कर्मचारी, व्यवस्थापकावर दबाव कशासाठी, ऋता आव्हाड यांचा सवाल

गणेश थोरात

गणेश थोरात | Edited By: गोविंद हटवार, Tv9 मराठी

Updated on: Nov 11, 2022 | 7:45 PM

जितेंद्र आव्हाड यांच्यासह 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामध्ये माजी खासदार आनंद परांजपे यांचंही नाव आहे.

कर्मचारी, व्यवस्थापकावर दबाव कशासाठी, ऋता आव्हाड यांचा सवाल
Image Credit source: tv 9

ठाणे : मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना करण्यात आली. त्यानंतर बोलताना त्यांनी पत्नी ऋता आव्हाड म्हणाल्या, हा सर्व घटनाक्रम फक्त सात मिनिटांत घडला. आता पोलीस हे सिनेमागृहाच्या कर्मचाऱ्यांवर आणि मॅनेजरवर तुम्ही तक्रारदार व्हा म्हणून दबाव टाकला जात आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी केलाय. पण, हे स्वीकार्य नसल्याचंही त्या म्हणाल्या. ज्यांनी गुन्हे दाखल केलं. त्यापैकी कुणीही तिथं हजर नव्हतं. आता हे सर्वत्र असचं सुरू आहे. आधी इंग्रजांचं सरकार होतं. आता हे सरकार आहे, अशी टीकाही त्यांनी केली. इंकलाब जिंदाबाद, अशी घोषणा यावेळी ऋता आव्हाड यांनी केली.

जितेंद्र आव्हाड यांच्यासह 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामध्ये माजी खासदार आनंद परांजपे यांचंही नाव आहे. आव्हाड यांना उद्या ठाणे कोर्टात हजर करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विवियाना मॉलमधील मारहाण प्रकरणी आव्हाड यांना अटक करण्यात आळी. त्यानंतर वर्तकनगर पोलीस ठाण्याबाहेर आव्हाडांच्या समर्थकांनी राडा केला.

ऋता आव्हाड म्हणाल्या, मारहाण झाली तेव्हा तिथं कुणीही नव्हतं. त्यामुळं जितेंद्र आव्हाड यांनी मारहाण केली. हा हवेतील गोळीबार आहे. त्यांनी उटल कार्यकर्त्यांना अडविलं. ज्या प्रेक्षकाला मारहाणा झाली त्यानं तक्रार मागे घ्यायचा विचार केला होता. पण, दबाव आल्यामुळं त्यानं तक्रार परत घेतली नाही. सध्या भारत हा फक्त दबावावरच चाललेला आहे.

मॉलच्या मॅनेजरला खूप प्रेशराईज केलं जातंय. त्यांनीसुद्धा तक्रार करावी. पण, त्यांना काय झालं हे माहीतचं नव्हतं, असंही ऋता आव्हाड म्हणाल्या. सत्तेपुढं शहाणपण चालत नाही. दर महिन्याला तुम्ही एखाद माणसाला टार्गेट करणार, असा आरोपही ऋता आव्हाड यांनी केला. त्या पोलीस ठाण्यात गेल्यात. त्यावेळी त्या बोलत होत्या.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI