AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टायगर इज बॅक! ‘फादर्स डे’ला पूर्वेश सरनाईकांचं सूचक ट्विट

Pratap Sarnaik | काही दिवसांपूर्वी ठाण्यात प्रताप सरनाईक यांच्याविरोधात पोस्टरबाजी करण्यात आली होती. सक्तवसुली संचलनालयाकडून चौकशीचा ससेमिरा मागे लागल्याने गेल्या काही महिन्यांपासून प्रताप सरनाईक गायब आहेत.

टायगर इज बॅक! 'फादर्स डे'ला पूर्वेश सरनाईकांचं सूचक ट्विट
प्रताप सरनाईक
| Edited By: | Updated on: Jun 20, 2021 | 10:44 AM
Share

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून सक्तवसुली संचलनालयाच्या (ED) कारवाईमुळे अडचणीत सापडलेले शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांचा मुलगा पूर्वेश सरनाईक याने ‘फादर्स डे’च्या निमित्ताने सूचक ट्विट केले आहे. या ट्विटसोबत प्रताप सरनाईक यांच्या एका सभेचा फोटो जोडण्यात आला आहे. या फोटोला ‘टायगर इज बॅक’, अशी कॅप्शन देण्यात आली आहे. मात्र, या फोटोमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. प्रताप सरनाईक हे आता परतल्यानंतर राजकीय विरोधकांना प्रत्युत्तर देणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (Shivsena Leader Pratap Sarnaik son Purvesh Sarnaik tweet on father’s day)

काही दिवसांपूर्वी ठाण्यात प्रताप सरनाईक यांच्याविरोधात पोस्टरबाजी करण्यात आली होती. सक्तवसुली संचलनालयाकडून चौकशीचा ससेमिरा मागे लागल्याने गेल्या काही महिन्यांपासून प्रताप सरनाईक गायब आहेत. त्यामुळे ‘ओवळा-माजिवाडा मतदारसंघ वाऱ्यावर, आमदार महोदय कागदावर’, ‘ओवळा-माजीवाड्याचे आमदार हरवले आहेत, आपण त्यांना पाहिलंत का?’ अशा आशयाचे पोस्टर्स ठाण्यात लावण्यात आले होते.

ED आणि CBIचे धाडसत्र

मागील महिन्यात ED आणि CBI ने प्रताप सरनाईक यांच्या लोणावला इथल्या एका रिसॉर्टवर एकत्रितरित्या धाड टाकली होती. त्याबरोबर मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात ED ने प्रताप सरनाईक यांचे घर आणि कार्यालयावर धाडी टाकल्या होत्या. त्यानंतर ED ने प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगा विहंग यांचीही चौकशीही केली होती. ही चौकशी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्याचे त्यांनी म्हटले होते. तसेच भविष्यात आपण ED ला सहकार्य करण्यासाठीही तयार असल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले होते. तत्पूर्वी ईडीने टॉप ग्रुप आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी 25 नोव्हेंबरला अमित चांदोळे यांची ED ने कसून चौकशी केली होती. त्यानंतर अमित चांदोळे यांना अटकही करण्यात आली होती. अमित चांदोळे हे प्रताप सरनाईक यांचे व्यावसायिक भागीदार होते.

काय आहे टॉप्स सिक्युरिटी घोटाळा?

टॉप्स ग्रुपकडून MMRDA ला 175 कोटींच्या कंत्राटासाठी 7 कोटींची लाच देण्यात आली होती. टॉप्स सिक्युरिटीचे माजी कर्मचारी रमेश अय्यर यांनी 28 ऑक्टोबरला तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल केला होता.

राहुल नंदा यांच्या टॉप्स सिक्युरिटीकडून 100 पैकी फक्त 70 टक्के गार्ड्स वापरले जायचे. 30 टक्के गार्ड्सचा वापर केला जात नव्हता. म्हणजेच जवळपास 150च्या आसपास गार्ड्स वापरले जात नव्हते. मात्र त्याची रक्कम सगळी टॉप्सच्या ग्रुपला मिळत होती. त्यातील काही रक्कम लाच म्हणून अमित चांदोळे आणि संकेत मोरे यांना मिळत असल्याचीही माहिती तपासातून उघड झाली होती. यापैकी काही वाटा प्रताप सरनाईक यांना मिळत असल्याचा संशय ED ला आहे.

संबंधित बातम्या :

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हरवले आहेत! ठाण्यात पोस्टरबाजी, चर्चेला उधाण

Pratap Sarnaik | ‘ईडी’च्या कार्यालयात खेळीमेळीच्या वातावरणात चौकशी : प्रताप सरनाईक

हे कॉर्पोरेट वॉर, माझा राजकीय बळी देण्याचा प्रयत्न; प्रताप सरनाईक यांचा आरोप

(Shivsena Leader Pratap Sarnaik son Purvesh Sarnaik tweet on father’s day)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.