AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्या सीडीआरची चौकशी होणार, अशोक खरात प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

अशोक खरात प्रकरणात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठा दावा केला आहे. एकनाथ शिंदे आणि अशोक खरात यांच्यामध्ये 17 वेळा फोन कॉल झाल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर आता त्यांच्याकडे सीडीआर कसे आले? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

त्या सीडीआरची चौकशी होणार, अशोक खरात प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 05, 2026 | 4:10 PM
Share

सध्या अशोक खरात प्रकरण राज्यात चांगलंच गाजत आहे? या प्रकरणावर बोलताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अशोक खरात यांच्यात 17 वेळा फोन कॉल्स झाल्याचा दावा केला आहे. आपण सीडीआरच्या आधारे हा खुलासा केला अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे. दरम्यान त्यानंतर आता दमानिया यांच्याकडे सीडीआर कसा आला? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? 

पहिली गोष्ट अशी आहे की, अशा पद्धतीने सीडीआर प्राप्त करून घेण्याचा कोणालाही अधिकार नाही. तो अधिकार फक्त जी संबंधित तपास यंत्रणा आहे, त्यांनाच तो अधिकार आहे. त्यामुळे हा सीडीआर कशापद्धतीने लीक झाला? तो कुणी लीक केला? या संदर्भातील चौकशी राज्य सरकार करेल. मला वाटतं अशा सेंसेटिव्ह केसमध्ये आरोप प्रत्यारोप करून चालत नाही. ज्याच्याविरोधात सबळ पुरावा असेल त्यांच्याविरोधात कारवाई होईल. कोण कोणाशी बोललं, कोणी कोणाशी काय केलं? याच्या आधारावर यंत्रणा काम करत नाही. अशोक खरात याने जी काही घाणेरडी कामं केली आहेत, त्यात जर कोणी सहभागी असेल तर त्याला आम्ही सोडणार नाहीत, त्यामुळे हा सीडीआर कुठून आला? त्याची देखील चौकशी राज्य सरकार करेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान अशोक खरातच्या संपत्तीचा पूर्ण तपास आम्ही करणार आहोत, त्याने जे वेगवेगळे अकाऊंट उघडले आहेत, ते आमच्या लक्षात आले आहेत, त्याचे वेगवेगळे ट्राझेक्शन देखील आमच्या लक्षात आले आहेत. आणि आता या प्रकरणात लोक स्वत:हून समोर येऊन माहिती देत आहेत, त्यामुळे एसआयटीला देखील मोठ्या प्रमाणात माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे या प्रकरणाची सर्व पाळमुळे आम्ही खोदून काढू. मला वाटतं एसआयटी योग्य पद्धतीने काम करत आहे, सर्वांनी एसआयटीवर विश्वास ठेवावा, असंही यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते नाशिकमध्ये बोतल होते.

Follow Us
विनोद तावडेंनी जयंत पाटलांनंतर आणखी एका नेत्याची घेतली भेट, पवारांच्या
Big Breaking | विनोद तावडेंनी जयंत पाटलांनंतर आणखी एका नेत्याची घेतली भेट, पवारांच्या राष्ट्रवादीत चाललंय तरी काय?
उद्धव ठाकरेंचा कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा? थेट सोनम वांगचूक यांना
उद्धव ठाकरेंचा कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा? थेट सोनम वांगचूक यांना फोन केला अन्...
भाजपसोबत जाणाच्या विचारात असलेल्यांना ठाकरेंचा सवाल; दानपेटीची चोरी...
Aaditya Thackeray | दानपेटीची चोरी करणाऱ्यांसोबत जाणार का? भाजपसोबत जाणाच्या विचारात असलेल्यांना आदित्य ठाकरेंचा सवाल
भक्तीचा महासंगम! ज्ञानोबा-तुकाराम पालखीचे आगमन; वारकरी-धारकरी एकत्र
Pune | पुण्यात आज भक्तीचा महासंगम! ज्ञानोबा-तुकाराम पालखीचे आगमन; वारकरी-धारकरी एकत्र
मोठी बातमी! पवारांच्या पक्षाचं सुद्धा ठाकरेंसारखंच... बड्या नेत्याच्या
मोठी बातमी! पवारांच्या पक्षाचं सुद्धा ठाकरेंसारखंच... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर..
राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात मुख्यमंत्र्यांसह...
आधी रस्त्यावर झोपली, मग थेट बॅरिकेड तोडून गाडी घातली; पालखी मार्गावर..
Alandi | पालखी मार्गावर महिलेचा हायव्होल्टेज राडा! आधी रस्त्यावर झोपली, मग थेट बॅरिकेड तोडून गाडी घातली
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या 4 बड्या नेत्यांनी घेतली CM फडणवीसांची भेट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या 4 बड्या नेत्यांनी घेतली CM फडणवीसांची भेट, काय झाली चर्चा?
कर्जमाफीसाठी मंत्रालयासमोर शेतकऱ्यांचं झाडावर चढून आंदोल
Mumbai Farmer Protest | शेतकऱ्यांचा संताप शिगेला! कर्जमाफीसाठी मंत्रालयासमोर झाडावर चढून आंदोलन
वसई-विरारच्या पुरावरून विधानसभेत राडा! आदित्य ठाकरे-भातखळकर आमनेसामने
वसई-विरारच्या पुरावरून विधानसभेत राडा! आदित्य ठाकरे-भातखळकर आमनेसामने