कॉम्युटर सायन्सचा पदवीधर, युट्यूब व्हिडीओ पाहून बनावट नोटा छापण्याची आयडिया सूचली; अख्खी गँग जेरबंद

भिवंडीतील गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असतानाच आता शहरातून बनावट नोटा छापणारी टोळीच जेरबंद करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या टोळीतील एक तरुण कॉम्युटर सायन्सचा पदवीधर आहे. (three held with fake currency notes with Rs 1 lakh face value)

कॉम्युटर सायन्सचा पदवीधर, युट्यूब व्हिडीओ पाहून बनावट नोटा छापण्याची आयडिया सूचली; अख्खी गँग जेरबंद
सांकेतिक फोटो

भिवंडी: भिवंडीतील गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असतानाच आता शहरातून बनावट नोटा छापणारी टोळीच जेरबंद करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या टोळीतील एक तरुण कॉम्युटर सायन्सचा पदवीधर आहे. युट्यूबवरील व्हिडीओ पाहून त्याला बनावट नोटा छापण्याची आयडिया सूचली होती. त्यानंतर काही जणांना एकत्र करून या गँगने नोटा छापण्याचा धडाका लावला होता. अखेर शांतीनगर पोलिसांना त्यांना जेरबंद करण्यात यश आलं आहे. (three held with fake currency notes with Rs 1 lakh face value)

शांतीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पाटील यांना साईबाबा मंदिर कल्याण रोड या परिसरात एक इसम बनावट नोटा एका व्यक्तीस देण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. ही माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा कारवाई करण्यात आली. पोलिसांनी कल्याण रोडवरील साईबाबा मंदिर परिसरात सापळा रचला आणि अहमद नाजम नाशिककर (वय 32) याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडून 1 लाख किमतीच्या 500 रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. त्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी करून त्याचे साथीदार मोहम्मद शफीक अश्फाक अहमद अन्सारी (वय 35) आणि चेतन एकनाथ मेस्त्री (वय 41) यांना अटक केली.

पोलिसांनी या दोघांकडूनही 1 लाख 19 हजार 500 किंमतीच्या 500 रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. तसेच या दोघांकडून बनावट नोटा बनविण्यासाठी लागणारे लॅपटॉप, प्रिंटर, लॅमिनेटर, नोटा तयार करण्यासाठी लागणारे सॉफ्टवेअर प्रिंटिंगचे कागद, अर्धवट प्रिंट केलेल्या रु 500 व 100 च्या नोटा असा एकूण 2 लाख 70 हजार 680 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

28 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

तिन्ही आरोपीं विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यांना न्यायालयात हजर केले असता 28 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठाविण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे चेतन एकनाथ मेस्त्री हा कॉम्प्युटर सायन्स या विषयात पदवीधर असून त्याने युट्युबवरील बनावट नोटा बनविण्याचे व्हिडीओ बघून बनावट नोटा बनविल्या असल्याची माहिती पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी दिली. या गुन्ह्याचा पुढील तपास पो निरी ( गुन्हे ) विक्रम मोहिते हे करीत आहेत.

राज्यात बलात्काराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ

दरम्यान, राज्यात बलात्काराच्या घटना सातत्याने घडताना दिसत आहेत. राज्याची राजधानी असलेल्या मुबंई शहराच्या अवघ्या काही अंतरावर असलेल्या डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर 31 जणांकडून सामूहिक बलात्कार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी काही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पण या घटनेमुळे महिला अत्याचाराच्या घटनांवर आळा घालण्यासाठी काहीतरी कठोर पाऊल उचलण्याची गरज असल्याचं अधोरेखित केलं आहे.

महाबळेश्वरमध्ये अल्पवयीन मुलीवर बलत्कार

दुसरीकडे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सागर उर्फ आबा हनुमंत गायकवाड (वय -30 वर्ष) आणि आशुतोष मोहन बिरामणे (रा. महाबळेश्वर) यांना ताब्यात घेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. (three held with fake currency notes with Rs 1 lakh face value)

 

संबंधित बातम्या:

दिलासादायक बातमी! कल्याणमधील ‘त्या’ 15 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत होणार!

समाजकल्याण खात्याने दिलेल्या गटई स्टॉल्सवरही कारवाई; स्टॉलधारकांचे ठाणे पालिकेसमोर आंदोलन

photo story: रस्त्याची कामे नीट करा, खड्ड्यांमुळे आम्हाला शिव्या खाव्या लागतात; एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर भडकले

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI