतील कार्यकर्ते आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही अनेकदा कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत.

श्रेयवादाची लढाई बाचाबाचीपर्यंत

राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांनी बॅनर लावल्यानंतर मोठा हायव्होल्टेज ड्रामा सुरू झाला. काही वेळातच हा वाद फक्त बॅनरबाजीवर थांबला नाही तर थेट हमरातुमरीवर पोहोचला. यावेळी पाठपुरावा आम्ही केला आणि बॅनरबाजी तुमची हा दोन्हीकडील कार्यकर्त्यांचा समज होत. कार्यकर्ते तर एकमेकांना भिडलेच, मात्र नगरसेवकही मागे राहिले, यावेळी नगरसेवाकांमध्येही जोरदार बाचाबाची झाली. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक उमेश पाटील आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक महेश साळवी शाब्दिक चकमक देखील बघायला मिळाली.

एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

ठाण्यातील खारीगाव उड्डाणापुलाचा लोकार्पण सोहळा आज फार पडतोय. ठाण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी मंत्री जितेंद्र आव्हाडही स्टेजवर एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपस्थ होते, मात्र कार्यकर्त्यांना याचेही भान राहिले नाही. या उड्डाणपुलामुळे ठाणेकरांची मोठ्या वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.

काँग्रेसशी युतीवरून वडेट्टीवारांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर, युतीबाबत वडेट्टीवार म्हणतात…

आता रस्त्यांसाठी जमीन गेली तर मोबदला कमी मिळणार! कारण सांगताना अजित पवारांनी गडकरींकडे बोट दाखवलं

PDCC Bank Chairman : अजित पवार यांचं धक्कातंत्र, पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्षपदी सुनील चांदेरेंची वर्णी

Non Stop LIVE Update
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.