वेल कम भाई, जेलमधून सुटलेल्या भाजपच्या माजी नगरसेवकाच्या बॅनरवर शिवसेना नेत्याचा फोटो

prajwal dhage

|

Updated on: Apr 23, 2021 | 6:52 PM

तीन वर्षांपासून कोठडीत अलेल्या माजी भाजप नगरसेवकाच्या स्वागतासाठी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा फोटो वापरण्यात आलाय. (bjp corporator eknath shinde shrikant shinde)

वेल कम भाई, जेलमधून सुटलेल्या भाजपच्या माजी नगरसेवकाच्या बॅनरवर शिवसेना नेत्याचा फोटो
KALYAN MAHESH PATIL BANNER

Follow us on

ठाणे : अपक्ष नगरसेवकाच्या हत्येप्रकरणी तब्बल तीन वर्षे न्यायालयीन कोठडीत असलेले भाजपचे माजी नगसेवक महेश पाटील ( Mahesh Patil) यांचं कल्याणमध्ये जंगी स्वागत करण्यात आलंय. महेश पाटील यांच्या समर्थकांनी त्यांच्या नावाने वेलकम भाई म्हणत कल्याणमधील शीळ रस्त्यावर भलेमोठे बॅनर लावले आहे. विशेष म्हणजे तीन वर्षांपासून कोठडीत असलेल्या भाजपच्या माजी नगरसेवकाच्या स्वागतासाठी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा फोटो वापरण्यात आलाय. या बॅनरवर शिंदेंसह इतर नेत्यांचा फोटो झळकल्यामुळे एकच आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. (supporters welcomes murder accused former BJP corporator Mahesh Patil with big banner on which photos of Shivsena leader Eknath Shinde and Shrikant Shinde appeared)

नेमका प्रकार काय ?

कल्याण डोंबिवली महापालिकेचे अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हत्येची सुपारी 2018 मध्ये एका टोळीला देण्यात आली होती. त्यानंतर एका लुटीच्या प्रकरणात ठाणे ग्रामीण पोलिसांनी काही आरोपीना जेरबंद केले होते. त्या आरोपींपैकी एकाने खुलासा केल्यानंतर कुणाल पाटील हत्या प्रकरण पुन्हा उजेडात आले होते. कुणाल पाटील यांच्या हत्येची सुपारी घेतली होती, असे यातील एका आरोपीने सांगितले होते. त्यानंतर या सुपारी प्रकरणात तत्कालीन भाजप नगरसेवक महेश पाटील आणि त्यांचे सहकारी सुजीत नलावडे, विजय बाकडे यांना अटक केली गेली होती. त्यानंतर आता तब्बल तीन वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयाने महेश पाटील यांचा जामीन अर्ज काही अटींसह मंजूर केला आहे.

बॅनरवर एकनाथ शिंदेंचा फोटो

महेश पाटील यांची सुटका झाल्यानंतर कल्याण आणि ठाण्यात त्यांचे जंगी स्वागत करण्यात येत आहे. त्यांच्या समर्थकांनी अनेक ठिकाणी मोठे बँनर्स लावले आहेत. कल्याण शीळ रस्त्यावर एका ठिकाणी भल्या मोठ्या बॅनरवर तर ‘वेलकम भाई’ असे लिहण्यात आलेय. विशेष म्हणजे या बॅनरवर शिवसेना नेते आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा फोटोही आहे. कोठडीतून सुटून आलेल्या भाजपच्या माजी नगरसेवकाच्या बॅनरवर शिवसेना नेत्यांचे फोटो झळकल्याने राजकीय चर्चेला उधाण आली आहे.

इतर बातम्या :

ऐन लॉकडाऊनमध्ये अंबानींची ब्रिटनमध्ये फुल्ल टू शॉपिंग, ऐतिहासिक स्टोक पार्कची खरेदी

मोठी बातमी ! देशात 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य मिळणार, मोदी सरकारचा मोठा निर्णय

दिवसा शाळा, रात्री गायनपार्ट्या, लतादीदींनीही कौतुक केलेली ही गायिका माहीत आहे का?

(supporters welcomes murder accused former BJP corporator Mahesh Patil with big banner on which photos of Shivsena leader Eknath Shinde and Shrikant Shinde appeared)

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI