AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या ? पहा ही धक्कादायक आकडेवारी

‘सीबील’मुळे बँका कर्ज देत नाहीत, कृषीपंपाच्या वीज कनेक्शन तोडली जात आहे त्यामुळे राज्यातला शेतकरी मेटाकुटीला आला आहे. राज्यातला शेतकरी खचला आहे. त्यामुळे राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ झाली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या ? पहा ही धक्कादायक आकडेवारी
AJIT PAWAR WITH EKNTAH SHINDEImage Credit source: TV9 NETWORK
| Updated on: Mar 10, 2023 | 7:14 PM
Share

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना राज्यात यापुढे एकही शेतकऱ्यांची आत्महत्या होऊ देणार नाही. आत्महत्यामुक्त महाराष्ट्र होईल असा विश्वास जनतेला दिला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या याच मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला. यावेळी त्यांनी राज्यात दररोज किती शेतकरी आत्महत्या करत आहेत याची आकडेवारीच जाहीर केली. मात्र, त्याआधी अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकार शेतकऱ्यांविषयी अत्यंत असंवेदनशील असल्याचा घणाघाती हल्ला चढविला.

शेतकरी हाच जगाचा पोशिंदा आहे. तोच अडचणीत असेल तर राज्याचे आणि देशाचे अर्थचक्र फिरु शकत नाही. कल्याणकारी राज्याची संकल्पना राबवत असताना सरकारने कृषी क्षेत्राला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. मात्र, शिंदे-फडणवीस सरकार कृषी खात्यातल्या बदल्या, पदोन्नती आणि भरतीमध्ये अडकले आहे असा आरोप अजित पवार यांनी केला.

कृषी पंपाची वीज जोडणी तोडू नये, असे आदेश दिल्याचे सरकार म्हणते पण, फिल्डवर वेगळीच स्थिती आहे. शेतकऱ्यांच्या वीजेची कनेक्शन तोडली जात आहेत. कृषी धोरणानुसार वीज थकबाकीसंदर्भात धोरणात्मक निर्णय घेऊन ती माफ करायला हवी अशी मागणी विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस करत होते. मग आता ते मागे का सरकत आहेत, असा सवाल त्यांनी केला.

राज्यात राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज देत नाहीत. शेतकऱ्यांचे ‘सिबील’ स्कोअर बिघडल्यामुळे त्यांना कर्ज मिळण्यास अडचणी येत आहेत. शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात बँकांनी कर्ज दिले नाही तर मग त्यांना नाईलाजाने सावकारांच्या दाराशी उभे रहावे लागते. ती कर्जफेड त्यांच्याकडून होत नाही आणि मग आत्महत्येपर्यंत शेतकरी पोहोचतो. हे मोठे दुष्टचक्र आहे. ते भेदण्यात सरकार अपयशी ठरत आहे असे ते म्हणाले.

रोज आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

नापिकी, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस या नैसर्गिक संकटाने राज्यातली शेती अडचणीत आली आहे. शेतमालाला मातीमोल दर मिळत आहे. भाजीपाला, शेतमाल रस्त्यावर फेकण्याची वेळ राज्यातल्या बळीराजावर आली. खतांच्या वाढलेल्या किंमती, बोगस बियाण्यांचा प्रश्न, घसरलेल्या ‘सीबील’मुळे बँका कर्ज देत नाहीत, कृषीपंपाच्या वीज कनेक्शन तोडली जात आहे त्यामुळे राज्यातला शेतकरी मेटाकुटीला आला आहे. राज्यातला शेतकरी खचला आहे. त्यामुळे राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ झाली असून रोज आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला.

हाच का आत्महत्यामुक्त महाराष्ट्र ?

२०१४ ते २०१९ या देवेंद्र फडणवीस सरकारच्या पाच वर्षाच्या काळात ५०६१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. उद्धव ठाकरे सरकारच्या अडीच वर्षाच्या काळात १ हजार ६६० तर एकनाथ शिंदे यांच्या केवळ जुलै २०२२ ते जानेवारी २०२३ या सात महिन्यांच्या काळात १०२३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. एकनाथ शिंदे यांनी राज्यात यापुढे एकही शेतकऱ्यांची आत्महत्या होऊ देणार नाही. आत्महत्यामुक्त महाराष्ट्र होईल असे सांगितले होते. पण, केवळ सात महिन्यात हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या हाच का तुमचा आत्महत्यामुक्त महाराष्ट्र अशी टीकाही त्यांनी सरकारवर केली.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.