AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CCTV VIDEO | दुचाकीस्वार चोरट्यांकडून पादचाऱ्याला मोबाईल लंपास, उल्हासनगरात पहाटेची घटना

लालचक्की भागातल्या कमानीजवळ बाईकवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी या चाकरमान्याचा शर्टच्या खिशात ठेवलेला मोबाईल हिसकावत पळ काढला. ही संपूर्ण घटना तिथल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली.

CCTV VIDEO | दुचाकीस्वार चोरट्यांकडून पादचाऱ्याला मोबाईल लंपास, उल्हासनगरात पहाटेची घटना
मोबाईल चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद
| Edited By: | Updated on: Sep 09, 2021 | 10:33 AM
Share

उल्हासनगर : दुचाकीवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी कामावर निघालेल्या एका चाकरमान्याचा मोबाईल चोरल्याची घटना उल्हासनगरात घडली आहे. ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहराच्या लालचक्की परिसरात मंगळवारी पहाटे सहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

उल्हासनगरच्या कॅम्प चार भागात लालचक्की परिसर आहे. या मराठीबहुल भागात मोठ्या प्रमाणात चाकरमानी वास्तव्याला आहेत. रेल्वे स्टेशन अगदी हाकेच्या अंतरावर असल्याने इथले प्रवासी दररोज सकाळी चालत रेल्वे स्टेशन गाठतात. अशाच पद्धतीने मंगळवारी पहाटे सहा वाजताच्या सुमारास एक प्रवासी कामावर जायला पायी निघाला होता.

नेमकं काय घडलं?

यावेळी लालचक्की भागातल्या कमानीजवळ बाईकवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी या चाकरमान्याचा शर्टच्या खिशात ठेवलेला मोबाईल हिसकावत पळ काढला. ही संपूर्ण घटना तिथल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

पाहा व्हिडीओ :

मुंबईतील कुप्रसिद्ध मोबाईल चोराला बेड्या

दरम्यान, मुंबईतील कुप्रसिद्ध मोबाईल चोराला मालवणी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने अटक केली आहे. फोनवर बोलत जाणाऱ्या तरुणाचा मोबाईल हिसकावून चार दिवसांपूर्वी दोघा आरोपींनी पोबारा केला होता. या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज पाहून पोलिसांनी चोराला बेड्या ठोकल्या.

पुण्यातही महिलेचा मोबाईल चोरीला

दुसरीकडे, पादचारी महिलेचा मोबाईल आणि पर्स लुटून चोरांनी पळ काढल्याचा प्रकार नुकताच पुण्यात उघडकीस आला होता. हडपसर भागात दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. महिलेने एक किलोमीटरपर्यंत चोरांचा पाठलागही केला, मात्र ते हाती लागले नाहीत.

संबंधित बातम्या :

CCTV VIDEO | पुण्यात महिलेचा पर्स-मोबाईल लुटून दोघे पसार, पाठलागाचा थरार सीसीटीव्हीत कैद

Pune Crime | पुण्यात रस्त्याने एकटं जात असताना चोरांनी लुटले, घटना सीसीटीव्हीत कैद

पुण्यात महिलेला वडापाव खाण्याची इच्छा पडली 8 लाखांना! रक्षबंधनाच्याच दिवशी घडली घटना

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.