हे कॉर्पोरेट वॉर, माझा राजकीय बळी देण्याचा प्रयत्न; प्रताप सरनाईक यांचा आरोप

हे कॉर्पोरेट वॉर, माझा राजकीय बळी देण्याचा प्रयत्न; प्रताप सरनाईक यांचा आरोप

हे कॉर्पोरेट वॉर असून माझा राजकीय बळी देण्याचा प्रयत्न झाला, असा दावा शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यानी केला. (pratap sarnaik slams bjp over ed enquiry)

भीमराव गवळी

|

Dec 08, 2020 | 6:16 PM

मुंबई: हा प्रताप सरनाईक तानाजी मालुसरे आहे. प्रत्येक संकटातून बाहेर येईल, असं सांगतानाच हे कॉर्पोरेट वॉर असून माझा राजकीय बळी देण्याचा प्रयत्न झाला, असा दावा शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यानी केला. (pratap sarnaik slams bjp over ed enquiry)

प्रताप सरनाईक आणि त्यांचे चिरंजीव विहंग सरनाईक व पूर्वेश सरनाईक यांनी आज सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले. त्यानंतर मीडियाशी संवाद साधताना प्रताप सरनाईक यांनी ही प्रतिक्रिया दिली. मी तानाजी मालुसरे सारखा आहे. प्रत्येक संकटातून बाहेर येईल. माझी संपत्ती एवढी मोठी असेल तर त्याचा मला आनंद आहे, असं सांगतानाच पराग शहा, सुधाकर शेट्टी, मंगलप्रभात लोढा, अर्णव गोस्वामी यांची संपत्तीही अमाप आहे, असं ते म्हणाले. अभिनेत्री कंगना रणौतची संपत्ती तपासली का? हिमाचलची पोरगी मुंबईत संपत्ती कमावते. त्याचे काय? असा सवाल त्यांनी केला.

ईडी सांगेल तेव्हा चौकशीला जाईल

मी रिक्षा चालवायचो. मेहनत करून इथे आलो. जे राजकारण सुरू आहे. ते सर्वांनाच माहीत आहे. ईडी जेव्हा बोलावेल, तेव्हा मी चौकशीला जाईल. हे कॉर्पोरेट वॉर आहे. नेमका हा काय घोळ सुरू आहे, ते मला माहीत नाही. मी पूर्वी जसा होतो, तसाच आताही आहे. फक्त माझ्या पत्नी आणि मुलांना या सर्व प्रकरणात नाहक त्रास देण्यात आला याचं दु:ख आहे, असं सरनाईक म्हणाले.

भाजप विरुद्ध आघाडी लढाई

ही लढाई भाजपविरुद्ध महाविकास आघाडी अशी आहे. त्यात सरनाईक यांचा बळी देण्याचा प्रयत्न झाला. मला कुणी कितीही ऑफर दिली तरी मी शिवसैनिकच राहील. भाजपच्या षडयंत्राला कधीच बळी पडणार नाही, असंही ते म्हणाले. राज्यातील आघाडी सरकार पाच नव्हे 25 वर्षे राहणार असल्याचंही त्यांनी ठणकावून सांगितलं.

जे होईल ते योग्यच होईल: विहंग

यावेळी विहंग सरनाईक यांनीही मीडियाशी संवाद साधला. जे होईल ते योग्यच होईल. सत्यमेव जयते, अशी प्रतिक्रिया विहंग यांनी व्यक्त केली. माझी पत्नी आजारी असल्याने मी ईडीच्या चौकशीला जाऊ शकलो नाही. मी ईडीला पत्रं लिहून कळवलं होतं. पण तरीही नोटिसा पाठवत राहिले. त्यांनी समन्स बजावले आहे. आम्ही त्याला उत्तर देऊ, असं सांगतानाच काय बरोबर आणि काय चूक हे लोकांनीच ठरवावं असंही ते म्हणाले. (pratap sarnaik slams bjp over ed enquiry)

संबंधित बातम्या:

प्रताप सरनाईक काही साधू संत नाही, नारायण राणेंची ईडीच्या कारवाईवर प्रतिक्रिया

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर-कार्यालयावर ईडीचे छापे, सुपुत्र विहंग सरनाईक चौकशीसाठी ताब्यात

कोण आहेत प्रताप सरनाईक?

(pratap sarnaik slams bjp over ed enquiry)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें