शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हरवले आहेत! ठाण्यात पोस्टरबाजी, चर्चेला उधाण

'ओवाळा-माजिवाडा मतदारसंघ वाऱ्यावर, आमदार महोदय कागदावर', 'ओवाळा-माजीवाड्याचे आमदार हरवले आहेत, आपण त्यांना पाहिलंत का?' अशा आशयाची पोस्टरबाजी सरनाईक यांच्याविरोधात करण्यात आल्याचं ठाणे परिसरात पाहायला मिळत आहे.

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हरवले आहेत! ठाण्यात पोस्टरबाजी, चर्चेला उधाण
प्रताप सरनाईकांविरोधात ठाण्यात बॅनरबाजी
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सागर जोशी

Jun 16, 2021 | 3:18 PM

ठाणे : बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात अडचणीत आलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्याविरोधात ठाणे परिसरात पोस्टरबाजी करण्यात आलीय. सक्तवसुली संचलनालयाकडून चौकशीचा ससेमिरा मागे लागल्याने गेल्या काही महिन्यांपासून प्रताप सरनाईक गायब आहे. त्यामुळे ‘ओवळा-माजिवाडा मतदारसंघ वाऱ्यावर, आमदार महोदय कागदावर’, ‘ओवळा-माजीवाड्याचे आमदार हरवले आहेत, आपण त्यांना पाहिलंत का?’ अशा आशयाची पोस्टरबाजी सरनाईक यांच्याविरोधात करण्यात आल्याचं ठाणे परिसरात पाहायला मिळत आहे. सरनाईक यांच्याविरोधात सक्तवसुली संचलनालय आणि केंद्रीय अन्वेषण विभागानं मोठी चौकशी सुरु केली आहे. (Poster campaign in Thane area about the disappearance of MLA Pratap Sarnaik)

ED आणि CBIचे धाडसत्र

मागील महिन्यात ED आणि CBI ने प्रताप सरनाईक यांच्या लोणावला इथल्या एका रिसॉर्टवर एकत्रितरित्या धाड टाकली होती. त्याबरोबर मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात ED ने प्रताप सरनाईक यांचे घर आणि कार्यालयावर धाडी टाकल्या होत्या. त्यानंतर ED ने प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगा विहंग यांचीही चौकशीही केली होती. ही चौकशी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्याचे त्यांनी म्हटले होते. तसेच भविष्यात आपण ED ला सहकार्य करण्यासाठीही तयार असल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले होते.

तत्पूर्वी ईडीने टॉप ग्रुप आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी 25 नोव्हेंबरला अमित चांदोळे यांची ED ने कसून चौकशी केली होती. त्यानंतर अमित चांदोळे यांना अटकही करण्यात आली होती. अमित चांदोळे हे प्रताप सरनाईक यांचे व्यावसायिक भागीदार होते.

काय आहे टॉप्स सिक्युरिटी घोटाळा?

टॉप्स ग्रुपकडून MMRDA ला 175 कोटींच्या कंत्राटासाठी 7 कोटींची लाच देण्यात आली होती. टॉप्स सिक्युरिटीचे माजी कर्मचारी रमेश अय्यर यांनी 28 ऑक्टोबरला तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल केला होता.

राहुल नंदा यांच्या टॉप्स सिक्युरिटीकडून 100 पैकी फक्त 70 टक्के गार्ड्स वापरले जायचे. 30 टक्के गार्ड्सचा वापर केला जात नव्हता. म्हणजेच जवळपास 150च्या आसपास गार्ड्स वापरले जात नव्हते. मात्र त्याची रक्कम सगळी टॉप्सच्या ग्रुपला मिळत होती. त्यातील काही रक्कम लाच म्हणून अमित चांदोळे आणि संकेत मोरे यांना मिळत असल्याचीही माहिती तपासातून उघड झाली होती. यापैकी काही वाटा प्रताप सरनाईक यांना मिळत असल्याचा संशय ED ला आहे.

संबंधित बातम्या :

Pratap Sarnaik | ‘ईडी’च्या कार्यालयात खेळीमेळीच्या वातावरणात चौकशी : प्रताप सरनाईक

हे कॉर्पोरेट वॉर, माझा राजकीय बळी देण्याचा प्रयत्न; प्रताप सरनाईक यांचा आरोप

Poster campaign in Thane area about the disappearance of MLA Pratap Sarnaik

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें