मित्रांसोबत धरणावर पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू, तब्बल 24 तासांनंतर मृतदेह पाण्याबाहेर

अखेर 24 तासांच्या शोधकार्यानंतर सोमवारी या तरुणाचा मृतदेह शोधण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. (Badlapur young man drowned while swimming in a barrage dam)

मित्रांसोबत धरणावर पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू, तब्बल 24 तासांनंतर मृतदेह पाण्याबाहेर
प्रतिकात्मक फोटो

बदलापूर : धरणावर पोहण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बदलापुरात घडली आहे. रविवारी (27 जून) ही घटना घडली आहे. अखेर 24 तासांच्या शोधकार्यानंतर सोमवारी या तरुणाचा मृतदेह शोधण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. (Badlapur young man drowned while swimming in a barrage dam)

तुषार पाटील असे या तरुणाचे नाव आहे.  तो उल्हानगरला राहतो. तुषार हा रविवारी मित्रांसोबत बदलापूर पश्चिमेकडील बॅरेज धरणावर पोहण्यासाठी गेला होता. मात्र त्याला पाण्याचा अंदाज न आल्यानं त्याचा बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच बदलापूर पश्चिम पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

पाण्याचा प्रवाह वेगात असल्याने शोधकार्यात अडथळे

यानंतर बदलापूरच्या अग्निशमन दलाने या तरुणाचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र बॅरेज धरणात पाण्याचा प्रवाह वेगात असल्यानं अग्निशमन दलाला शोधकार्यात अनेक अडथळे आले. त्यामुळं अनेक तासाच्या प्रयत्नानंतर तुषारचा मृतदेह सापडण्यात यश आले नाही.

तब्बल 24 तासांनंतर मृतदेह पाण्याबाहेर

अखेर सोमवारी सकाळी वालिवली परिसरात त्याचा मृतदेह वाहत आल्याची माहिती स्थानिकांना पोलिसांना दिली. यानंतर अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तब्बल 24 तासांनंतर तुषारचा मृतदेह पाण्याच्या बाहेर काढला. यानंतर पंचनामा करून त्याचा मृतदेह बदलापूर ग्रामीण रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. तसेच या संपूर्ण प्रकरणाचा तपास बदलापूर पश्चिम पोलीस करत आहेत.

(Badlapur young man drowned while swimming in a barrage dam)

संबंधित बातम्या : 

कोरोना रोखण्यासाठी लस प्रभावी, मुंबईत दोन डोस घेतलेले फक्त 26 जण बाधित

Weather Alert: राज्यात पाऊस परतणार; येत्या 5 दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज

गुरे चारण्यासाठी गेलेल्या चौघांच्या अंगावर वीज कोसळली, एकाचा जागीच मृत्यू

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI