कष्ट करतो आणि सन्मानाने जगतो, रिक्षात राहिलेले 1 लाख रुपये प्रवाशाला परत, रिक्षाचालकाकडून प्रामाणिकपणाचं दर्शन

निनाद करमरकर

| Edited By: |

Updated on: Jul 12, 2021 | 5:49 PM

उल्हासनगरमध्ये एका रिक्षाचालकाने प्रामाणिकपणाचं दर्शन घडवलं आहे. त्याने प्रवाशाचे रिक्षात राहिलेले 1 लाख 9 हजार रुपये परत केले आहेत.

कष्ट करतो आणि सन्मानाने जगतो, रिक्षात राहिलेले 1 लाख रुपये प्रवाशाला परत, रिक्षाचालकाकडून प्रामाणिकपणाचं दर्शन
रिक्षात राहिलेले 1 लाख रुपये प्रवाशाला परत, रिक्षाचालकाकडून प्रामाणिकपणाचं दर्शन

Follow us on

उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये एका रिक्षाचालकाने प्रामाणिकपणाचं दर्शन घडवलं आहे. रिक्षात एका प्रवाशाचे तब्बल 1 लाख रुपयांपेक्षाही जास्त रोख रक्कम राहिली होती. पण संबंधित रिक्षाचालकाने ते सर्व पैसे प्रवाशाला परत केले आहेत. त्यामुळे या रिक्षाचालकाचं कौतुक होत आहे. रिक्षाचालकाने दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळे पोलिसांनाही आनंद झाला आहे. पोलिसांनी पोलीस ठाण्यात या रिक्षाचालकाचा सत्कार केला आहे. या रिक्षा चालकाचं नाव संतोष तुपसौंदर्य असं आहे.

नेमकं काय घडलं?

उल्हासनगरला राहणारे व्यापारी निरंजन बिजलानी हे शुक्रवारी (12 जुलै) रात्री कल्याणच्या दूधनाका भागातून उल्हासनगरच्या कॅम्प 3 भागात येण्यासाठी रिक्षात बसले. मात्र उल्हासनगरात उतरल्यानंतर ते त्यांची बॅग रिक्षातच विसरले. ही बाब लक्षात येताच त्यांनी वाहतूक पोलिसांना गाठत त्यांना याबाबतची माहिती दिली. वाहतूक पोलिसांनी रिक्षाच्या नंबरद्वारे रिक्षाचालकाचा शोध घेतला. पोलिसांनी रिक्षाचालक संतोष तुपसौंदर्य यांना पोलीस ठाण्यात बोलावलं.

पोलिसांकडून व्यापाऱ्याच्या हाती पैसे सुपूर्द

रिक्षाचालक संतोष तुपसौंदर्य पोलीस ठाण्यात गेले. यावेळी त्यांनी आपल्या रिक्षात राहिलेली बॅग पोलिसांच्या स्वाधीन केली. त्यानंतर पोलिसांनी निरंजन बिजलानी यांना पोलीस ठाण्यात बोलावून या बॅगची ओळख पटवली आणि ती निरंजन बिजलानी त्यांच्या स्वाधीन केली.

पोलिसांकडून रिक्षाचालकाचा सत्कार

या बॅगमध्ये बिजलानी यांचे तब्बल 1 लाख 9 हजार रुपये होते. यावेळी बिजलानी यांनी पोलिसांच्या हस्ते रिक्षाचालक संतोष तुपसौंदर्य यांचा सत्कार केला. तसंच रिक्षाचालक संतोष तुपसौंदर्य यांचे आभार मानले. या घटनेनंतर उल्हासनगरात या रिक्षाचालकाचं कौतुक केलं जातंय (ulhasnagar auto drive return 1 lakh 9 thousand rupees to passenger).

संबंधित बातम्या :

एसटी चालक-वाहकचा प्रामाणिकपणा, 60 हजार रुपयांनी भरलेली पर्स प्रवाशाला परत

लॉकडाऊनमुळं हप्ते थकूनही प्रामाणिकपणा,14 लाखांच्या दागिन्याची बॅग मराठी रिक्षाचालकाकडून परत

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI