Rickshaw Strike : रिक्षाचालकांच्या संपात फूट; संपात सहभागी न होणाऱ्या व्यवसायिकांकडून पोलीस संरक्षणाची मागणी

कल्याण डोंबिवलीत (Kalyan Dombivli) रिक्षा बंदवरून (Rickshaw Strike) सध्या चांगलचं वातावरण पेटलंय. संपामध्ये फूट पडल्याचे चित्र आहे.

Rickshaw Strike : रिक्षाचालकांच्या संपात फूट; संपात सहभागी न होणाऱ्या व्यवसायिकांकडून पोलीस संरक्षणाची मागणी
Follow us
| Updated on: Jul 29, 2022 | 12:03 PM

ठाणे : कल्याण डोंबिवलीत (Kalyan Dombivli) रिक्षा बंदवरून (Rickshaw Strike) सध्या चांगलचं वातावरण पेटलंय. कोकण रिक्षा (Rickshaw) टॅक्सी चालक संघटनांकडून 1 ऑगस्ट पासून अनिश्चित कालावधीसाठी रिक्षा बंदची हाक देण्यात आलीये. मात्र या बंदमध्ये आम्ही सहभागी होणार नाही असं कल्याण डोंबिवलीतील काही रिक्षा संघटनांकडून स्पष्ट करण्यात आलंय. इतकंच नाही तर आमच्या जीवाला धोका आहे, त्यामुळे आम्हाला पोलीस संरक्षण द्या अशी मागणीही संपात सहभागी होऊ न इच्छिणाऱ्या रिक्षा संघटनांच्या सदस्यांकडून करण्यात आली आहे. सीएनजीच्या दरात मागील वर्षभरात 28 रुपयांची वाढ झाली असतानाही रिक्षा भाडे वाढविण्यात आलं नाही . वारंवार मागणी करूनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याने कोकण रिक्षा टॅक्सी चालक संघटनांकडून 1 ऑगस्टपासून अनिश्चित कालावधीसाठी संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र आता या संपात फूट पडल्याचे चित्र असून, कल्याण, डोंबिवलीमधील काही रिक्षा संघटनांकडून या संपात सहभागी होण्यास नकार देण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

सीएनजीच्या दरात मागील वर्षभरात 28 रुपयांची वाढ झाली असतानाही रिक्षा भाडे वाढविण्यात आलं नाही . वारंवार मागणी करूनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याने कोकण रिक्षा टॅक्सी चालक संघटनांकडून 1 ऑगस्ट पासून अनिश्चित कालावधीसाठी संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. अद्यापही भाडेवाढ झालेली नाही. त्यामुळे  कोकण रिक्षा टॅक्सी चालक संघटना संपावर जाण्याची शक्यता आहे. कोकण विभागातील 4 जिल्ह्यातील सुमारे 2 लाख 50 हजार रिक्षा चालक या संपात सहभागी होणार असल्याचा दावा देखील या संघटनेकडून करण्यात आला आहे. मात्र ही संघटना वगळता इतर अनेक रिक्षा चालक संघटनांनी या संपाला विरोध दर्शवला आहे.  इतकंच नाही तर ज्यांनी संप पुकारला आहे त्यांच्यपासून आमच्या जीवाला धोका आहे असे सांगत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याण परिमंडळ – 3चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांची भेट घेऊन निवेदन देखील दिले आहे.

हे सुद्धा वाचा

सीएनजीच्या दरात वाढ सुरूच

एकीकडे पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. मात्र दुसरीकडे सीएनजी आणि पीएनजीच्या दरात गेल्या वर्षभरापासून सातत्याने वाढ सुरूच आहे. गेल्या वर्षभरात सीएनजीचे दर 28 रुपयांनी वाढल्याचा दावा रीक्षाचालकांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे रिक्षाच्या भाड्यात देखील वाढ करण्यात यावी अशी मागणी रिक्षाचालकांनी केली आहे.

Non Stop LIVE Update
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे.
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट.