
Eknath Shinde Shivsena: महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. मुंबई, ठाणे, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथील निवडणूक हायहोल्टेज ठरण्याची शक्यता आहे. त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यात महायुतीला महाविकास आघाडीचं कडवं आव्हान असेल. ठाण्यात एकनाथ शिंदे आणि भाजप विरोधात काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी शरद पवार गट एकत्रित येऊन लढणार आहे. राज ठाकरे यांची साथ मिळाल्याने शिंदे सेनेच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. मराठी मतांचे ध्रुवीकरण होऊन त्याचा फायदा कुणाला मिळेल याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे येथे अटीतटीचा सामना रंगणार आहे. ठाण्यातील महापालिका निवडणुकीत काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.
अजितदादांच्या राष्ट्रवादीचा बंडा झेंडा
ठाणे महापालिकेच्या 131 जागांसाठी चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. ठाण्यात अगोदरच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीने घड्याळाची काटी फिरवली आहेत. महायुतीत सन्मान आणि जागा वाटपात स्थान न मिळाल्यास ठाण्यातील 131 जागा स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचा इशारा राष्ट्रवादीने दिला आहे. तर भाजप आणि शिंदे सेनेत वाटाघाटी सुरू आहेत.
शिंदे सेना-भाजपला घेरण्यासाठी मनसेही मैदानात
दुसरीकडे ठाण्यात शिंदे सेना आणि भाजपला रोखण्यासाठी विरोधकांची एकजूट झाल्याचे दिसून येते. मुंबईत स्वबळाचा नारा देणारी काँग्रेस सुद्धा ठाण्यात विरोधकांसोबत जाणार असल्याचे समोर आले आहे. महाविकास आघाडीची आज ठाण्यात जागावाटप संदर्भात महत्त्वाची बैठक होत आहे. ठाकरे गटाकडून विनायक राऊत, राजन विचारे, मनसे कडून अविनाश जाधव, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेसकडून विक्रांत चव्हाण बैठकीला उपस्थित राहणार आहेत. आज सायंकाळी ४ वाजता ठाण्यात बैठक होणार आहे. महाविकास आघाडीत मनसे सुद्धा असेल. त्यामुळे ठाण्यात सर्व विरुद्ध शिंदे सेना -भाजप असा सामना रंगणार आहे.
महायुतीच्या जागा वाटपासाठी बैठकांचे सत्र
उद्यापासून प्राथमिक चर्चा सुरू होईल. संपूर्ण महाराष्ट्रात २९ महापालिकेत जे काही २९ कमिटी आहेत. भारतीय जनताचे पदाधिकारी तसेच शिवसेनेचे पदाधिकारी हे मिळून चर्चा करून बैठक करतील. महायुतीमध्ये जे काही जागावाटप बद्दल जो काही निर्णय आहे. तो होईल. जिथे कुठे अडचण येईल तिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मी आणि प्रदेश अध्यक्ष सोबत आमचे प्रमुख लोकांना घेऊन निर्णय घेऊ अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
तर आज ठाण्यात शिंदेसेना आणि भाजप यांच्यात बैठक होणार आहे. आजपासून जागा वाटप संदर्भात प्राथमिक आणि अधिकृत चर्चेला सुरुवात होणार आहे. दोन ते तीन दिवसात स्थानिक नेते चर्चा करून प्रस्ताव अंतिम करणार आणि वरिष्ठांना निर्णय घेण्यासाठी सादर करणार आहेत. नौपाडा, वागळे इस्टेट, कोपरी अश्या भागात दोन्ही पक्षाची ताकद आहे, दोन्ही कडे वरिष्ठ पदाधिकारी आहेत, त्यांना तिकीट देणे आवश्यक आहे, अश्या ठिकाणी कोणत्या जागा देणार आणि कोणत्या घेणार यावर आजपासून दोन्ही पक्षात चर्चा होणार आहे.
शिवसेने कडून चर्चेसाठी खासदार नरेश म्हस्के आणि भाजपकडून आमदार निरंजन डावखरे उपस्थित राहणार आहेत. ठाण्यात उद्या पासून बैठकांचे सत्र सुरु होणार आहे. शिवसेनेकडून प्रत्येक पालिकेसाठी जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. ठाण्यातील मेळाव्यानंतर एकनाथ शिंदे यांनी महत्वाची बैठक घेतली, या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात येईल.vठाण्याची चर्चा खासदार नरेश म्हस्के, कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगर साठी खासदार श्रीकांत शिंदे आणि गोपाळ लांडगे, मीरा भाईंदर साठी मंत्री प्रताप सरनाईक, नवी मुंबई साठी खासदार नरेश म्हस्के तर वसई विरार महापालिकेसाठी रवींद्र फाटक हे भाजपसोबत चर्चा करणार आहेत.
बच्चू कडू यांना मोठा धक्का
बचू कडू यांच्या प्रहार संघटनेला पालघर-ठाणे जिल्ह्यात मोठे खिंडार पडले आहे. जिल्हाध्यक्ष हितेश जाधव यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात पक्षप्रवेश केला आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे आमदार राजन नाईक, आमदार स्नेहा दुबे पंडित, जिल्हाध्यक्षा प्रज्ञा पाटील यांच्या उपस्थितीत हितेश जाधव यांनी नालासोपाऱ्यात भाजपात केला पक्षप्रवेश केला आहे. हितेश जाधव यांच्यासोबत प्रहार संघटनेचे तालुका, जिल्हा झर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजपात पक्षप्रवेश केल्याने प्रहार संघटनेला मोठे खिंडार पडले आहे.