VIDEO | विठुरायाने वापरलेल्या पोषाखांनी गावागावातील विठ्ठल मूर्ती सजणार

आता राज्यातील ग्रामीण भागात असणाऱ्या विठ्ठल मूर्तींना मोफत भेट देण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. या निर्णयामुळे गावागावातील विठ्ठल मूर्तीचे रुपडे अधिक खुलून दिसणार आहे.

VIDEO | विठुरायाने वापरलेल्या पोषाखांनी गावागावातील विठ्ठल मूर्ती सजणार
Pandharpur Vitthal


पंढरपूर : विठुरायाचे सावळे गोजिरे रूप भक्तांना नेहमीच आकर्षित करते. त्यातच अधिक भर पडते ते विठुरायाला परिधान केलेल्या भरजरी वस्त्रांच्या पोशाखाची वस्त्राच्या पोशाखामुळे देवाचे सुंदर रुप अधिकच खुलून दिसते. देवाला दैनंदिन परिधान केले जाणारे पोशाख हे भाविकांकडून मंदिर समितीला दान स्वरुपात दिले जातात. देवाचे असे अनेक पोशाख मंदिर समितीकडे विनावापर शिल्लक आहेत. हे चांगले पोशाख आता राज्यातील ग्रामीण भागात असणाऱ्या विठ्ठल मूर्तींना मोफत भेट देण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. या निर्णयामुळे गावागावातील विठ्ठल मूर्तीचे रुपडे अधिक खुलून दिसणार आहे. (The beautifully garments worn by Pandharpur Vitthal will be given free of cost in rural areas)

विठुरायाचे पोषाख मोफत भेट दिले जाणार

अलीकडच्या काही वर्षापासून विठुरायाला पोशाख दान करणाऱ्या भाविकांची संख्या अधिक वाढली आहे. त्यामुळे देवाला दररोज नवीन पोषाख परिधान केला जातो. मागील काही वर्षापासून देवाचे असे भरजरी वस्त्रांचे हजारो पोषाख मंदिरात आहेत. जास्त दिवस पोषाख तसेच ठेवले तर ते वापराविना कायमचे खराब होण्याची शक्यता आहे. ही शक्यता गृहीत धरुन मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी गावोगावी असलेल्या विठ्ठल मूर्तींना देवाचे भरजरी पोषाख मोफत भेट देण्याची कल्पना शोधून काढली आहे. त्यानुसार मंदिर समितीकडे उपलब्ध असलेले सुमारे पाच हजार विठुरायाचे पोषाख मोफत भेट दिले जाणार आहेत.

सण सभारंभाच्या निमित्ताने आकर्षक पोशाख परिधान 

आषाढी यात्रेनंतर पोषाखांचे वाटप केले जाणार आहे. यासाठी ग्रामस्थांनी मंदिर समितीकडे नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. आषाढी कार्तिकीसह प्रमुख चार यात्रा, विविध सण आणि समारंभाच्या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणीला आकर्षक भरजरी वस्त्रांचा पोशाख परिधान केला जातो. त्यावर सोन्याचे अलंकार परिधान करुन कपाळी चंदनाचा टिळा लावून देवाला नटवले जाते. देवाचे हे रुप पाहण्यासाठी भाविक अतूर असतात. देवाला दररोज सायंकाळी चार वाजता नवीन पोशाख परिधान करुन देवाचे नित्योपचार केले जातात.

रुक्मिणी मातेलाही साड्यांची मंदिर समितीकडून विक्री

विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला रेश्मी, मुलायम, मखमली असे उंची वस्त्रांचे पोशाख भाविकांकडून मंदिर समितीला भेट दिले जातात. रुक्मिणी मातेलाही भाविक साडी चोळी अर्पण करतात. रुक्मिणीला मातेला अर्पण केलेल्या साड्यांची मंदिर समितीकडून विक्री केली जाते. पण विठुरायाचे पोशाख तसेच ठेवण्यात आले आहेत. आतापर्यंत देवाचे हजारो पोशाख मंदिर समितीकडे सुस्थितीत आहेत, असे पोशाख ग्रामीण भागातील विठ्ठल मूर्तीला परिधान करण्यासाठी भेट म्हणून देण्यात येणार आहे.

(The beautifully garments worn by Pandharpur Vitthal will be given free of cost in rural areas)

संबंधित बातम्या : 

मित्रांसोबत धरणावर पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू, तब्बल 24 तासांनंतर मृतदेह पाण्याबाहेर

जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांच्या गाड्यांचा ताफा अडवला, ‘एक मराठा-लाख मराठा’ घोषणांनी परिसर दणाणला

सकारात्मक बातमी, रत्नागिरीच्या तीन चिमुकल्यांची डेल्टा प्लस विषाणूवर मात

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI