अंबरनाथमध्ये ‘वंचित’ने मारले शिवसेना आमदाराच्या फोटोला जोडे, प्रकाश आंबेडकरांविरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध

अंबरनाथमध्ये 'वंचित'ने मारले शिवसेना आमदाराच्या फोटोला जोडे, प्रकाश आंबेडकरांविरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध
अंबरनाथमध्ये 'वंचित'ने मारले शिवसेना आमदाराच्या फोटोला जोडे
Image Credit source: TV 9

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान पार पडले. यावेळी शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी एका मेळाव्यात वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनी मागील निवडणुकीत एक हजार कोटी रुपये घेतले होते, असा आरोप केला होता. त्यातूनच त्यांनी हेलिकॉप्टरने दौरे करत प्रचार सभा घेतल्या, असंही संतोष बांगर म्हणाले होते.

निनाद करमरकर

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Mar 28, 2022 | 4:20 PM

अंबरनाथ : शिवसेनेचे हिंगोली जिल्हाप्रमुख आणि कळमनुरी मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्याविरोधात आज अंबरनाथमध्ये वंचित बहुजन आघाडीने निषेध आंदोलन (Protest) केलं. या आंदोलनात बांगर यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले. तसंच त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी तहसीलदारांकडे निवेदन देण्यात आलं. अंबरनाथ तहसील कार्यालयाबाहेर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी संतोष बांगर यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. (Vanchit Bahujan Aghadi’s agitation against mla santosh bangar in ambernath)

शिवसंपर्क अभियानादरम्यान केले होते वक्तव्य

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान पार पडले. यावेळी शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी एका मेळाव्यात वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनी मागील निवडणुकीत एक हजार कोटी रुपये घेतले होते, असा आरोप केला होता. त्यातूनच त्यांनी हेलिकॉप्टरने दौरे करत प्रचार सभा घेतल्या, असंही संतोष बांगर म्हणाले होते. यावरून आता वंचित बहुजन आघाडीने आक्रमक पवित्रा घेत हे आरोप बिनबुडाचे असल्याचं म्हटलं आहे. संतोष बांगर यांनी पुराव्यानिशी आरोप करावेत, अन्यथा प्रकाश आंबेडकर यांची जाहीर माफी मागावी, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीने घेतली आहे.

वंचित बहुजन विकास आघाडीच्या वतीने निवेदन

बांगर यांच्या याच वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज अंबरनाथमध्ये वंचित बहुजन आघाडीने आमदार संतोष बांगर यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. तसंच संतोष बांगर यांनी त्यांच्या वक्तव्याप्रकरणी प्रकाश आंबेडकर यांची जाहीर माफी मागावी, अन्यथा बांगर यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असं निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अंबरनाथच्या तहसीलदार प्रशांती माने यांना देण्यात आलं. (Vanchit Bahujan Aghadi’s agitation against mla santosh bangar in ambernath)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें