लसीकरणाला गती देण्यासाठी नवा फंडा, डोंबिवलीमध्ये आता मंदिर, मशिदींमधून जनजागृती

सीकरणाच्या मोहिमेला गती मिळावी म्हणून आता मंदिर आणि मशिदींमधून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसे आवाहन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केले आहे.

लसीकरणाला गती देण्यासाठी नवा फंडा, डोंबिवलीमध्ये आता मंदिर, मशिदींमधून जनजागृती
VACCINATION

ठाणे : येत्या 50 दिवसात संपूर्ण राज्यात शंभर टक्के लसीकरण व्हावे यासाठी ‘मिशन कवचकुंडल’ मोहीम राबवली जात आहे. भिंवडी शहरातदेखील 8 ते 14 ऑक्टोबरदरम्यान ही मोहीम राबविली आहे. विशेष म्हणजे लसीकरणाच्या मोहिमेला गती मिळावी म्हणून आता मंदिर आणि मशिदींमधून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसे आवाहन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केले आहे.

भिवंडीत लसीकरणाबाबत जनजागृती करण्याची गरज 

भिवंडी शहरात आतापर्यंत 2 लाख 19 हजार 476 नागरिकांनी लसीचा पहिला डोस, तर 78 हजार 49 नागरिकांनी दुसरा डोस घेतलेला आहे. लसीकरणाचे हे प्रमाण लोकसंख्येच्या मानाने अनुक्रमे अवघे 36 व 13 टक्के आहे. येथे लसीकरणाचे प्रमाण कमी असल्यामुळे प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे. तसेच शहरात मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याची गरज असल्याचे जाणाकारांनी सांगितले होते. त्यासाठी आता मंदिर, मशिदींमधून लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसे आवाहन करण्याची विनंती आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केली आहे.

धर्मगुरुंना जनजागृती करण्याचे आवाहन 

लसीकरणावर चर्चा करण्यासाठी पालिका मुख्यालयात सर्व धर्मगुरूंची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत धार्मिक प्रार्थनास्थळांचे इमाम,धर्मगुरू तसेच पालिकेचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. राज्यात भिवंडी, मालेगाव, नांदेड महापालिका क्षेत्रात लसीकरणाची टक्केवारी कमी असल्याने राज्य प्रशासनाने चिंता व्यक्त केली होती. याविषयी बैठकीत चर्चा करण्यात आली. पालिका प्रशासनाने लसीकरण अधिकाधिक व्हावे यासाठी प्रयत्न करण्याची गरज या बैठकीत व्यक्त करण्यात आली.

आयुक्तांचे बैठकीत आवाहन

त्याचाच एक भाग म्हणून अल्पसंख्याक समाजात लसीकरणाबाबत असलेले गैरसमज, शंका दूर करून समाजात विश्वास निर्माण करण्याची जबाबदारी धर्मगुरूंनी पार पाडावी असे आवाहन आयुक्तांनी या बैठकीत केले.

सिरिंजच्या निर्यातीवर बंदी

दरम्यान, देशांतर्गत उत्पादन आणि पुरवठा वाढवण्यासाठी केंद्र सरकारने सिरिंजच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. तीन महिन्यांसाठी सिरिंजच्या केवळ तीन श्रेणींवर ही बंदी घालण्यात आली आहे. भारतात आतापर्यंत लसीचे सुमारे 94 कोटी डोस देण्यात आले आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांत देशभरात इंजेक्शन्सच्या सिरींजचा तुटवडा जाणवत असल्याने लसीकरण मोहिमेला ब्रेक लागताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सिरिंजच्या निर्यातीवर निर्बंध लादले आहेत.

इतर बातम्या :

Video | ITच्या धाडीनंतर पहिलाच बारामती दौरा, महिला म्हणतात “तुमचं काम एक नंबर,” अजितदादांच्या डोळ्यात अश्रू तरळले

मोदींचा हुकूमशाहीवर विश्वास आहे का?, सहकाऱ्यांवर निर्णय लादतात का?; अमित शहा पहिल्यांदाच बोलले

नाद करा पण पुणेकरांचा कुठं?, स्पर्धा जिंकली म्हणून गणेश मंडळाकडून 5 महिलांना हेलिकॉप्टर राईड

(to speed up corona vaccination in thane dombivli awareness campaign will be taken place from temples and mosques)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI