राज्यातील महिला आणि किशोरवयीन मुलींसाठी सरकारने घेतली ‘ही’ मोठी खबरदारी

राज्यातील महिलासाठी राबविण्यात येणाऱ्या अस्मिता योजना पुन्हा सुरु करण्याची मोठया प्रमाणात महिलांमधून मागणी होत आहे. त्यामुळे ही योजना राज्यात पुन्हा सुरु करण्यात यावी अशी मागणी आमदार मुंदडा यांनी केली.

राज्यातील महिला आणि किशोरवयीन मुलींसाठी सरकारने घेतली 'ही' मोठी खबरदारी
MINISTER GIRISH MAHAJANImage Credit source: TV9 NETWORK
Follow us
| Updated on: Mar 10, 2023 | 8:28 PM

मुंबई : राज्यातील किशोरवयीन मुलींसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. याबाबतची घोषणा राज्याचे ग्राम विकास आणि पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत केली. राज्यातील महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या अस्मिता योजनेबाबत आमदार नमिता मुंदडा यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. अस्मिता योजना पुन्हा सुरु करण्याची मोठया प्रमाणात महिलांमधून मागणी होत आहे. त्यामुळे ही योजना राज्यात पुन्हा सुरु करण्यात यावी अशी मागणी आमदार मुंदडा यांनी केली. त्याला उत्तर देताना मंत्री गिरीश महाजन यांनी अस्मिता योजना पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. या योजनेची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. याबाबतची निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन दिले.

आमदार नमिता मुंदडा यांनी राज्यातील महिलांसाठी पाच रुपयात आठ सॅनिटरी पॅड देणारी अस्मिता योजना तत्कालीन ग्रामविकास मंत्री यांनी २०१८ मध्ये सुरु केली. २०१९ मध्ये ५० हजार बचत गटांनी सॅनिटरी पॅड विक्रीसाठी नोंदणी केली. त्यापैकी जवळपास ४५ हजार बचत गटांना ऑर्डरही मिळाल्या. पण, एप्रिल २०२२ पासून कंत्राट संपल्याने सदर योजनेची अंमलबजावणी राज्यात बंद आहे याकडे राज्यसरकारचे लक्ष वेधले. या चर्चेत आमदार वर्षा गायकवाड, डॉ. भारती लव्हेकर, सुलभा खोडके, यामिनी जाधव यांनी सहभाग घेत विविध मुद्दे मांडले.

हे सुद्धा वाचा

मंत्री गिरीश महाजन यांनी या प्रश्नाला उत्तर देताना सभागृहात सांगितले, ग्रामीण भागातील महिला आणि किशोरवयीन मुलींना स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यासाठी अस्मिता योजना सुरू करण्यात आली. पण काही काळात ही योजना बंद पडली.

अस्मिता योजना सुरु करण्यासाठी महिला सदस्यांनी मागणी केली आहे. त्यानुसार अस्मिता योजनेची व्याप्ती, स्वरूप, पुरवठादार निवड, Logistic, इत्यादीबाबत सुधारणा करून या योजनेच्या सुधारित अंमलबजावणीबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे, असे ते म्हणाले.

महिलांच्या आरोग्याचा दृष्टीने ही महत्त्वाची योजना आहे. नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या योजनेत महिला व किशोरवयीन मुलींना एक रुपयात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेची प्रक्रिया सुलभ पद्धतीने करण्यासाठी सर्व महिला आमदारांसोबत अधिवेशन काळात बैठक घेण्यात येईल, असे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

Non Stop LIVE Update
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावला मतदानाचा हक्क, कुठं केलं मतदान?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावला मतदानाचा हक्क, कुठं केलं मतदान?.
महाराष्ट्रात 3 ऱ्या टप्प्यातील मतदान, राज्यात या 11 हायव्होल्टेज जागा
महाराष्ट्रात 3 ऱ्या टप्प्यातील मतदान, राज्यात या 11 हायव्होल्टेज जागा.
भावूक, भावकीनंतर मडकं अन् मिमिक्रीमुळे बारामतीच्या प्रचार सभा चर्चेत
भावूक, भावकीनंतर मडकं अन् मिमिक्रीमुळे बारामतीच्या प्रचार सभा चर्चेत.
मृत्यूचा संकेत मडक्यातून... दादांच्या कार्यकर्त्यांना मडकं का फोडलं?
मृत्यूचा संकेत मडक्यातून... दादांच्या कार्यकर्त्यांना मडकं का फोडलं?.
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.