समाजकल्याण खात्याने दिलेल्या गटई स्टॉल्सवरही कारवाई; स्टॉलधारकांचे ठाणे पालिकेसमोर आंदोलन

महानगर पालिकेच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून गटई स्टॉल्सवर कारवाई करण्यात येत आहे. समाजकल्याण खात्याने ठाण्यातील 265 गटई स्टॉल्सला प्रमाणित केले असून त्या संदर्भात ठाणे महानगर पालिकेला जिल्हाधिकार्‍यांनी अवगत केले आहे. (gatai stall kamgar agitation against thane corporation in thane)

समाजकल्याण खात्याने दिलेल्या गटई स्टॉल्सवरही कारवाई; स्टॉलधारकांचे ठाणे पालिकेसमोर आंदोलन
thane municipal corporation
Follow us
| Updated on: Sep 25, 2021 | 11:05 AM

ठाणे: महानगर पालिकेच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून गटई स्टॉल्सवर कारवाई करण्यात येत आहे. समाजकल्याण खात्याने ठाण्यातील 265 गटई स्टॉल्सला प्रमाणित केले असून त्या संदर्भात ठाणे महानगर पालिकेला जिल्हाधिकार्‍यांनी अवगत केले आहे. तरीही 2015 मध्ये या गटई स्टॉल्सवर कारवाईचा बडगा उचलण्यात आल्याने गटई कामगारांनी त्यावेळी उपोषणाचा मार्ग अनुसरला होता. त्यावेळी गटई कामगार आणि ठामपा अधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीमध्ये समाजकल्याण प्रमाणित केलेल्या स्टॉल्सवर कारवाई करण्यात येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला होता. तरीही, स्टॉल्सवर कारवाई केली जात असल्याने हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये सुमारे 200 ते 250 चर्मकार बांधव सहभागी झाले होते. यावेळी पालिका मुख्यालया समोर ठिय्या आंदोलन करत घोषणाबाजी देखील करण्यात आली. (gatai stall kamgar agitation against thane corporation in thane)

बैठा परवाना द्या

दरम्यान, ठाणे शहरात समाज कल्याण खात्याने प्रमाणित केलेल्या स्टॉल्सवरील कारवाई रद्द करण्यात यावी; समाज कल्याण खात्याने प्रमाणित केलेले स्टॉल्स ठामपाने जप्त केले आहेत. ते तत्काळ परत करण्यात यावेत; गटई स्टॉल्सचा समावेश फेरीवाल्यांमध्ये करु नये/बैठा व्यवसाय करणार्‍या चर्मकारांना पिच (बैठा) परवाना द्यावा, समाज कल्याण खात्याने प्रमाणित केलेल्या स्टॉल्सला ठामपाने कर आकारणी करावी, समाज कल्याण खात्याने प्रमाणित केलेल्या स्टॉल्सची कागदपत्रे तपासून त्यांनाही ठामपाकडून मंजूरी द्यावी, अशा मागण्या राजाभाऊ चव्हाण यांनी केल्या आहेत.

होर्डिंग्ज, पोस्टर्सही हटवले

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महापालिकेने फेरिवाल्यांवर कारवाई केली आहे. कारवाईतंर्गत नौपाडा-कोपरी प्रभाग समिती, माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती, वर्तकनगर प्रभाग समिती, कळवा प्रभाग समिती, वागळे प्रभाग समिती, लोकमान्य-सावरकर नगर प्रभाग समिती, उथळसर प्रभाग समिती, मुंब्रा प्रभाग समिती तसेच दिवा प्रभाग मधील रस्त्यावरील अनधिकृत हातगाडीवाले, फेरीवाले तसेच किरकोळ विक्रेते यांच्यावर कारवाई करण्यात आली. यावेळी फेरिवाल्यांचे सामान जप्त करण्यात आले. तसेच शहरातील सर्व अनधिकृत बॅनर्स, होर्डींग्ज आणि पोस्टर्स निष्कासीत करण्यात आले आहेत.

कारवाई सुरूच ठेवा

काही दिवसांपूर्वी महापौर नरेश गणपत म्हस्के यांनी स्वत: नौपाडा -कोपरी प्रभाग समितीमधील मार्केटची पाहणी केली होती. तसेच फेरीवाल्यांवर यापुढेही कारवाई सुरूच ठेवण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. सदरची कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाच्या उप आयुक्त अश्विनी वाघमळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे, महेश आहेर, डॉ अनुराधा बाबर, संतोष वझरकर, विजयकुमार जाधव, सचिन बोरसे, सागर साळुंखे आणि अलका खैरे यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या साहाय्याने केली.

म्हणून कारवाई

ठाणे महापालिकेतील माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत येत असलेल्या कासारवडवली नाक्यावरील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे गेल्या होत्या. या कारवाईच्या दरम्यान 30 ऑगस्ट रोजी अमरजित यादव या फेरीवाल्याकडून त्यांच्यावर कोयत्याने अचानक हल्ला करण्यात आला. यावेळी बचावासाठी त्यांनी हात वर केल्याने त्यांची दोन बोटेच तुटून पडली, तर बचावासाठी धावलेल्या अंगरक्षकाचेही एक बोट तुटले आहे. कल्पिता पिंपळे यांना ज्युपिटर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. तर आरोपी अमरजित यादव याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर पालिकेने सर्रासपणे अतिक्रमण हटवण्यास आणि फेरिवाल्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. (gatai stall kamgar agitation against thane corporation in thane)

संबंधित बातम्या:

कल्याणमधील तोडफोड प्रकरणी चौघे जण ताब्यात, आरोपींना पकडण्यासाठी तीन पोलीस पथके

CCTV VIDEO | दुचाकीस्वार चोरट्यांकडून पादचाऱ्याला मोबाईल लंपास, उल्हासनगरात पहाटेची घटना

शिवसेना-भाजपची पहिली सहमती, मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी जमीन हस्तांतरणाला मंजुरी

(gatai stall kamgar agitation against thane corporation in thane)

Non Stop LIVE Update
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.