Thane: पावसाळ्यात उघड्यावरचे खाणे म्हणजे रोगांना आमंत्रण; ठाण्यात साथीच्या रोगांचे रुग्ण वाढले

ठाणे,  गेल्या पाच दिवसांपासून होत असेल्या मुसळधार पावसामुळे (Thane rain update) जनजीवन विस्कळीत झाले आहे.  पाऊस आणि हवामानातील बदल, यामुळे तापासह साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे.  नुकत्याच कोरोनाच्या (Corona) विळख्यातून बाहेर निघालेल्या नागरिकांना आता नव्या आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.  पावसाळ्यात पचनक्रिया मंदावते आणि रोगप्रतिकारशक्ती कमी होत असल्याने संसर्गजन्य आजारांची लागण होते. पावसाळ्यात  […]

Thane: पावसाळ्यात उघड्यावरचे खाणे म्हणजे रोगांना आमंत्रण; ठाण्यात साथीच्या रोगांचे रुग्ण वाढले
‘फास्ट फूड’ खाण्याचे व्यसन हे पालकांच्या पिण्याच्या सवयींशी जोडलेले असू शकते
Follow us
| Updated on: Jul 15, 2022 | 12:20 PM

ठाणे,  गेल्या पाच दिवसांपासून होत असेल्या मुसळधार पावसामुळे (Thane rain update) जनजीवन विस्कळीत झाले आहे.  पाऊस आणि हवामानातील बदल, यामुळे तापासह साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे.  नुकत्याच कोरोनाच्या (Corona) विळख्यातून बाहेर निघालेल्या नागरिकांना आता नव्या आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.  पावसाळ्यात पचनक्रिया मंदावते आणि रोगप्रतिकारशक्ती कमी होत असल्याने संसर्गजन्य आजारांची लागण होते. पावसाळ्यात  दूषित पाणी पिण्यात आल्याने पोटाचे विकार होतात. यात अतिसार, गॅस्ट्रो, कावीळ, टायफॉडड, तसेच काविळीचीही लागण होते. यासाठी पाणी उकळून पिण्याचे आवाहन डॉक्टरांकडून व केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य विभागाकडून केले जाते. डेंग्यू हा विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. डेंग्यू तापाचा प्रसार हा स्वच्छ पाण्याच्या साठ्यात उत्पत्ती होणाऱ्या एडिस डासापासून होतो.

यासाठी आठवड्यातील एक दिवस संपूर्ण कोरडा दिवस पाळण्याचे आवाहनही केले जाते. पावसाळा सुरू झाला की, विविध आजारही वाढू लागतात. सध्या कधी जोरदार, तर कधी रिपरिप पडणाऱ्या पावसामुळे बदललेल्या हवामानात शहरातील विविध भागांमधील दवाखाने तापासह अन्य साथीच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांनी भरलेले आहेत.

पाण्याबाबत विशेष काळजी घेणे आवश्यक

पावसाळ्याच्या दिवसात बऱ्याच ठिकाणी दूषित पाण्याचा पुरवठा होतो. आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांनी गाळून आणि उकळून पाणी वापरावे असे आवाहन दरवर्षी केडीएमसीकडून केले जाते. पावसाच्या संततधारेमुळे धरण, तसेच नद्यांमधील पाणी गढूळ होण्याची दाट शक्यता असते. त्यावर मनपाच्या जल केंद्रात प्रक्रिया करून, पिण्यायोग्य पाणी नागरिकांपर्यंत पोहोचविले जाते, परंतु त्यानंतरही प्रक्रिया केलेले पाणी काही प्रमाणात गढूळ असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वैद्यकीय आरोग्य प्रशासनाकडून पाणी गाळून, उकळून पिण्याकडे सातत्याने लक्ष वेधले जाते.

हे सुद्धा वाचा

पावसाळ्यात शिळे आणि बाहेरचे पदार्थ खाणे टाळा

पावसाळ्यात बाहेरचे पदार्थ खाणे टाळले पाहिजे.  दूषित अन्न खाल्ल्यामुळे पोटाचे विविध आजार, उलट्या, जुलाब, अतिसार,कॉलरा, कावीळ यासारखे आजार होतात. उघड्यावरील खाद्यपदार्थांवर माशा बसतात. ते अन्न खाल्यास कॉलरा, पटकी यासारख्या आजारांची लागण होते.

Non Stop LIVE Update
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.