Thane Accident : खड्ड्याचा आणखी एक बळी! खड्ड्यामुळे तोल गेला, मागून येणाऱ्या केडीएमटीच्या बसने तरुणाला चिरडलं, जागीच मृत्यू

Thane Accident News : पाच जुलैलाही ठाण्यात खड्ड्यामुळे तोल जाऊन एका तरुणाचा अपघात झाला होता.

Thane Accident : खड्ड्याचा आणखी एक बळी! खड्ड्यामुळे तोल गेला, मागून येणाऱ्या केडीएमटीच्या बसने तरुणाला चिरडलं, जागीच मृत्यू
खड्ड्यामुळे जीव गेला?Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 16, 2022 | 1:40 PM

ठाणे : केडीएमटी (KDMT Bus Accident) बसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू (Thane Accident News) झाला. नेवाळी खोणी गावातील नाक्याजवळ ही दुर्दैवी घटना घडली. सदर तरुण हा दुचाकीवरुन जात होता. प्रवासादरम्यान, या तरुणाच्या दुचाकीला केडीएमसीच्या बसने धडक दिली. खड्ड्यामुळे या तरुणाच्या गाडीचा तोल गेला आणि त्यानंतर मागून येणाऱ्या बसने धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जाते आहे. खड्ड्यामुळे (Pothole killed Bike rider) आणखी एका तरुणाचा जीव गेल्याचं या घटनेमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. शनिवारी सकाळी केडीएमटीच्या कल्याण-पनवेल बस क्रमांक 20 ने नेवाळी खोणी गाव नाक्याजवळ MH 05 8225 नंबरच्या दुचाकीला धडक दिली होती. या धडकेत दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला.

अपघाताचा तपास सुरु

या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर लगेचच पोलिसांना कळवण्यात आलं. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघाताचा पंचनामा केली. दरम्यान, नेमका हा अपघात कुणाच्या चुकीमुळे झाला, याचा तपास पोलीस करत आहेत. खड्ड्यामुळे तोल जाऊन हा अपघात घडला की बस चालकाच्या चुकीने तरुणाच्या दुचाकीला धडक दिली, याचा शोध पोलिसांकडून घेतला जातो आहे.

पाच जुलैलाही खड्ड्यामुळे बळी

पाच जुलैलाही ठाण्यात खड्ड्यामुळे तोल जाऊन एका तरुणाचा अपघात झाला होता. खड्ड्यामुळे तो जाऊन खाली पडलेल्या तरुणाच्या शरीरावरुन भरधाव एसटी धडधडत गेली होती आणि त्यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता. दरम्यान, मुसळधार पावसामुळे सध्या रस्त्यांची चाळण झाली आहे. बहुतांश ठिकाणी खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीही होत आहे. तर दुचाकीस्वारांच्या खड्ड्यांमधूनच जीवघेणा प्रवास सुरु आहे.

हे सुद्धा वाचा

रस्त्यांची चाळण

गेल्या काही दिवसांत मुसळधार पावसाने महाराष्ट्रातील बहुतांश भागाला झोडपून काढलं आहे. त्यानंतर आता रस्त्यांची दुर्दशा झाली असून खड्डे बुजवण्याचं आव्हान प्रशासनासमोर आहे. याआधीही अनेकांनी खड्ड्यांमुळे रस्ते अपघातात जीव गमावला असून प्रशासन खड्डे बुजवण्याचासाठी युद्धपातळीवर केव्हा काम करणार, असा प्रश्न संतप्त लोकांकडून विचारला जातोय.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.